पुदिन्याचा वापर औषधेनिर्मितीमध्ये होतो.
पुदिन्याचा वापर औषधेनिर्मितीमध्ये होतो.

औषधी, अन्न प्रक्रियेसाठी पुदिना उपयुक्त

पुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक  व वातानुलोमन करणारी आहे. पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिन्यामध्ये असलेले तंतुमय घटक आपले चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. यामधील उपलब्ध मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात.

पुदिना ही आयुर्वेदिक औषधी आणि सुगंधी वनस्पती  आहे. जगात सर्वत्र पुदिनाच्या १३ ते १८ जाती असून भारतात  मेंथा अर्व्हेन्सिस  याव्यतिरिक्त आणखी ५ जाती आढळतात. पुदिना ही मूळची यूरोप, पश्‍चिम व मध्य आशिया येथील आहे. पुदिन्याचे रोप ६० सेंमी.पर्यंत उभे वाढते. जमिनीलगत किंवा जमिनीखाली फुटलेल्या फांद्यांनी ते पसरते. खोड जांभळे व स्तंभ चौकोनी असून पाने साधी, समोरासमोर, अंडाकृती किंवा लंबगोल असतात.

  • पानांचा रंग गडद हिरवा असून त्यांच्या कडा दंतूर असतात. तळाची पाने काहीशी केसाळ किंवा केशहीन असतात.
  • फुले जांभळी व पानांच्या बगलेत फुलोऱ्यामध्ये येतात. जमिनीलगत फुटलेल्या फांद्यांचे तुकडे वापरून पुदिन्याचे शाकीय पुनरुत्पादन करता येते.
  • पदार्थाला चांगली चव व विशिष्ट गंध येण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पदार्थाची चव वाढवण्याबरोबरच तो पदार्थ आरोग्यपूर्ण बनवण्याचे काम पुदिना करतो.
  • पाणीपुरी, कैरीची चटणी, जलजीरा आदींमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे.
  • पुदिन्याचे फायदे आणि औषधी गुणधर्म

  • आयुर्वेदानुसार पुदिना हा पाचक, रुचकर स्वादप्रिय, हृदय, उष्ण वात व कफ दोषहारक व कृमीनाशक आहे. पदिना उत्तेजक, वायुनाशी व आकडीरोधक आहे.
  • पानांपासून शामक चहा करतात; तसेच अल्कोहॉलयुक्त पेयही पानांपासून करतात. विषावर उतारा म्हणून देतात.
  • गर्भारपणातील ओकाऱ्यांवर आणि लहान मुलांच्या तक्रारीवर पुदिन्याचा फांट[औषधिकल्प] साखर घालून देतात.
  • ताप आणि श्वासनलिकादाह यांवरही पुदिना गुणकारी आहे. पानांना विशिष्ट सुगंधीपणा व काहीशी तिखट चव असते.  
  • पुदिन्याचा वापर अनेक प्रतिजैविकांमध्ये केला जातो.
  • उन्हाळ्यात जेवणासोबत पुदिन्याची चटणी खूप लाभदायक असते. पुदिना औषधी गुणांसोबत आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेवर चमक आणण्यासाठी खूप लाभदायक आहे.  
  • पुदिन्यामध्ये असलेले तंतूमय घटक आपले कोलेस्ट्रॉल(चरबी) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. यामधील उपलब्ध  मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात.
  • जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला दिल्यास उलटी थांबते. त्याला बरे वाटेल.
  • जर आपल्याला पोटासंबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.  
  • सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्यावा. त्यात काळी मिरी आणि थोडे काळे मीठ मिसळा. ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळवून तो प्यावा. हा काढा सर्दी, खोकला, तापावर गुणकारी आहे.
  • जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर पुदिन्याची पाने खायला द्यावीत. त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.
  • जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून घेऊन लावावीत. यामुळे जखम लवकर भरते.
  • जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजी पुदिन्याची पाने वाटावीत. हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाला असेल तेथे लावावा. आपल्याला लगेच आराम मिळेल.  
  • तोंडाला  वास येत असेल तर पुदिन्याची पाने सुकवून त्याचे चूर्ण बनवावे. याचा मशेरी सारखा वापर करावा. असे केल्याने हिरड्या मजबूत होतात. तोंडाची दुर्गंधी बंद होते.
  • पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुळण्या कराव्यात. असे केल्याने आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.
  •  उष्णतेच्या दिवसांत अस्वस्थ होते. यावर उपचार म्हणजे पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा. हे पाणी गार झाल्यावर प्यावे, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल.
  • कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसासोबत मिसळवून प्यायल्याने आराम मिळतो.
  • पुदिन्याची पाने आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरू शकते.
  • पुदिन्यातील विशेष घटक

  • पुदिन्यामध्ये मेन्थॉल हा प्रमुख घटक ऍनेस्थेटीक, अँटिसेप्टिक आणि एंटी-इंफ्लॅमेटरी सारखे आहे. एस्कोरबिक ॲसिड, हे शुद्ध  जीवनसत्त्व सी आहे, जे चेहरा कोमल आणि ताजे ठेवण्यात मदत करते.
  • कॅरोटीन हे त्वचेच्या लवचिकतेसाठी जबाबदार असलेले जीवनसत्त्व आणि टॉनिकसारखे उपयुक्त आहे.
  • फ्लॅव्होनॉइड्स हे त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करतात. ते पेशी नूतनीकरणासाठी उपयुक्त आहे.
  • - कुंती कच्छवे, ९५१८३९७९७४   

    (अन्न रसायन आणि पोषण विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)       

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com