Agricultural stories in marathi, tree plantation programme in Dongargan, Dist. Nagar | Agrowon

सांडपाण्यावर जगवणार दोन हजार झाडे
चंद्रभान झरेकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नगर : डोंगरगण (जि. नगर) येथील ग्रामस्थ दोन हजार रोपांची लागवड करून ही झाडे घराघरांतील सांडपाण्यावर जगविणार आहेत. तसा ठराव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला असून, आठशे रोपांची लागवड पूर्ण झाली आहे.

नगर : डोंगरगण (जि. नगर) येथील ग्रामस्थ दोन हजार रोपांची लागवड करून ही झाडे घराघरांतील सांडपाण्यावर जगविणार आहेत. तसा ठराव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला असून, आठशे रोपांची लागवड पूर्ण झाली आहे.

सरपंच कैलास पटारे यांनी ग्रामसभेत ठराव घेऊन, ग्रामपंचायतीतर्फे दोन हजार झाडांची रोपे पुरविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गावातील तरुणांची एक समिती स्थापन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ स्वतःच्या घरासमोरील शोषखड्ड्याजवळ दोन रोपांची लागवड करीत आहेत. यामध्ये सीताफळ, पेरू, चिंच, लिंब, आवळा, रेन-ट्री, कांचन, लक्ष्मीतरू, बहावा, तसेच काही शोभिवंत झाडेही आहेत. पेमराज सारडा महाविद्यालय व न्यू लॉ कॉलेजचे हिवाळी शिबिर गावामध्ये सुरू असल्याने विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावशिवारातील रामेश्‍वर मंदिर, शरभंगऋषी आश्रम परिसर, सीता न्हाणी, हनुमान मंदिर परिसरातही वृक्षलागवड केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डोंगरगणकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. गाव परिसरात भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे. रामेश्‍वर देवस्थान परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. डोंगरगण येथे श्रीरामेश्‍वराचे देवस्थान असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच हे ठिकाण पर्यटनासाठीही चांगले असल्याने नगर शहरातील नागरिक सुटीच्या दिवशी येथे गर्दी करतात. श्रीरामेश्‍वर मंदिर, शरभंगऋषी, सीता न्हाणी, आनंद दरी, हवा महाल, दावलमालिक गड, गोरक्षनाथ गड तसेच नगर व राहुरी तालुक्‍याला जोडणारा डोंगरगण घाट आहे. येथे पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात. या परिसरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केल्याने पुन्हा एकदा हा परिसर निसर्गरम्य झाला आहे.
 
ग्रामस्थांनी झाडे घेतली दत्तक 
यापूर्वीच्या ग्रामपंचायतीतर्फे गावामध्ये लावलेल्या पाचशे झाडांना ग्रामस्थांनी दत्तक घेतले असून, प्रत्येकाने ती जगविली आहेत. हनुमान मंदिर परिसरात यापूर्वी लावलेल्या पाचशे झाडांची चांगली वाढ होत आहे. गावठाण हद्दीतही दोन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीची मोहीम राबविली होती. त्यांतील आठशे झाडे ग्रामस्थांनी जगविली आहेत. कुटुंबातील एखाद्या व्यक्‍तीचे निधन झाल्यानंतर तिच्या स्मरणार्थ गावठाण हद्दीत एक रोप लावून त्याचे संगोपन करणे हा उपक्रम पाच वर्षांपासून डोंगरगणमध्ये सुरू आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या योग्य नियोजनामुळे डोंगरगण गावठाण हद्दीत जवळपास अडीच हजार रोपांची चांगली वाढ झालेली आहे.
 
"पाच वर्षांपासून डोंगरगणमध्ये वृक्षलागवड सुरू आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थांना संघटित करून हा उपक्रम यशस्वी झाला. डोंगरगण परिसरात आजपर्यंत सुमारे दोन हजार रोपांची चांगली वाढ झालेली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वृक्षलागवडीचा उपक्रम यशस्वी होत आहे. ''
- राधाकिसन भुतकर, रामेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, डोंगरगण 

इतर ग्रामविकास
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
गळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्यसध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर...
विविध उपक्रमांच्या माध्यमातून माणगाव...कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या ग्रामस्थांनी...
योग्य ठिकाणीच करा पाझर तलावपाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...
कडवंची : एकात्मिक पाणलोटातून पाणी,...पाणलोटाची जी कामे आम्ही करतो ती मृद संधारणावर...
कडवंची : ग्रामविकासाचे सूत्र : जल अन्...गाव आणि शेती विकासामध्ये ग्रामपंचायत हा...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
लोकसहभाग, श्रमदानातून लोहसर झाले ‘आदर्श...नगर जिल्ह्यातील लोहसर (खांडगाव) येथील गावकऱ्यांनी...
भूजलाची कल्पना अन्‌ वास्तवपाणीटंचाई सुरू झाली की त्यावर उपाय करताना आपण...
दुष्काळातही शिवार समृद्ध करण्याचे...पिकांची विविधता, पूरक उद्योगांचेही वैविध्य,...
अल्पभूधारक, भूमिहीन महिलांना बचतगटातून...बेल्हेकरवाडी (ता. नेवासा,जि.नगर) मधील तुकारामनगर...
मोनेरा फाउंडेशन देतेय पर्यावरण, शिक्षण...परिसरातील पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती हा...