या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या लागोपाठच्या महिन्यांतील पौर्णिमांना चंद्र सुपरमू
शेडनेट पिके
तारगाव हे कोरेगाव तालुक्यातील गाव. या गावशिवारात कृष्णा नदी असल्याने शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध असते. गावातील दिलीप बाबासाहेब मोरे हे प्रगतशील शेतकरी.
तारगाव हे कोरेगाव तालुक्यातील गाव. या गावशिवारात कृष्णा नदी असल्याने शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध असते. गावातील दिलीप बाबासाहेब मोरे हे प्रगतशील शेतकरी.
दिलीप मोरे यांचे वडील बाबासाहेब हे १९८५ पासून खुल्या क्षेत्रात ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत असल्यामुळे या पिकाच्या व्यवस्थापनाबाबतचा चांगला अनुभव दिलीप मोरे यांच्याकडे होतात. शहरी बाजारपेठेत रंगीत ढोबळी मिरचीची मागणी लक्षात घेऊन मोरे यांनी गेल्या दहा वर्षांपासून खुल्या क्षेत्राऐवजी पॉलिहाउसमध्ये रंगीत ढोबळी मिरची लागवडीस सुरवात केली. मोरे यांची पाच गुंठ्यांची दोन पॉलिहाउस आहेत. वर्षभर मिरचीचे उत्पादन मिळण्यासाठी मोरे दोन टप्प्यात ढोबळी मिरचीची लागवड करतात.
असे आहे पीक नियोजन
- बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जानेवारी आणि जुलै महिन्यात लागवड.
- लागवडपूर्वी प्रत्येक पॉलिहाउसमधील मातीमध्ये शेणखत चांगल्याप्रकारे मिसळून साडेचार फुटाचे गादीवाफे तयार केले जातात. त्यानंतर ठिबक लॅटरल अंथरली जाते.
- दोन रोपात दोन फूट आणि दोन ओळीत दीड फूट अंतर ठेवले जाते. पाच गुंठे क्षेत्रात ११०० रोपांची लागवड केली जाते.
- लागवडीनंतर आठ दिवसांनी आळवणी दिली जाते. याचबरोबरीने पीकवाढीच्या टप्प्यानुसार एक आड एक दिवस विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते.
- फळ लागेपर्यंत दर पंधरा दिवसांच्या अंतराने ठिबक सिंचनातून जीवामृत दिले जाते.
- एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रणावर भर दिला आहे. शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली जाते. याचबरोबरीने कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर केला जातो.
- लागवड केल्यानंतर तीन महिन्यांनी लाल, पिवळ्या ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू होऊन पुढे सहा महिने उत्पादन मिळते. पाच गुंठे क्षेत्रांतून सुमारे तीन टन उत्पादन मिळते.
- पॉलिहाउसमधील पीक व्यवस्थापनाची सर्व कामे कुटुंबातील सदस्य करत असल्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. पीकवाढीच्या टप्प्यात प्रत्येकाचे लक्ष असल्याने मिरचीचे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. त्यामुळे नफ्यात वाढ होते.
मिळवली खात्रीची बाजारपेठ
बॉक्समध्ये दहा किलो ढोबळी मिरची पॅकिंग करून मुंबईतील हॅाटेल व्यवसायिकांना पाठविली जाते. वर्षभर पुरवठ्याचे नियोजन केले असल्याने मागणीनुसार पुरवठा केला जातो. आत्तापर्यंत प्रतिकिलोस सरासरी ३० ते १२० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. रंगीत ढोबळी मिरचीला डिसेंबर, जानेवारी महिन्यांत चांगला दर मिळतो.
- दिलीप मोरे,९४०३६८६०३०