agricultural stories in Marathi, organoc pigeaon pea management by Dadarao Vishwanath shejul | Agrowon

नियोजन खरिपाचे : अत्यल्प खर्चात सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन
संतोष मुंढे
शनिवार, 25 मे 2019

दादाराव विश्वनाथ शेजूळ
बोरगाव अर्ज(गणपती) ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद.
संपर्क ः ९४२०४०४२२१, ८३२९४८८३४४

औरंगाबाद जिल्ह्यातील बोरगाव अर्ज (गणपती) (ता. फुलंब्री) येथे तीन वर्षांपासून एक शेतकरी गट सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन घेतो. या गटातील दादाराव विश्वनाथ शेजूळ यांनी अत्यल्प खर्चात सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन घेतात. तुरीपासून डाळीची निर्मिती करून प्रदर्शनाद्वारे विक्री करतात.

दादाराव विश्वनाथ शेजूळ
बोरगाव अर्ज(गणपती) ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद.
संपर्क ः ९४२०४०४२२१, ८३२९४८८३४४

औरंगाबाद जिल्ह्यातील बोरगाव अर्ज (गणपती) (ता. फुलंब्री) येथे तीन वर्षांपासून एक शेतकरी गट सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन घेतो. या गटातील दादाराव विश्वनाथ शेजूळ यांनी अत्यल्प खर्चात सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन घेतात. तुरीपासून डाळीची निर्मिती करून प्रदर्शनाद्वारे विक्री करतात.

बोरगाव अर्ज येथील दादाराव शेजूळ यांच्याकडे ४ एकर ३३ गुंठे शेती आहे. या शेतीमधील उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. तीन वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादमधील तज्‍ज्ञ व आत्माच्या समन्वयातून बोरगाव अर्ज येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने प्रत्येकी एक एकरवर आंतरपिकांसह तूर उत्पादन घेणे सुरू केले आहे. दादाराव शेजूळ या शेतकऱ्यांपैकीच एक. पूर्वी त्यांच्याकडे नसलेले तूर पीक गेल्या तीन वर्षांपासून नियमित बनले आहे. एक एकर क्षेत्रामध्ये शिफारशीत ‘बीडीएन ७११’ या तुरीच्या वाणाची लागवड करतात. तुरीमध्ये आंतरपीक म्हणून बाजरी, उडीद, मूग अशी पिके असतात.

लागवडीची पद्धत

दादाराव शेजूळ आपल्या एक एकर शेतात पेरणीयोग्य पावसानंतर टोकन पद्धतीने साधारणत: ६ बाय दीड फूट अंतराने तुरीची लागवड करतात. एकरी सुमारे दीड किलो बियाणे लागते. उगवल्यानंतर अतिरिक्त वाढलेल्या रोपांची विरळणी करतात. दोन तूर ओळीमध्ये बाजरी, उडीद, मूग यांच्या दोन, दोन ओळी घेतात. चवळी व भगरही यांच्या केवळ चार ओळी टाकल्या.

सेंद्रिय पद्धतीने नियोजन

 • वर्षांपासून सेंद्रिय तूर पिकाची कास धरली आहे. दादाराव शेजूळ यांनी गांडूळखत, शेणखताचा वापर वाढविला आहे. २०१६-१७ मध्ये पहिल्यांदा त्यांनी एक एकरात दोन ट्रॉल्या शेणखत टाकले होते. २०१७-१८ मध्ये पाच बॅग गांडूळखत व दोन ट्रॉल्या शेणखत टाकले. २०१८-१९ मध्ये २५ बॅग गांडूळखत टाकले. आवश्यक गांडूळ खत स्वत:च तयार करतात.
 • सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या तुरीच्या पिकावर निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क व जीवामृताचा वापर ते करतात. तूर पिकामध्ये एकूण कालावधीत तीन वेळा निंबोळी अर्क, दोन वेळा दशपर्णी अर्क व तीन वेळ जीवामृताच्या फवारण्या ते घेतात.
 • मूलस्थानी जलसंधारणासाठी दोन ओळीच्या अंतरात चार फुटावर चर.
 • पाणी उपलब्ध झाल्यास दोन ते तीन संरक्षित पाणी ठिबकने देतात.
 • बाजरी, उडीद, मुगाचे पीक काढल्यानंतर कोळपणी करतात.
 • प्रत्येक तुरीच्या ओळीशेजारी दांड पाडले जातात.
 • पावसाचा खंड पडल्यास वाढीच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाणी दिले जाते.
 • एकरी दोन कामगंध सापळ्यांचा वापर, व्हर्मी वॉशचा उपयोग करतात.
 • तुरीपासून डाळ तयार करून त्याची विक्री करतात.
 • ॲग्रोवन व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनात सहभाग घेत सेंद्रिय उत्पादनासाठी ग्राहक जोडले आहेत.
 • सेंद्रिय तुरडाळीला मिळाला १०० रुपये प्रतिकिलोचा दर
 • दशपर्णी अर्क, जीवामृत स्वत: तयार करतात.

अत्यल्प खर्चात उत्पादन

शेणखतांसह सर्व निविष्ठा घरच्या असल्याने एकरी साधारण ६ ते ७ हजार खर्च होतो. गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन १२.५ क्विंटल आले होते. तर या वर्षी संरक्षित पाणी कमी पडल्याने उत्पादनामध्ये घट होऊन ते केवळ ४.५ क्विंटल मिळाले. अर्थात आंतरपीक मूग, उडिद यांचे दीड क्विंटल, बाजरी ५ क्विंटल उत्पादनासोबत भगर आणि चवळी ४० ते ५० किलो उत्पादन मिळाले. उत्पादन खर्च कमी असल्याने पाण्याअभावी कमी उत्पादन येऊनही नुकसान झाले नाही.
 

इतर यशोगाथा
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची...वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती ...
गीर गायींच्या संगोपनासह पॅकेटबंद दुधाची...अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा संत्रा पिकासाठी...
अथक प्रयत्न, संघर्षातून  प्रयोगशील...पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत...
मुंबईतील नोकरी सांभाळून गावी विस्तारली...मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात...
नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...
बहुवीध पीक पद्धतीद्वारे जोखीम कमी...लातूर जिल्ह्यातील हेर येथील प्रयोगशील शेतकरी...
पाण्याचे महत्त्व ओळखूनच सुधारले पीक...सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उभे ठाकलेले संकट व...
दुष्काळातही बहरलेली बेलखेडेेंची...अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
केशर आंबा बाग, मिश्रपिके,  अन...लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज...
शेततळ्याच्या जोरावर फुलली २५ एकरांत...संत्रा शेतीत अग्रेसर म्हणून वाशिम जिल्ह्यातील...