agricultural stories in Marathi, weekly weather forcast | Agrowon

उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस अनुकूल
डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 18 मे 2019

महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. याचाच अर्थ असा की पूर्व भागात उष्णतेच्या लाटा जाणवतील. तापमान वाढेल. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. पश्‍चिम महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहील. दिनांक २३ रोजी तापमान अधिक असेल. दिनांक २४ मे रोजी मान्सून वाऱ्यासाठी पश्‍चिम किनारपट्टी आणि दक्षिण भारतातील हवेचे दाब अत्यंत अनकूल बनतील. दिनांक २५ व २६ मे रोजी पश्‍चिम किनारपट्टीत पाऊस होईल.

महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. याचाच अर्थ असा की पूर्व भागात उष्णतेच्या लाटा जाणवतील. तापमान वाढेल. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. पश्‍चिम महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहील. दिनांक २३ रोजी तापमान अधिक असेल. दिनांक २४ मे रोजी मान्सून वाऱ्यासाठी पश्‍चिम किनारपट्टी आणि दक्षिण भारतातील हवेचे दाब अत्यंत अनकूल बनतील. दिनांक २५ व २६ मे रोजी पश्‍चिम किनारपट्टीत पाऊस होईल.

कोकण
रायगड जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस कोकणातील सर्वच जिल्ह्यात राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३० टक्के राहील.

मराठवाडा
 नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील. लातूर व परभणी जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड व जालना जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील आणि हिंगोली जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यात आकाश निरभ्र राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ टक्के राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ती ५९ टक्के राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ५७ टक्के तसेच बीड जिल्ह्यात ५८ टक्के आणि नांदेड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड जिल्ह्यात २४ टक्के राहील, तसेच जालना जिल्ह्यात ती २६ टक्के राहील आणि जालना जिल्ह्यात ती २७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात ९ टक्के, नांदेड जिल्ह्यात १० टक्के, बीड व परभणी जिल्ह्यांत १२ ते १३ टक्के, लातूर व हिंगोली जिल्ह्यांत १४ टक्के व जालना जिल्ह्यांत १५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे मराठवाड्यातील हवामान अत्यंत कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील; तर धुळे जिल्ह्यात ते ४२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे जिल्ह्यात ते ४२ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तसेच नंदूरबार जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७१ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. धुळे जिल्ह्यात वायव्येकडून आणि जळगाव जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ
 अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील, तर वाशीम जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा व वाशीम जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. अकोला जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २८ टक्के राहील; वाशीम जिल्ह्यात ती ३० टक्के तसेच बुलढाणा जिल्ह्यात ३३ टक्के राहील आणि अमरावती जिल्ह्यात ३८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यातच १२ टक्के, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांत २० टक्के व अमरावती जिल्ह्यात २३ टक्के राहील.

मध्य विदर्भ
 यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. तर वर्ध्यात ते ४६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के सर्वच जिल्ह्यांत राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअस राहील, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात ते ४५ अंश सेल्सिअस राहील तर गोंदिया जिल्ह्यात ते ४४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस आणि गोंदिया जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १८ टक्के राहील तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ टक्के राहील. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ टक्के इतके कमी राहील तर भंडारा जिल्ह्यात केवळ १४ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तसेच कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६९ टक्के सांगली जिल्ह्यात ५६ ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सोलापूर जिल्ह्यात २६ टक्के राहील. तर सांगली जिल्ह्यात ती २४ टक्के राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २१ टक्के राहील. तसेच, सातारा व अहमदनगर जिल्ह्यांत दुुपारची सापेक्ष आर्द्रता २२ टक्के राहील.

कृषी सल्ला

  • मॉन्सून पाऊस वेळेवर दाखल होणे शक्‍य असल्याने पूर्वमशागतीच्या कामांना वेग देणे गरजेचे आहे.
  • भात रोपवाटिका तयार कराव्यात. गादीवाफे तयार कराव्यात. एक हेक्‍टर भात लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रावर ३५ ते ४० किलो बियाणे पेरावे. गादीवाफ्यास योग्य प्रमाणात शेणखत व रासायनिक खते द्यावीत. ती मातीत मिसळावी. पावसाचा अंदाज बघून पेरणी करावी.
  • पावसाळा सुरू होताना जनावरांना लसीकरण करावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...