तयार करा सेंद्रिय निविष्ठा

नॅडेप कंपोस्ट
नॅडेप कंपोस्ट

अलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खतांसह विविध उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच तयार केल्यास अधिक स्वस्त पडतात. आजच्या लेखात बायो डायनॅमिक कंपोस्ट, नॅडेप कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धतींची माहिती घेत आहोत.

बायो डायनॅमिक कंपोस्ट   साहित्य: १) एस – ९ कल्चर २) शेतातील काडीकचरा ३) कापसाच्या काड्या ४) शेतातील तण ५) कडूनिंबाच्या झाडाची पाने ६) निरगुडीची पाने ७) एरंडीची पाने ८) गाजर गवत ९) गिरीपुष्प १०) बेशरम ११) ताजे शेण ८ ते १० दिवसांचे १२) १५०० ते २००० लिटर पाणी. एक टन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १५ फूट लांब, ५ फूट रुंद जागा लागते. ती शक्यतो पूर्व-पश्चिम असावी.

निवडलेली जागा स्वच्छ करून त्यावर हलका पाण्याचा सडा टाकावा. वरीलप्रमाणे जमा केलेल्या ओल्या व सुक्या काडीकचऱ्यावर पाणी टाकून चांगले भिजवावे. त्यानंतर पहिला १ फुटाचा काडीकचऱ्याचा थर द्यावा. त्यावर पाणी टाकावे. दुसऱ्या ८ ते ३ इंच जाडीच्या थरावर शेणकाला शिंपडावा. १ किलो एस-९ कल्चर १०० लिटर पाण्यात टाकून थोडा वेळ चांगले ढवळावे. हे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात शिंपडावे. त्यानंतर १ फुटापर्यंत जैविक पदार्थ व ओले शेण यांचा थर लावावा. प्रत्येक थरावर एस-९ कल्चरचे द्रावण शिंपडावे. अशाप्रकारे ३ ते ४ फूट उंच ढीग तयार करावा. तो शेणमातीने लिंपून घ्यावा. एक महिन्यानंतर ढिगाला पलटी द्यावी. अशाप्रकारे आठ महिन्यांत उत्तम कंपोस्ट तयार होते.

नॅडेप कंपोस्ट   टाकी बांधण्याची पद्धत :               

  •  पाणी न साचणारी उंच ठिकाणाची व सावली असणारी जागा निवडावी.
  •  टाकीचे बांधकाम शक्यतो भाजक्या विटांमध्ये ९ इंच जाडीचे करावे.
  •  टाकीचा आकार १५ फूट लांब, ५ फूट रुंद व ३.५ फूट उंच असावा. बांधकाम करताना टाकीचा तळाचा भाग कठीण स्वरूपाचा करून घ्यावा. वीट बांधकामाच्या प्रत्येक थरानंतर तिसऱ्या थरामध्ये खिडक्या ठेवाव्यात. खिडक्यांची रचना तिरकस रेषेत चारी बाजूंना येईल असे पाहावे.
  • टाकी भरण्यासाठी सामग्री १) १५ टन काडी कचरा, पालापाचोळा, घसकटे इ. २) ९० ते १०० किलो गाईचे शेणखत व १ गाडी माती. ३) १५०० ते २००० लिटर पाणी. ४) जनावराचे मूत्र उपलब्धतेनुसार.

    पद्धत

  • सर्व साहित्य एकत्र आणून ठेवावे. साहित्य टाकीत भरण्याआधी आतील भिंतीवर शेण आणि माती यांचे मिश्रण शिंपडावे.
  • नाडेप टाकी भरताना पहिला थर देताना तळाला १५ ते ८० सेंमी जाडीचा काडी कचरा, पालापाचोळा, धसकटे इत्यादी घेऊन, त्यावर शेण + पाणी यांचे मिश्रण करून सारख्या प्रमाणात शिंपडावे. त्यावर साधारण ५ ते ६ घमेली माती पसरून टाकावी. आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. अशाप्रकारे एकावर एक थर देऊन नाडेप बांधकामाच्या वर १.५ फुटापर्यंत भरून घ्यावा. त्यावर माती व शेणाच्या मिश्रणाचा लेप देऊन लिंपून घ्यावे.
  • काही दिवसांनंतर नाडेप टाकीतील सामग्री खाली दबलेली आढळते. त्या वेळी पुन्हा वरीलप्रमाणे एकावर एक थर देऊन माती व शेणाच्या मिश्रणाचा थर देऊन लिंपून घ्यावे.
  • - एस. बी. झाडे, ८८५५८२३५४६

    (कृषी महाविद्यालय, रिसोड

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com