agricultural stories in Marathi, special yashkath on sericulture, Shridhar Solav from Barbadi dist. Parbhani | Agrowon

दुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली भक्कम साथ
माणिक रासवे
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

सततची दुष्काळी परिस्थिती, गारपीट, बाजारभाव यांची न राहिलेली हमी आदी समस्यांवर बरबडी (जि. परभणी) येथील श्रीधर सोलव यांनी रेशीम शेतीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पुढे ‘चॉकी रेअरिंग’ सुरू केले. आज कोषनिर्मितीपेक्षाही याच व्यवसायातून दुपटीपर्यंत नफा त्यांना मिळतो आहे. दर महिन्याला २० हजार अंडीपुंजांपासून बाल्यावस्थेतील कीटकनिर्मिती करून त्यांचा पुरवठा करण्याची क्षमता सोलव यांनी निर्माण केली आहे.

सततची दुष्काळी परिस्थिती, गारपीट, बाजारभाव यांची न राहिलेली हमी आदी समस्यांवर बरबडी (जि. परभणी) येथील श्रीधर सोलव यांनी रेशीम शेतीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पुढे ‘चॉकी रेअरिंग’ सुरू केले. आज कोषनिर्मितीपेक्षाही याच व्यवसायातून दुपटीपर्यंत नफा त्यांना मिळतो आहे. दर महिन्याला २० हजार अंडीपुंजांपासून बाल्यावस्थेतील कीटकनिर्मिती करून त्यांचा पुरवठा करण्याची क्षमता सोलव यांनी निर्माण केली आहे.

पारंपरिक पिकांना नसलेले बाजारभाव, दुष्काळ न अन्य समस्या लक्षात घेता परभणी जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीसारख्या पूरक व्यवसायाकडे वळले. शेजारील जिल्ह्यातही त्याचा विस्तार झाला. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील सोलव कुटूंबदेखील सन २०११ च्या सुमारास रेशीम शेतीकडे वळले. आज संपूर्ण कुटूंब गेल्या आठ वर्षांच्या अनुभवातून या शेतीत तरबेज झाले आहे.

रेशीम शेतीतून पारंपरिकतेत बदल

बरबडी येथील हरिच्चंद्र आणि मारुती या सोलव बंधूंचे एकत्रित कुटूंब आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाची त्यांची १४ एकर जमीन आहे. सिंचनासाठी तीन विहिरी आहेत. सुमारे ११ एकर जमीन सिंचनाखाली तर तीन एकर कोरडवाहू आहे. पूर्वी सोलव बंधू सोयाबीन, कापूस, हळद, भाजीपाला उत्पादन घेत. दुष्काळी परिस्थितीमुळे खात्रीशीर उत्पन्न मिळत नव्हते. मग पूरक व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.अभ्यास व सल्ल्यातून रेशीम शेतीचा पर्याय पुढे आला. केंद्रिय रेशीम मंडळाच्या परभणी विस्तार केंद्रातील शास्त्रज्ञ ए. जे. कारंडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॅा. सी. बी. लटपटे, रेशीम विकास कार्यालयातील जी. आर. कदम यांनी मग मार्गदर्शन केले.

रेशीम शेतीला सुरवात

सन २०११ मध्ये दोन एकरांत तुतीच्या व्ही वन वाणाची लागवड केली. कीटक संगोपनगृहाची उभारणी केली. पहिली दोन वर्षे चांगले कोष उत्पादन मिळाले. कर्नाटकातील रामनगरम येथे बाजारपेठही मिळाली.

चॉकी संगोपनाची संधी ओळखली

दरम्यानच्या काळात श्रीधर हरिच्चंद्र सोलव यांनी बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेशीम शेतीवरच लक्ष केंद्रित केले. पूर्णा तालुक्यात रेशीम उत्पादकांची संख्या वाढत आहे. रेशीम कीटकांच्या पहिल्या दोन अवस्थांचे संगोपन अत्यंत काळजीपूर्वक व कौशल्याने करावे लागते. त्यात त्रुटी आल्यास कोष उत्पादन व दर्जावर परिणाम होतो. हीच संधी ओळखत श्रीधर यांनी चॉकी रेअरिंग अर्थात बाल्य कीटक संगोपन सुरू करून कीटकांचा शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचे ठरवले.

