agricultural stories in Marathi, weed control phases in crop | Agrowon

ओळखा तणांचा स्पर्धाक्षम संवेदनशील काळ
राजीव साठे
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

पिकाच्या तण स्पर्धाक्षम संवेदनशील काळात शेत तणविरहित ठेवल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळू शकते. बहुतांश पिकांसाठी हा कालावधी लागवडीनंतर ३० दिवसांचा असतो.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. पावसाचे प्रमाण योग्य राहिल्यास कोरडवाहू शेतीमधूनही चांगले उत्पन्न मिळण्याची आशा असते. मात्र, या हंगामामध्ये पावसाळी वातावरणामध्ये तणांचे प्रमाण वाढते. त्याच प्रमाणे रोग व किडींचा प्रादुर्भावही वाढतो. या दोन्ही घटकांचे नियंत्रण करण्यामध्ये शेतकऱ्यांचा कस लागतो. तणापासून सर्वात जास्त आर्थिक नुकसान होते.

पिकाच्या तण स्पर्धाक्षम संवेदनशील काळात शेत तणविरहित ठेवल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळू शकते. बहुतांश पिकांसाठी हा कालावधी लागवडीनंतर ३० दिवसांचा असतो.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. पावसाचे प्रमाण योग्य राहिल्यास कोरडवाहू शेतीमधूनही चांगले उत्पन्न मिळण्याची आशा असते. मात्र, या हंगामामध्ये पावसाळी वातावरणामध्ये तणांचे प्रमाण वाढते. त्याच प्रमाणे रोग व किडींचा प्रादुर्भावही वाढतो. या दोन्ही घटकांचे नियंत्रण करण्यामध्ये शेतकऱ्यांचा कस लागतो. तणापासून सर्वात जास्त आर्थिक नुकसान होते.

केवळ तण काढून टाकणे म्हणजे तण नियंत्रणाचा एक प्रकार झाला. त्या सोबतच या पुढे तण कसे होणार नाही, याबाबत विचार करण्याची आवश्यकता असते. पिकांना कोणतीही इजा न होता तण कमी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी पिकांच्या वाढीच्या अवस्था व तण नियंत्रण यांची सांगड घालावी लागते.

तणांची पिकांसोबत स्पर्धा :
तण हे मुख्य पिकांसोबत स्वतःच्या वाढीसाठी पाणी, हवा, सूर्यप्रकाश, कार्बन डाय ऑक्साईड व जागा यासाठी स्पर्धा करत असते. यातून पिकाला उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये व वाढीसाठी लागणाऱ्या मूलभूत घटक स्वतःसाठी घेतात.

तणांचा स्पर्धाक्षम संवेदनशील काळ :
हा कालावधी एकूण पीकवाढीच्या कालावधीच्या तुलनेत कमी असतो. या कालावधीत शेत तणमुक्त ठेवल्यास पुढे पिकांच्या उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही. या काळात तण नियंत्रण करण्यासाठी खुरपणी, कोळपणी वा तणनाशकाचा शिफारशीप्रमाणे वापर करावा लागतो. हे उपाय वेळीच योजल्यास आपले पीक पूर्ण हंगामामध्ये तणविरहित ठेवल्यासारखी स्थिती तयार होते. परिणामी उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळते.
-हा काळ बहुतांश पिकांमध्ये पीकवाढीच्या सुरवातीच्या टप्प्यात असतो. लागवड ते लागवडीनंतरचे ३० दिवस तण स्पर्धाक्षम संवेदनशील काळ असतो.
- पिकांचा पूर्ण कालावधी १०० दिवसांचा असल्यास, लागवडीपासून ३५ दिवस हे पीक तणविरहित ठेवल्यास फायदा होतो.

तण नियंत्रणाचा स्पर्धाक्षम संवेदनशील काळ

 
 

पिके संवेदनशील काळ (पेरणी नंतरचे दिवस) उत्पन्नात घट (%)
तृणधान्ये    
पेरणी केलेला (भात) १५-४५  १५-९०
पुनर्लागवड केलेला (भात) ३०-४५ १५-४०
गहू ३०-४५  २०-४०
मका १५-४५ ४०-६०
ज्वारी १५-४५ १५-४०
बाजरी ३०-४५ १५-६०
कडधान्ये    
तूर १५-६० २०-४०
मुग १५-३० २५-५०
उडीद १५-३० ३०-५०
चवळी ३०-६० १५-२५
हरभरा ३०-४५ २०-३०
वाटाणा ३०-४५ २०-३०
मसूर ३०-६० २०-३०
गळीतधान्ये    
सोयाबीन २०-४५ ४०-६०
भुईमूग ३०-५०  ४०-५०
सूर्यफुल ३०-४५  ३०-५०
एरंडी ३०-६० ३०-३५
करडई १५-४५ ३५-६०
तीळ १५-४५ १५-४०
मोहरी १५-४० १५-३०
जवस २०-४५ ३०-४०
भाजीपाला पिके    
कोबी ३०-४५ ५०-६०
फुलकोबी ३०-४५  ५०-६०
भेंडी १५-३० ४०-५०
टोमॅटो ३०-४५ ४०-७०
कांदा ३०-७५ ६०-७०
नगदी पिके    
ऊस ३०-१२० २०-३०
बटाटा २०-४० ३०-६०
कापूस १५-६० ४०-५०
ताग ३०-४५ ५०-८०

राजीव साठे, ९४२३७२१८९४
(लेखक महात्मा फुल कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी विद्या विभागामध्ये आचार्य पदवी घेत आहेत.)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...