Agricultural stories in marathi, tree plantation programme in Banapur,Dist.Sangli | Agrowon

बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर चिंच लागवड
सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या क्षेत्रातील ४१ एकर गायरान जमिनीवरती सप्टेंबर महिन्यात चार हजार रोपांची लागवड करून वनीकरणाला चालना दिली. मात्र सध्या पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे रोपे जगणे कठीण होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच सुरेखा शिंदे यांनी स्वखर्चाने टँकरने पाणी आणून रोपांना देण्यास सुरवात केली आहे.

खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या क्षेत्रातील ४१ एकर गायरान जमिनीवरती सप्टेंबर महिन्यात चार हजार रोपांची लागवड करून वनीकरणाला चालना दिली. मात्र सध्या पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे रोपे जगणे कठीण होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच सुरेखा शिंदे यांनी स्वखर्चाने टँकरने पाणी आणून रोपांना देण्यास सुरवात केली आहे.

लोकसहभागातून वनीकरण
सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे बेणापूर हे गाव आहे. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने आदर्श काम करण्याचा ध्यास जपला आहे. ग्रामपंचायतीच्या गायरान क्षेत्रातील ४१ एकर जमीन नुसते दगड धोंड्याचे माळरान आहे. या माळरानावर ग्रामस्थांनी श्रमदानातून चिंच, गुलमोहर, शिरस, कडूलिंब इत्यादी झाडे लावून नंदनवन फुलवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सरपंच सुरेखा शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य आणि लोकवर्गणीतून वृक्षारोपणाचे काम झाले आहे. लागवड केलेल्या चार हजार रोपांपैकी ३,५०० रोपे चिंचेची आहेत. उरलेल्या पाचशे रोपांमध्ये गुलमोहर, शिरस, कडूलिंबाचा समावेश आहे. चिंचेच्या रोपांची जास्त प्रमाणात लागवड करण्यामागचा उद्देश म्हणजे भविष्यकाळात चिंचेपासून ग्रामपंचायतीला चांगले उत्पन्न मिळणार आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येक रोप जगवण्यासाठी पाणी आणि खतमात्रा देण्यात येत असल्याची माहिती सचिन शिंदे यांनी दिली.

घाटमाथ्यावर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड झाली आहे. या माळावरती सुरवातीला पावसाचे पाणी अडवण्यासाठी मोठ्या सरी काढण्यात आल्या. त्याच सरीमध्ये खड्डे काढून त्यामध्ये चांगल्या प्रतीची काळी व तांबडी माती भरण्यात आली. बहुतांशी ठिकाणी दगड होते ते बाजूला करून संपूर्ण माळरानावरती रोपांची लागवड करण्यात आली. माळरानावर रोप लागवडीसाठी झालेला खर्च हा ग्रामपंचायत नफा फंड, सरपंच, सदस्य व लोकवर्गणीतून करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामपंचायतीने गायरानामध्ये लागवड केलेल्या रोपांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये टॅंकरने पाणी आणून लागवड केलेल्या रोपांना देण्यात येत आहे. सध्या रोपे जगविण्यासाठी शासनाने मदत करावी अशी ग्रामस्थांनीची मागणी आहे.

इतर ग्रामविकास
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
गळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्यसध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर...
विविध उपक्रमांच्या माध्यमातून माणगाव...कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या ग्रामस्थांनी...
योग्य ठिकाणीच करा पाझर तलावपाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...
कडवंची : एकात्मिक पाणलोटातून पाणी,...पाणलोटाची जी कामे आम्ही करतो ती मृद संधारणावर...
कडवंची : ग्रामविकासाचे सूत्र : जल अन्...गाव आणि शेती विकासामध्ये ग्रामपंचायत हा...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
लोकसहभाग, श्रमदानातून लोहसर झाले ‘आदर्श...नगर जिल्ह्यातील लोहसर (खांडगाव) येथील गावकऱ्यांनी...
भूजलाची कल्पना अन्‌ वास्तवपाणीटंचाई सुरू झाली की त्यावर उपाय करताना आपण...
दुष्काळातही शिवार समृद्ध करण्याचे...पिकांची विविधता, पूरक उद्योगांचेही वैविध्य,...
अल्पभूधारक, भूमिहीन महिलांना बचतगटातून...बेल्हेकरवाडी (ता. नेवासा,जि.नगर) मधील तुकारामनगर...
मोनेरा फाउंडेशन देतेय पर्यावरण, शिक्षण...परिसरातील पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती हा...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत १३०... राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत हिंगोली...