agricultural stories in marathi,agro special, jaggery market story | Agrowon

दर्जेदार गुळासाठी प्रसिद्ध सांगलीची बाजारपेठ
अभिजित डाके
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

सांगलीची बाजार समिती हळद, बेदाण्यासाठी देशात प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर दर्जेदार गुळासाठीही ही बाजारपेठ अग्रेसर ठरू लागली आहे. इथे वर्षभर सौदे सुररू असल्याने गुळाला राज्यासह विविध राज्यांतही मोठ्या प्रमाणात मागणी असते. विशेष करून गणपती, दिवाळी आदी सणांना मागणी व त्याचबरोबरच दरही वाढून गूळ उत्पादकांना त्याचा फायदा मिळतो.

सांगलीची बाजार समिती हळद, बेदाण्यासाठी देशात प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर दर्जेदार गुळासाठीही ही बाजारपेठ अग्रेसर ठरू लागली आहे. इथे वर्षभर सौदे सुररू असल्याने गुळाला राज्यासह विविध राज्यांतही मोठ्या प्रमाणात मागणी असते. विशेष करून गणपती, दिवाळी आदी सणांना मागणी व त्याचबरोबरच दरही वाढून गूळ उत्पादकांना त्याचा फायदा मिळतो.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९५१ मध्ये महाराष्ट्राचे नामवंत राजकीय नेते स्व. वसंतदादा पाटील यांनी केली. सन १९५० च्या सुमारास दक्षिण सातारा जिल्हा म्हणून सांगलीचा समावेश होता. स्थापनेपासूनच या बाजार समितीत सर्व प्रकारच्या शेतीमालाचे सौदे सुरू झाले.
त्यानंतर ही उतारपेठ म्हणून प्रसिद्ध झाली. हळद, बेदाणा, गूळ आणि मिरची या शेतीमालांसाठी ती प्रसिद्ध आहेच. शिवाय कडधान्यासाठीही तिला अोळख मिळाली.

गुळासाठीची बाजारपेठ
खरे तर ऊस, गूळ व त्याची बाजारपेठ म्हटले की कोल्हापूरकडे बोट दाखवले जाते. इथला गूळ उद्योग सर्वत्र प्रसिद्ध आहे. पण सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील गुळासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे हे अनेकांना माहीत नसावे. इथे गुळाचे सौदे १९५६ पासून सुरू झाले. हळूहळू वीस वर्षांनी म्हणजे १९७६ च्या सुमारास ती गुळाची बाजारपेठ म्हणून ती फुलू लागली. सांगली, सातारा जिल्ह्यांतील शेतकरी या बाजारपेठेचा आधार घेत होते. त्या वेळी पश्‍चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांची संख्या कमी असल्याने अनेक शेतकरी गूळ उत्पादनावरच भर द्यायचे. गूळही उत्कृष्ट तयार करायचे. पुढे साखर कारखानादारी वाढली. सांगली व सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देण्यास प्रारंभ केला. पण तरीही गुळाची आवक आणि सौद्यावर या बाबीचा फारसा फरक पडला नाही असे सांगली बाजार समितीचे अधिकारी आणि व्यापारी सांगतात.

सांगली बाजार समितीची वैशिष्ट्ये

 • सांगली व्यतिरिक्त मिरज, जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत दुय्यम बाजार
 • वर्षाकाठी एकूण सर्व उलाढाल सरासरी दोन हजार कोटींची
 • एकूण ९९ एकरात मुख्य बाजार समितीचा विस्तार.
 • शेतकऱ्यांसाठी पाच रुपयांत जेवणाची सुविधा
 • अंतर्गत रस्ते
 • शेतकऱ्यांना हवामान आणि पिकांची माहिती मिळावी यासाठी बळिराजा ॲप सुरू केले आहे
 • शेतीमालाच्या प्रतवारीची सोय
 • गूळ व अन्य शेतीमालास शेकडा ८० पैसे, तर बेदाण्याला शेकड्यास २० पैसे सेस

