agricultural stories in Marathi, The more pesticides bees eat, the more they like them | Agrowon

कीडनाशकयुक्त आहाराचीही मधमाश्‍यांना लागते चटक
वृत्तसेवा
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

कीडनाशकयुक्त आहार खाण्यात असलेल्या बंबल बी माश्यांच्या वर्तनात बदल होत जातो. विशेषतः अशा आहाराविषयी व्यसन लागल्यासारखी स्थिती इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडन आणि क्विन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथील अभ्यासात आढळली आहे.
कीडनाशकयुक्त आहार वसाहतीमध्ये येत राहिल्यास वसाहतीच्या प्रजोत्पादनांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. हे संशोधन ‘प्रोसिंडिग्स ऑफ दी रॉयल सोसायटी बी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कीडनाशकयुक्त आहार खाण्यात असलेल्या बंबल बी माश्यांच्या वर्तनात बदल होत जातो. विशेषतः अशा आहाराविषयी व्यसन लागल्यासारखी स्थिती इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडन आणि क्विन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथील अभ्यासात आढळली आहे.
कीडनाशकयुक्त आहार वसाहतीमध्ये येत राहिल्यास वसाहतीच्या प्रजोत्पादनांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. हे संशोधन ‘प्रोसिंडिग्स ऑफ दी रॉयल सोसायटी बी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

निओनिकोटीनॉईड वर्गातील कीटकनाशकांवर युरोपिय महासंघात जवळपास संपूर्ण बंदी घातली असली तरी जगभरामध्ये त्यांचा वापर अद्यापही सुरू आहे. या कीटकनाशकांचा मधमाश्यांवर होणाऱ्या परिणामांवर सातत्याने बोलले जाते. मधमाश्‍यांच्या शरीरक्रियांवर होणाऱ्या परिणामांविषयी अभ्यासही होतो. मात्र नुकत्याच झालेल्या अभ्यासामध्ये वर्तनामध्येही बदल होत असल्याचे दिसून आले.
संशोधक डॉ. रिचर्ड गील यांनी सांगितले, की सुरवातीला पर्याय दिला असता मधमाश्‍या शक्यतो निओनिकोटीनॉईडची प्रक्रिया केलेल्या आहाराला टाळत असल्याचे आढळले. मात्र, जेव्हा एखादी मधमाशी अशा आहाराच्या संपर्कात येते, तेव्हा त्याविषयी आकर्षण निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. माणसांमध्ये निकोटीनच्या वापरामुळे जी स्थिती निर्माण होते, तशीच स्थिती कीटकांमध्ये निओनिकोटीनॉईडमुळे ग्रहण पेशींवर दिसून येते.

  • या अभ्यासात संशोधकांनी बंबल बीच्या दहा वसाहतींचे दहा दिवस निरीक्षण केले. प्रत्येक वसाहतीला त्यांचे खाद्य गोळा करण्याचे क्षेत्र ठरवू दिले. त्यात निओनिकोटीनॉईड असलेले आणि नसलेले असे दोन्ही पर्याय होते.
  • सुरवातीला कीडनाशक नसलेल्या आहाराला प्राधान्य दिले. काही काळानंतर त्यांच्या आहारात कीडनाशकयुक्त घटकांचा समावेश झाल्यानंतर त्याकडे आकर्षण वाढले. पुढील टप्प्यामध्ये कीडनाशक नसलेल्या आहाराकडे त्यांच्या फेऱ्या कमी झाल्याचे दिसले.
  • यामागील सर्व यंत्रणाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास करण्याची आवश्यकताही संशोधकांनी व्यक्त केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...