पोल्ट्री वीर्यपोल्ट्री विरळकांमुळे शुक्राणूंची साठवण २४ ते २८ तासांपर्यंत शक्य

पोल्ट्री वीर्य विरळकांमुळे शुक्राणूंची साठवण २४ ते २८ तासांपर्यंत शक्य
पोल्ट्री वीर्य विरळकांमुळे शुक्राणूंची साठवण २४ ते २८ तासांपर्यंत शक्य

पोल्ट्री पक्ष्यांचे वीर्य हे तीव्र असून, त्यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यात विरळकाचा (Diluent) वापर करून अधिक मादींच्या फलन केले जाते; मात्र सध्या बाजारामध्ये उपलब्ध विरळकांच्या अनेक समस्या दूर करण्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या इज्जतनगर येथील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेतील संशोधकांना यश आले आहे. त्यांनी विकसित केलेल्या वीर्य विरळकांमुळे विर्याची साठवण कमी तापमानामध्ये २४ ते २८ तासांपर्यंत करता येते. या गुणधर्मामुळे पोल्ट्री उद्योगाच्या उत्पादनामध्ये वाढीसोबतच खर्चात बचत होणार आहे .

पोल्ट्रीमध्ये नैसर्गिकरीत्या समागमातून अधिक मादींचे फलन शक्य होत नाही. तुलनेने कृत्रिम पद्धतीने विर्याचा वापर केल्यास उत्तम दर्जाच्या नरांपासून अधिक संतती किंवा अंडी मिळवणे शक्य होते. यातून पोल्ट्रीतील उत्पादनवाढीसोबतच खर्चामध्ये मोठी बचत होते. पोल्ट्री पक्ष्यांच्या विर्यामध्ये ४ ते ६ अब्ज प्रतिमि.लि. शुक्राणू असतात. या विर्याची तीव्रता अधिक असून, प्रमाण कमी असते. त्यामुळे हे वीर्य पातळ किंवा विरळ करून वापरले जाते; मात्र सध्या उपलब्ध असलेले वीर्य विरळक घटकांची रासायनिक संरचना ही गुंतागुंतीची असून, त्यांचा सामू (पीएच) योग्य ठेवणे आवश्यक असते. एकूणच विर्य विरळकाच्या निर्मितीसाठी अधिक वेळ व खर्च लागतो. त्याच प्रमाणे त्यांचा शेतपातळीवर वापर करण्यातही अडचणी येतात. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या इज्जतनगर (उत्तर प्रदेश) येथील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेतील (सीएआरआई) संशोधकांनी पक्ष्याचे वीर्य विरळक (पातळ करणारा घटक) विकसित केला आहे. यामुळे कोबंड्याच्या विर्याची साठवण थंड तापमानामध्ये २४ तासांपर्यंत सुरक्षितपणे करता येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यातील पीएच स्थिर ठेवण्याची गरज नाही.

चाचण्यातील निष्कर्ष ः

  • वीर्य पातळ करण्याचे प्रमाण १ः२ ते १ः३ पर्यंत शुक्राणूंची आवश्यक संख्या आणि साठवण कालावधी यानुसारून कमी जास्त करता येते.
  • चाचण्यामध्ये वीर्य कमी तापमानामध्ये २४ तासांपेक्षाही अधिक काळ (८० टक्क्यांपेक्षा अधिक) चांगले राहत असल्याचे दिसून आले. संस्थेमध्ये या चाचण्या दोन हजारपेक्षा अधिक पक्ष्यांवर करण्यात आल्या असून, हा पातळ करणारा घटक ४८ तासांपर्यंतही चांगल्या प्रकारे कार्य करत असल्याचे दिसून आले. अर्थात, अधिक व्यापक पातळीवर चाचण्या सुरू आहेत.
  • विश्लेषण ः

  • एक ब्रॉयलर पक्षी सामान्यतः अर्धा मि.लि. वीर्य देतो. (शुक्राणू तीव्रता ५.३४ अब्ज प्रतिमि.लि. )
  • एका कोंबडीला भरवण्यासाठी २४ दशलक्ष शुक्राणू मात्रा (०.०५ मि.लि. पातळ विर्य) लागते. सीएआरआई पातळ करणाऱ्या घटकाचा (१ः१०) वापर केल्यास, एका नरापासून मिळवलेल्या विर्यापासून ११० कोंबड्या भरवणे शक्य होते. ताज्या विर्यामध्ये त्याचा वापर केल्यास ९० टक्क्यापेक्षा वाढ मिळवणे शक्य होते. या विर्याची साठवणही २४ ते ४८ तासांपर्यंत करता येते.
  • अशा साठवलेल्या विर्यापासून ८९ दशलक्ष शुक्राणू संख्येच्या पातळ (१ः२ प्रमाण) विर्याच्या साह्याने एका नरापासून सुमारे ३० कोंबड्या भरवता येतात. थोडक्यात, या तंत्रामुळे पोल्ट्री उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळवणे शक्य होईल.
  • या पोल्ट्री प्रजातींसाठी उपयुक्त लेयर, ब्रॉयलर, बटेर, बदक, देशी कोंबड्या.

    पक्ष्यांचे वीर्य पातळ करण्याच्या प्रक्रियेमुळे होणारे फायदे ः

    1. विर्याचे प्रमाण वाढते.
    2. अधिक पक्ष्यांचे कृत्रिमरीत्या रेतन करणे शक्य होते.
    3. वीर्य योग्यरीतीने पातळ केल्यामुले शुक्राणूंचे एकसमान वितरण होण्यास मदत होते.
    4. विर्याची अल्प व दीर्घकालीन साठवणीचा कालावधी वाढवता येतो.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com