महिलांचे कष्ट कमी करणारे मका सोलणी यंत्र

महिलांचे कष्ट कमी करणारे मका सोलणी यंत्र
महिलांचे कष्ट कमी करणारे मका सोलणी यंत्र

मक्याची सोलणी करणे तसे कष्टप्रद काम असते. हे काम मुख्यतः महिला मजुरांकडून केले जाते. महिला मजुरांचे कष्ट कमी करण्यासाठी भुवनेश्वर येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय महिला कृषी संस्थेने मक्याचे कणीस सोलण्यासाठी अाणि दाणे काढण्यासाठी मका सोलणी यंत्र विकसित केले अाहे. या यंत्रामुळे मका सोलणीचे काम बऱ्याच प्रमाणात सोपे होणार अाहे.

यंत्राची वैशिष्ट्ये

  • हे यंत्र दोन मजुरांद्वारे चालवता येते. या यंत्राद्वारे एक हेक्टर क्षेत्रावरिल कणसापासून ८९.६ किलो सोललेली मका मिळते.
  • हे यंत्र पुरुष मजुरांद्वारे ५७ आरपीएम (रीव्हॉल्युशन प्रती मिनीट) वेगाने चालविल्यानंतर हेक्टरी ८९.६ किलो सोललेले मक्याचे दाणे मिळतात. तर महिला मजुरांद्वारे ५२ आरपीएम (रीव्हॉल्युशन प्रती मिनीट) वेगाने चालविल्यानंतर हेक्टरी ६३.४ किलो सोललेले मक्याचे दाणे मिळतात.
  • हाताने कणीस सोलणे अाणि दाणे काढण्यासाठी लागणाऱ्या कष्टाच्या तुलनेत या यंत्रामुळे ४८.९ टक्के कष्ट कमी होते. तर हाताने सोलणी करणे अाणि छोट्या मका सोलणी यंत्राने दाणे काढण्याच्या तुलनेत ३८.७ टक्के कष्ट कमी होते.
  • हे यंत्र ३७० वॅटच्या सिंगल फेजवर चालणाऱ्या मोटारद्वारेही चालवता येते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com