‘चॉकी रेअरिंग’ दृष्टिक्षेपात

 • केंद्रिय रेशीम मंडळांतर्गत म्हैसूर येथील प्रशिक्षण केंद्रात तीन महिने कालावधीचे ‘चॉकी रेअरिंग’
 • विषयातील प्रशिक्षण
 • सन २०१३ मध्ये ‘चाॅकी रेअरिंग सेंटर’ची उभारणी
 • कोषनिर्मितीचे शेड- ३० बाय २२ फूट. तर चॉकी सेंटर शेड ३० बाय ३० फूट
 • तुतीच्या क्षेत्रात नऊ एकरांपर्यंत वाढ. तुतीची पाने बारीक करण्यासाठी यंत्र.
 • दोन विहिरी आहेत. त्यांचे पाणी सद्यस्थितीत पुरते.

सिमेंट विटांचा पक्का निवारा

बाल्य कीटकांच्या संगोपनासाठी २१ ते २७ अंश सेल्सियस तापमान आवश्यक असते. ते योग्य राखण्यासाठी शेतात पक्क्या विटा, सिमेंटचे छत असलेले शेड बांधले. शिवाय विजेची शेगडी, लाईट याव्दारे तापमान नियंत्रित ठेवले जाते. तापमानाची नोंद घेण्यासाठी शेडमध्ये ‘थर्मामीटर’ बसविण्यात आले आहे. प्लॅस्टिकच्या रॅकमधील ट्रेमध्ये अंडीपूंज ठेवून बाल्य किटकांची वाढ केली जाते.

मागणी प्रमाणे पुरवठा

 • सुरवातीला पूर्णा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील रेशीम उत्पादकांना कीटकांचा पुरवठा केला जात असे. आता परभणी जिल्ह्याच्या सीमांना असलेल्या हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांतून मागणी. वर्षभरात सुमारे ५०० शेतकरी ग्राहकांचे ‘नेटवर्क’
 • चॉकीसाठी शेतकऱ्यांना किमान २० दिवस रेशीम कार्यालयाकडे ‘बुकिंग’ करावे लागते.
 • त्यांच्या मागणीनुसार कार्यालयाकडून सोलव यांच्याकडे अंडीपुंजांचा थेट पुरवठा होतो.
 • सोलव यांच्या सेंटरला मग सुमारे १३ दिवस चॉकी संगोपन केले जाते.
 • त्यानंतर ठरलेल्या तारखेला सोलव संबंधित शेतकऱ्यास वाढ झालेले कीटक उपलब्ध करून देतात.
 • यामुळे नव्या रेशीम उत्पादकांनाही दर्जेदार कोष निर्मिती करणे शक्य झाले आहे.

उत्पादन व अर्थकारण

 • प्रति बॅच सुमारे ५ ते ७ हजार अंडीपुंज उबविता येतात.
 • महिन्यामध्ये सुमारे दोन ते तीन बॅच होतात.
 • एकूण मिळून १५ ते २० हजार अंडीपूंज उबविले जातात.
 • परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील रेशीम उत्पादकांना कीटकांचा
 • पुरवठा
 • प्रति १०० अंडीपुंजांसाठी एक हजार रुपये दर आकारण्यात येतो.
 • केवळ कोषनिर्मिती करून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा या व्यवसायातून दीडपट, दुप्पट ते काहीवेळा अधिकही उत्पन्न मिळत असल्याचे श्रीधर सांगतात.
 • उन्हाळ्यात फेब्रुवारी ते जूनपर्यंत हा व्यवसाय बंद ठेवावा लागतो. आता या काळासाठी अळिंबी व्यवसाय सुरू करण्याचा मानस आहे.

गुंतवणूक

या व्यवसायासाठी सुमारे १५ लाख रूपयांचे भांडवल उभे करावे लागले. त्याचबरोबर चॉकी रेअरिंगसाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागत असल्याचे श्रीधर म्हणाले. एकत्रित कुटूंबातील ११ सदस्य सध्या या व्यवसायात कार्यरत आहेत. तुतीची शेती, पाने तोडणे, कीटकांना खाद्य देणे, स्वच्छता राखणे आदी कामे मिळून करावी लागतात.

श्रीधर सोलव - ८३२९१८१८९८

 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
कमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली...महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत...
कमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय...जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील...
पेरू फळबागेने दिली शेतीला दिशाठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत...
शेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...
थोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेतीपरभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण...
दुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती...शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा...
हुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्गदरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन...
संघर्ष, चिकाटीतून साकारलेला ...जालना जिल्ह्यात कायम दुष्काळी शिरनेर येथील देवराव...
अंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याचे `...कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त...
अभ्यास, योग्य नियोजनातून प्रक्रिया...शेतीमाल प्रक्रियेतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो,...