तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे पवन ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ

तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे पवन ऊर्जा  कार्यक्षमतेत वाढ
तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे पवन ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ

अमेरिकेमध्ये गेल्या दशकामध्ये तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे पवन ऊर्जा उद्योगांतील कार्यक्षमता वाढली असून, २०१७ मध्ये एकूण ऊर्जानिर्मितीमध्ये पवन ऊर्जेचा वाटा २५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. अमेरिकेमध्ये नव्याने उभारल्या जाणाऱ्या पवनऊर्जा प्रकल्पासाठी सरासरी २ सेंट्स प्रति किलोवॉट-आवर (kWh) असा दर दिला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झाल्‍याने पवन ऊर्जा उत्पादनाच्या खर्चात कपात झाली असताना हा दर चांगला असल्याचे मत लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी व अमेरिकेच्या उर्जा विभागाने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालात व्यक्त केले आहे. विशेषतः मध्य अमेरिकेमध्ये पवन ऊर्जेचे दरांना करामधील सवलतींचा आधार असल्याने किमान पातळीवर आहेत. पवन ऊर्जा हा पर्याय सर्वात कमी किमतीचा असल्याचे बर्कले लॅबचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रायन वायसर यांनी सांगितले. विद्युत ऊर्जा बाजारपेठ आणि धोरण गटाच्या वतीने अमेरिकी ऊर्जा विभागाच्या पवन ऊर्जा तंत्रज्ञान बाजारपेठ अहवाल प्रकाशित करण्यात आला. अहवालातील महत्त्वाचे...

  • २०१७ मध्येही पवन ऊर्जेच्या क्षमतेमध्ये वृद्धी कायम राहिली. देशभर पवनऊर्जा क्षमता ही ७०१७ मेगावॉट्स अशी असून, नव्या प्रकल्पामध्ये ११ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली.
  • २०१७ मध्ये एकूण अमेरिकन ऊर्जानिर्मितीमध्ये पवन ऊर्जेचा वाटा २५ टक्के होता. एकूण विद्युत पुरवठ्याच्या ६.३ टक्के वाटा पवनऊर्जेने व्यापला. चौदा राज्यांमध्ये हे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक होते. आयोवा, कान्सास, ओक्लोहामा आणि साऊथ डाकोटा या चार राज्यांमध्ये हेच प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक होते.
  • मोठ्या टर्बाईनमुळे पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यक्षमतेमध्ये झालेली वाढ ः

    1. २०१७ मध्ये अमेरिकेत नव्याने उभारलेल्या प्रकल्पात टर्बाईनची क्षमता २.३२ मेगावॉट असून, मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांने जास्त आहे, तर १९९८-९९ च्या तुलनेमध्ये २२४ टक्क्याने अधिक आहे.
    2. २०१७ मध्ये सरासरी रोटर व्यास हा ११३ मीटर आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ४ टक्क्याने अधिक आहे, तर १९९८-९९ च्या तुलनेमध्ये १३५ टक्क्याने अधिक आहे.
    3. २०१७ मधील हबची सरासरी उंची ८६ मीटर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ४ टक्क्याने अधिक असून, १९९८-९९ च्या तुलनेमध्ये ५४ टक्क्याने अधिक आहे. फेडरल अॅव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडे परवानगीसाठी आलेल्या अर्जानुसार यापेक्षाही अधिक उंचीच्या टर्बाईन उभारल्या जाण्याची शक्यता आहे.
    4. वाढलेल्या रोटर व्यासामुळे पवन ऊर्जा प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ झाली. २०१४ पासून २०१६ पर्यंत उभारल्या गेल्या पवन ऊर्जा क्षमता ४२ टक्के होत्या. (तुलनेसाठी २००४ ते २०११ या काळातील सरासरी क्षमता ३१.५ टक्के, तर १९९८ ते २००१ या काळातील सरासरी क्षमता २३.५ टक्के इतकी होती.)
    5. विंड टर्बाईनच्या किमती (७५० ते ९५० डॉलर प्रति किलोवॉट) एकूण प्रकल्प किमतीच्या तुलनेत वेगाने कमी होत गेल्या. पवन ऊर्जा प्रकल्पाच्या एकूण सरासरी उभारणीचा खर्च २०१७ मध्ये १६१० डॉलर प्रतिकिलोवॉट इतका होता. २००९ ते २०१० या महत्त्वाच्या काळात हाच खर्च ७९५ डॉलर प्रतिकिलोवॉट होता.
    6. पवन ऊर्जेची किंमत कमी राहिली असली तरी प्रकल्पाची कार्यक्षमता वाढत असतानाच उभारणीचा खर्चही कमी झाला. २००९ मध्ये प्रतिकिलो वॉट आवरला ७ सेंट इतका नफा राह्यचा, तो कमी होऊन २ सेंटच्या दरम्यान आला आहे. कमी किमतीमुळे पारंपरिक विद्युत ऊर्जासाधनांच्या तुलनेमध्ये पवन ऊर्जेला मागणीही अधिक राहिली.
  • पवन ऊर्जा उपकरणाच्या स्थानिक पुरवठा साखळीमध्येही वैविध्य राहिले.
  • २०१७ मध्ये पवन ऊर्जा उद्योगामध्ये कार्यरत पूर्णवेळ मनुष्यबळ हे सर्वाधिक पातळीवर (१०५,५०० कामगार) पोचले.
  • २०१७ मध्ये नव्याने उभारल्या गेलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये स्थानिक उत्पादित घटकांचा वाटा मोठा होता. उदा. नॅसेल्ले असेंब्ली ९० टक्क्यांपेक्षा अधिक, टॉवर ७० ते ९० टक्के, पाते आणि हब (५० ते ७० टक्के).
  • टर्बाईनमधील अंतर्गत घटकांमध्ये हाच स्थानिक वाटा २० टक्क्यापेक्षा कमी होता.
  • गेल्या दशकांमध्ये टर्बाईन उत्पादन उद्योग बंद होण्याचे प्रमाण अधिक असले तरी अमेरिकन बाजारपेठेमध्ये सर्वात मोठे तीन पुरवठादार (वेस्ताज, जनरल इलेक्ट्रीक कंपनी, सिमेन्स गॅमेसा) हे अमेरिकन आहेत.
  • या अहवालासाठी अमेरिकी ऊर्जा विभागाच्या ऊर्जा कार्यक्षमता आणि अपारंपरिक ऊर्जा विभागाचे आर्थिक साह्य मिळाले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com