उत्तम दर्जाचे सोयाबीन वाण ः एमएसीएस ११८८

उत्तम दर्जाचे सोयाबीन वाण ः एमएसीएस ११८८
उत्तम दर्जाचे सोयाबीन वाण ः एमएसीएस ११८८

१९६८ पासून एमएसीएस - आघारकर संशोधन संस्था, पुणे या संस्था सोयाबीन जाती विकसनाचे काम करत असून, आतापर्यंत त्यांनी सोयाबीनच्या आठ जाती प्रसारित केल्या आहेत. आतापर्यंत एमएसीएस १३, एमएसीएस १२४ व एमएसीएस ४५० या जाती शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या आहेत. या वर्षी या  संस्थेने अधिक उत्पादनक्षम ‘एमएसीएस ११८८’ ही मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारी जात प्रसारित केली आहे.

  • मोठ्या आकाराचे दाणे व चांगले उत्पादन देणारी ही जात पांढऱ्या फुलांची, शेंगावर केस (लव) नसणारी, मोठ्या आकाराचे टपोरे दाणे असणारी आहे.
  • पक्व झाल्यानंतर शेंगा फुटण्यास प्रतिबंधक असल्याने काढणीस उशीर झाल्यास शेंगफुटीमुळे नुकसान होत नाही.
  • झाडाचे खोड जाड असल्यामुळे पीक जमिनीवर लोळत नाही. शेंगा जमिनीपासून ५-७ सेंमी. वर लागत असल्याने यंत्राने कापणी करता येते.
  • या जातीच्या झाडाला पाने व फांद्या भरपूर असून, पानगळ झाल्यानंतर जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
  • या जातीचा कालावधी १०५-११० दिवस आहे. शेंगा भरताना पाणी दिल्यास एकरी १५-१६ क्विंटल एवढे उत्पादन पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी घेतले आहे.
  • थोडक्यात ही जात पाण्याची सुविधा असणाऱ्या भागासाठी व सप्टेंबरअखेरपर्यंत पाऊस पडणाऱ्या भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.  
  •  ठळक वैशिष्ट्ये       

  • उत्पादन क्षमता : १२ ते १४ क्विंटल प्रतिएकर
  • कालावधी : ११० दिवस
  • पेरणीचे योग्य अंतर : ४५ x ८ सेमी
  • पेरणीसाठी लागणारे बियाणे : एकरी २२ - २५ किलो.
  • पक्वतेनंतरही शेंगा फुटत नाहीत. बॅक्टेरिअल पुश्चुल, बॅक्टेरिअल लीफ ब्लाइट, चारकोल रॉट इत्यादी रोगांना प्रतिकारक ब्ल्यू बीटल, खोडमाशी, पाने पोखरणारी व पाने गुंडाळणारी अळी इ. किडींना प्रतिकारक.साधारण मोठ्या आकाराचे दाणे. यंत्राने कापणी योग्य जात.
  • (आघारकर संशोधन संस्था, सोरटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com