मातीच्या पोतानुसार ओळखा जमिनीचा प्रकार

मातीच्या पोतानुसार ओळखा जमिनीचा प्रकार
मातीच्या पोतानुसार ओळखा जमिनीचा प्रकार

गेल्या भागामध्ये जमिनीच्या एकूण १२ प्रकारांविषयी माहिती घेऊन, त्यातील सिंचनाचे प्रमाण कसे काढायचे, याविषयी जाणून घेतले. मात्र, शेतकऱ्यांना जमिनीचा प्रकार किंवा मातीचा पोत कसा ओळखायचा, याविषयी अडचणी असल्याचे समजले. या लेखामध्ये जमिनीच्या प्रकाराविषयी माहिती घेऊ. जमिनीचा पोत म्हणजे शास्त्रीय भाषेत सॉईल टेक्श्चर. त्यानुसार जमिनीचे वर्गीकरण करण्याचे मापदंड जागतिक पातळीवर देशनिहाय भिन्न आहेत. मात्र, अमेरिकी कृषी विभाग आणि इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय मृद विज्ञान संस्था (आयएसएसएस, यूके) यांनी केलेले मातीचे वर्गीकरण जगभरातील बहुतांश देशांमध्ये वापरले जाते. भारतामध्येही या दोन पद्धतींचा वापर होत असला, तरी ब्रिटिशांची पद्धत अधिक प्रचलित आहे. आंतरराष्ट्रीय मृद विज्ञान संस्था (आयएसएसएस)नुसार जमिनीच्या पोताचे प्रकार

प्रकार आकार

खरबडीत वाळू (कोरस सॅंड)

२ मिमी ते ०.२ मिमी
मुलायम वाळू (पाइन सॅंड) ०.२ मिमी ते ०.०२ मिमी
पोयटा (सील्ट) ०.०२ मिमी ते ०.००२ मिमी
चिकन माती (क्‍ले) ०.००२ मिमीपेक्षा जास्त

यापेक्षा बारीक कणांना (म्हणजे ०.०००२ मिमीपेक्षा कमी) ‘कोलाईडल कण’ असे म्हणतात. एखाद्या फटीतून येणाऱ्या सूर्यकिरणांत नाचणारे कण, धुळीचे बारीक कण, प्रदूषणांचे कण, मैद्याचे कण इत्यादी या प्रकारात मोडतात. प्रयोगशाळेतून मातीचे पृथ्थकरण केल्यानंतर, या कणांच्या टक्केवारीनुसार मागील लेखात दिलेल्या त्रिकोणाचा वापर करून आपल्या शेतातील जमीन नक्की कोणत्या भागात येते, पाहावे. उदा. जमिनीच्या कणाचे प्रमाण २८% चिकन माती, ३४% पोयटा आणि ३८% वाळू असल्यास ही माती ‘लोम’ या प्रकारामध्ये मोडते. महाराष्ट्रातील जमिनी सहसा सील्टी क्‍ले लोम (पोयटायुक्त चिकन मातीचे लोम), क्‍ले लोम (चिकन मातीचे लोम), सील्टी लोम (पोयटायुक्त लोम), क्‍ले (चिकन माती), सील्टी क्‍ले (पोयचायुक्त चिकन माती), लोम आहेत. काही जमिनी सॅंडी लोम (वाळूमिश्रित लोम), सॅंड (फक्त वाळू) जसे नदीचे उघडे पडलेले पात्र यामध्ये येतात. मातीचा पोत ओळखण्याची सोपी पद्धत ः बऱ्याच वेळा मातीचे पृथ्थकरण करण्याच्या प्रयोगशाळा दूर जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने माती तपासून घेणे शक्य होत नाही. अशा वेळी शेतातच दोन बोटांतील कणांच्या स्पर्शावरून त्यांच्या प्रमाण प्रकाराबाबत अंदाज घेता येतो. ठराविक स्पर्शावरून ठराविक कणांचे ज्ञान होते. त्यावरून एकंदरीत मातीचा पोत ठरवणे शक्य आहे. २ मिमीपेक्षा कमी व्यासाचे कण असलेली कोणतीही माती चिमूटभर घेऊन किंचित ओली करावी. त्यानंतर ती अंगठा व बोट यामध्ये धरावी. या मातीचा बोटांना होणाऱ्या स्पर्शाकडे लक्ष द्यावे. सरावानंतर हळूहळू अनुमान बरोबर येतात. अनुमान काढण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारावेत.

  1. माती फारच खरबडीत आहे का?
  2. माती सिल्क पीठ किंवा साबणाप्रमाणे मऊ व घसरट आहे का?
  3. माती चिकट आहे का?

वरील प्रकारच्या कमी अधिक स्पर्शाच्या प्रमाणावरून पुढीलप्रमाणे मातीचा पोत ढोबळमानाने ठरविता येतो. त्यासाठी खालील तक्त्यांचा आधार घ्यावा.

खरबडीत सिल्क, साबण, पीठ याप्रमाणे मऊ व घसरट चिकट
स्पर्श/ पोतानुसार असे ठरवता येतात मातीचे प्रकार
वाळू (Sand) : अत्यंत खरबडीत चिकटपणा बिलकुल नाही. गाळवट माती (Loam) : सिल्क साबण पीठ याप्रमाणे मऊ व घसरट चिकन माती (Clay) : माती अत्यंत चिकट मऊपणा व खरखडीतपणा क्वचितच जाणवतो.
वाळुयुक्त पोयटा ( Sandy Loam) : जास्त खरबडीत व थोडी मऊ आणि चिकट पोयटा (Silt) : खरबडीत मऊ व चिकट असे सर्व स्पर्श प्रमाणात जाणवतात. चिकन मातीयुक्त पोयटा ( Silty Clay ) : पोयट्यासारखी, परंतु मातीत चिकटपणाचे प्रमाण जास्त.
पोयटायुक्त वाळू (Loamy Sand) : भयंकर खरबडीत, परंतु अत्यंत कमी प्रमाणात चिकन मातीचे प्रमाण गाळवट पोयटा (Silty Loam) : वरील सर्व स्पर्श जाणवतात, परंतु मऊ व घसरटपणाचा स्पर्श सर्वाधिक प्रमाणात. गाळवट चिकन माती (Clay Loam) : मातीचा मऊपणा व चिकटपणा यांचे समप्रमाण, परंतु खरबडीतपणा अजिबात नाही.
०० गाळवट चिकन मातीयुक्त पोयटा (Silty Clay Loam) : गाळवट पोयट्यासारखी, परंतु माती चकचकीत व चिकट वाटते. ००
वाळुयुक्त चिकन मातीयुक्त पोयटा (Sandy Clay Loam) : पोयट्यात वाळू व चिकन मातीच्या अधिक प्रमाण, त्यामुळे खरबडीत व चिकट स्पर्शाचे प्रमाण जास्त असून, परंतु थोडी मऊसर. गाळवट चिकन माती (Clay Loam) : मातीचा मऊपणा व चिकटपणा यांचे समप्रमाण, परंतु खरबडीतपणा अजिबात नाही. ००

संपर्क ः डॉ. मेहराज अ. शेख, ९९७०३८७२०४ (मृदशास्त्रज्ञ, मृदशास्त्रज्ञ पथक, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com