अपचन, त्वचारोगावर उपयुक्त मोखा

मोख्याची फळे
मोख्याची फळे
  • स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी, नकटी        
  • शास्त्रीय नाव     : Schrebera swietenioides Roxb       
  • कूळ    : Oleaceae       
  • इंग्रजी नाव     : Weaver's Beam Tree        
  • संस्कृत नाव     :  कस्तपाटोळा, गोलीधा, घंटापटली   उपयोगी भाग    : कोवळी पान, कोवळा देठ       
  • उपलब्धीचा काळ    : पाने- फेब्रुवारी-एप्रिल, फुले- मार्च-एप्रिल        
  • झाडाचा प्रकार    : झाड       
  • अभिवृद्धी     : बिया        
  • वापर    : भाजी   
  • आढळ मोखा हा पानझडी वृक्ष महाराष्ट्रातील जंगलात वाढलेले दिसतात. पालघर, ठाणे, रायगड तसेच नगर, पुणे, नाशिक या जिह्यातील डोंगराळ भागात मोख्याची झाडे काही प्रमाणात आढळतात. काही ठिकाणी शेताच्या बांधावरही या झाडांची लागवड केली जाते.   

    वनस्पतीची ओळख

  • मोख्याचे झाड साधारण १५ ते २० मीटर उंच वाढते. सालीचा रंग काळपट तपकिरी-करड्या रंगाचा असून, पाने अनेक, संयुक्त आकाराची असून फिक्कट हिरव्या रंगाची असतात. ३ ते ४ पर्णिकांच्या जोड्या समोरासमोर येणाऱ्या व एक पर्णिका टोकाशी येते.
  • देठ साधारण ३ ते ३० सें.मी. लांब असते. फुले द्विलिंगी, पिवळसर तपकिरी रंगाच्या छटा असणारी व गुच्छ्यात येणारी असतात. फुले रात्रीच्या वेळी उमलणारी, सुगंध देणारी व नरसाळ्याच्या आकाराची असतात. ८ ते १२ मी. मी. पाकळ्या, तपकिरी रंगाच्या ग्रंथीयुक्त असतात. फळे ५ सें. मी. लांब व २.५ सें. मी. रुंद असून थोडी लांबट आकाराची असतात.
  • फळे कडक, वरून खरखरीत व ४ बियायुक्त असतात. बिया पंखाच्या आकाराच्या असतात.
  • झाडाची पाने साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यात पूर्णपणे गळून जातात. तर मार्च एप्रिलमध्ये झाडाला नवीन पालवी फुटते. या कोवळ्या पानाचा वापर काही भागात भाजी करून खाण्यासाठी केला जातो.   
  • औषधी उपयोग

  • झाडाचे मूळ, खोड, साल व पाने औषधासाठी वापरली जातात.
  • मूळ, साल व पाने चवीला कडू असून झणझणीत, पाचक, भूक वाढवणारे, मलावरोधक, रेचक तसेच कृमिनाशक असून अनेक आजारांवर उपयुक्त आहे. अपचन, त्वचारोग, कुष्ठरोग, गळू अशा अनेक व्याधींवर वापरले जातात.
  • सालीचा वापर गळ्याच्या रोगावर, रक्तक्षय, मधुमेहावर तसेच कुष्ठरोगावर उपाय करण्यासाठी वापरतात.
  • टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.
  • कोवळ्या पाल्याची भाजी साहित्य : ३-४ वाट्या मोख्याचा कोवळा पाला, २-३ बारीक चिरलेले कांदे, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ३-४ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल व चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ. कृती :  प्रथम मोख्याचा पाला स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक कापून घ्यावा. एका पातेल्यात पाणी गरम करून पाला वाफवून घ्यावा. कढईत तेल गरम करून जिरे-मोहरी व हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या व वाफवून पिळून घेतेलेले मोख्याची पाने टाकून चांगले परतून घ्यावे. ही भाजी ५ मिनटे झाकण ठेऊन शिजवून घ्यावी. चवीप्रमाणे मीठ मिसळावे.

    ई-मेल : ashwinichothe7@gmail.com (क. का. वाघ उद्यान विद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com