जुलाब, हगवणीवर टेंभुरणी उपयुक्त

टेंभुरणीची फळे
टेंभुरणीची फळे

टेंभुरणीचे झाड शेताच्या बांधावर तसेच माळरानावर उंच वाढलेले आढळतात. महाराष्ट्रात रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, सातारा तसेच विदर्भातील काही भागांत याचे वृक्ष जंगलात वाढलेले दिसतात. ​

  • स्थानिक नाव    :     टेंबुरणी, टेंभुरुन, टेभ्रूनी,
  •             तेंदू , टेमरू, टेंभूरणी   
  • शास्त्रीय  नाव    : Diospyros                 melanoxylon Roxb.
  • इंग्रजी नाव     :     Malabar Ebony,  Ebony Persimmon,      East Indian Ebony       Coromandel Ebony,    Black Ebony, Ebony,        
  • संस्कृत नाव     :     दीर्घपत्रक, तिंदुका        
  • कुळ    :     Ebenaceae       
  • उपयोगी भाग    :     पिकलेली फळे        
  • उपलब्धीचा काळ    :     एप्रिल-जून          
  • झाडाचा प्रकार    :     झाड       
  • अभिवृद्धी     :     बिया        
  • वापर    :     पिकलेले फळे खाण्यासाठी
  • वनस्पतीची ओळख  

  • टेंभुरणीची पानझडी वृक्ष साधारण २० ते २५ मीटर उंच १.६ ते २ मीटर घेराचे वाढतात.
  • झाडाची साल चॉकलेटी किंवा काळ्या रंगाची असून, तडे गेलेली असते. झाडाला अनेक फांद्या असून पाने साधी, एका आड एक येणारी, दोन्ही बाजूने मऊसर,  २० ते ३०  सें.मी लांब व ३ ते ५ सें.मी रुंद असून फिक्कट हिरव्या रंगाची असतात.
  • पाने बिडी बनवण्यासाठी वापरली जातात. फुले लहान, १ ते १.५ सें.मी लांब, फिक्कट पिवळ्या रंगाची असून पानाच्या बेचक्यातून येणारी असतात.
  • फळे गोल, हिरवी, चेंडूच्या आकाराची, पिकल्यावर आकर्षक नारंगी रंगाची, आतील गर पिवळा आणि खाण्यासाठी योग्य असतात. बिया ६ ते ८, चकाकणाऱ्या, चॉकलेटी रंगाच्या असतात.
  • औषधी उपयोग
  • टेंभुरणीची कच्ची फळे जुलाब, हगवण यांसारख्या आजारांवर उपयुक्त आहे.
  • तोंड आल्यावरही कच्च्या फळांचा उपयोग केला जातो. टीप : पिकलेली फळे खाण्यासाठी वापरतात. तर काही भागांत पानांचा वापर विडी बनवण्यासाठी केला जातो. औषधी उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com