आरोग्यदायी पुदिना

पुदिना
पुदिना

पुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे. पोटदुखीवर उपयोगी आहे.

  •     पुदिना खाल्ल्याने पोट आणि लघवी साफ होते. याच्या सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते. थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी, वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी, दातदुखी, वातविकार इत्यादी याच्या सेवनाने बरे होतात. 
  • वांतीहारक म्हणून व आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव पडतो. आतड्यांचे रोगातही ही वनस्पती उपकारक आहे.
  • विषारी किडा चावल्याच्या जागी पुदिन्याची पाने चोळल्यास, कीडा चावल्यामुळे होणारी आग व कंड कमी होतो.
  •  एका विशिष्ट प्रकारच्या सुगंधामुळे, याचा वापर साबण, त्वचेस लावावयाचे क्रिम्स डोक्यास व शरीरास लावायचे सुगंधी तेल, इत्यादींमध्ये विपुल प्रमाणात करण्यात येतो.
  • पुदिना तेलाचे औषधी गुणधर्म

  • पुदिन्यातील महत्त्वपूर्ण किंवा अत्यावश्यक तेलाच्या रासायनिक रचनेमध्ये कार्व्हक्रोल, मिथाइलसेटेट, पिनिन, मेंन्थॉल, टेरपिनेन, लिमोनेन, निओमेन्थॉल आणि इतर घटक आहेत जे त्यांच्या दाहक-उत्तेजक आणि उपचार गुणधर्मांमध्ये योगदान देतात.
  • मेंथॉल हा या तेलामधील एक प्रमुख घटक आहे. मेन्थॉल ऍनेस्थेटीक, अँटिसेप्टिक आणि एंटी इंफ्लॅमेटरी इफेक्ट देते.   
  • मेंथॉलमुळे त्वचेतील थंड तापमानाची जाणीव करून देणाऱ्या चेतापेशी उद्दीपित होतात आणि मेंदूकडे संवेदना पाठवतात. म्हणूनच पुदिना तेलाचा स्पर्श त्वचेला होताच तेथे थंडावा जाणवतो.
  • पुदिन्यामुळे पोटाचे मृदू स्नायू शिथिल होतात; पोटात मुरडा येत नाही. मेंथॉलमुळे पोटाला आराम मिळतोच, पण सूक्ष्म जिवांचीही वाढ होत नाही. याशिवाय डोकं दुखले, की पुदिन्याचे तेल कपाळावर चोळतात.
  •     सर्दी झाली की श्वास घ्यायला त्रास होतो, त्या वेळी श्वसन करणं सुलभ व्हावं म्हणून पेपरिमट तेल नाकावर, गळ्यावर चोळतात.
  • तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी, टूथपेस्टमध्ये, माऊथवॉशमध्ये तेलाचा वापर करतात.
  • पुदिन्याचं तेल कीटकनाशक म्हणूनही वापरले जाते.
  • तेल विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधने उत्पादनांचा भाग आहे.  तेल औषधी उद्योगात वापरले  जाते.
  • पुदिन्याच्या तेलातील मेंथॉल आणि मेंथाईल असिटेट यांमुळे पुदिन्याला तीव्र वास येतो. च्युईंगम, टूथपेस्ट, औषधे, गुळण्या करण्यासाठी असणारी द्रावणे, इत्यादींमध्ये स्वादासाठी या तेलाचा उपयोग केला जातो.
  • या तेलातील घटक चेहऱ्यावरील मुरूम, जळजळ कमी करण्यास मदत करतात.
  •  हे तेल शरीराची ऊर्जा वाढवते. रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत करते.
  •  तेलाच्या उपचाराने जखम लवकर भरून येते.  
  • विविध त्वचारोग तसेच खुजली कमी करण्यात मदत करते.
  •  पुदिन्याचे तेल अस्थी विकारांवर उपयुक्त आहे. चक्कर येणे, मळमळणे यावर देखील आरामदायक आहे.
  •  पेपरमिंट तेलाचा उपयोग हर्टबर्न, पोटदुखी, दातदुखी हृदयविकाराचा झटका, हृदयाचा त्रास, मासिक पाळी, तोंडातील दुर्गंधी, चिंताग्रस्त, थकवा यांसारख्या आजारावर उपचार म्हणून करतात.
  •  तेलाचा वापर त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यास करतात.
  • १०० ग्रॅम ताज्या पुदिन्यामधील पोषक तत्त्वे ऊर्जा - ४४ किलो कॅलरी, कर्बोदक- ८.४१ ग्रॅम,चरबी- ०.७३ ग्रॅम, प्रथिने- ३.२९ग्रॅम, लोह-११.८७ मिलिग्रॅम, मॅंगनीज- १,११८ मिलिग्रॅम, तांबे- ०.२४० मिलिग्रॅम, पोटॅशियम- ४५८ मिलिग्रॅम, रिबोफ्लाव्हिन-०.१७५मिलिग्रॅम, व्हिटॅमिन सी- १३.३ मिलिग्रॅम, पॅन्टोथेनिक ॲसिड (व्हिटॅमिन बी ५)- ०.०६१ मिलिग्रॅम, व्हिटॅमिन बी ६- ०.०४१ मिलिग्रॅम.

     - कुंती कच्छवे, ९५१८३९७९७४ (अन्न रसायन आणि पोषण विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)       

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com