गूळ बाजारपेठ दृष्टिक्षेपात

 • सांगली जिल्हा, कर्नाटक राज्यातील सीमा भाग (बेळगाव जिल्हा) येथून होते आवक
 • व्यापारी आणि शेतकरी यांनी बाजारपेठ कायम सुरू राहावी यासाठी एक प्रकारची साखळीच तयार केली आहे. यात उसाचा लागवड काळ, वाण आदींबाबत नियोजन होते.
 • कर्नाटक राज्यातील शेतकरी को ८६०३२ वाणाला पसंती देतात.
 • बारीक कणी असणारा, जिभेवर ठेवल्यास त्वरित विरघळणारा अशी गुळाची वैशिष्ट्ये
 • येथून गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्राच्या अन्य भागात गुळाचे वितरण होते.
 • गुजरात राज्यात २५० ग्रॅम, अर्धा किलो, एक किलो पॅकिंगची मागणी अधिक

गुळ सौद्याची वैशिष्ट्ये

 • वर्षभर आणि खुल्या पद्धतीने सौदे (सुटी व काही विशेष दिन वगळता)
 • अपेक्षित दर मिळाला नाही तर सौद्यात विक्री नाही.
 • मागणी अधिक असल्याने व्यापाऱ्यांत स्पर्धा होते. यामुळे दर नेहमीच चढे राहतात.
 • सौद्याची वेळ- सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत
 • सौद्यावर बाजार समितीचे नियंत्रण
 • विविध वजनात आवक (उदा. २५० ग्रॅम, अर्धा व एक किलो)
 • सौदे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन पैसे जमा
 • गणपती सणाच्या काळात मोदकाच्या आकाराच्या गुळास मोठी मागणी

बाजाराचा बदलता ‘ट्रेंड’
मॉल, सुपर मार्केट यांच्यामुळे ग्राहकांची मानसिकता बदलल्याने गुळाच्या बाजारपेठेचा ट्रेंडही त्यानुसार बदलला आहे. तीस किलोची ढेपीला केवळ ग्रामीण भागात मागणी आहे. तीही थोडी कमी झाली आहे. या ढेपीच्या तुलनेत क्विंटलला सरासरी २०० रुपये दर अधिक मिळत असल्याने शेतकरी ग्राहकांच्या मागणीनुसार विविध वजनांत गूळ आकर्षक पॅकिंगमधून देऊ लागले आहेत.

गुळाची वार्षिक उलाढाल (आवक क्विंटल, दर रुपयांत)

वर्ष आवक किमान दर कमाल दर सरासरी दर उलाढाल रु. (सुमारे)
२०१४-१५ १०३६०९८ २००० ४२७५ ३००४ ३१० कोटी १८ लाख
२०१५-१६ १०९५६३४ १६०० ३९०० २६८५ २९४ कोटी १७ लाख
२०१६-१७ ६,१८,१५१ ३३५४ ४१९४ ३७७४ २३३ कोटी २९ लाख

गेल्या वीस वर्षांपासून सांगली बाजार समितीत गूळ विक्रीसाठी घेऊन येत आहे. इथे नेहमीच अपेक्षित दर मिळतो. दिवाळीनिमित्त अधिक मागणी असल्याने दर कायम चढा राहतो.
- सदाशिव नाईक, निडगुंद्दी, जि. बेळगाव

व्यापारी आणि ग्राहक यांच्या मागणीचा नेहमीच अभ्यास करीत असल्याचा फायदा झाला. गेल्या पाच वर्षांपासून २५० ग्रॅम, अर्धा व एक किलो पॅकिंगमधून गूळ बाजार समितीत घेऊ येतो. अशा पॅकिंगला जास्त मागणी व दरही अधिक मिळतो.
- विठ्ठल चण्णाप्पा आवटे, बिरनाळ, ता. रायबाग, जि. बेळगाव

कर्नाटक राज्यातील गूळ उत्पादकांसाठी सांगली बाजार समितीचा मोठा आधार आहे. शेतकरी सौद्यात भाग घेत नाहीत. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांचा विश्‍वास आहे.
- मुकेश शहा, गूळ व्यापारी, सांगली बाजार समिती

चोख व्यवहारामुळे बाजार समिती आणि व्यापाऱ्यांवर शेतकऱ्यांचा विश्‍वास आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर गुळाची आवक इथे मोठ्या प्रमाणात होते. दरही तेजीत असतात. याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.
- प्रशांत शेजाळ, सभापती
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती.
संपर्क- ९८९०७३७१४७

कार्यालय संपर्क ः ०२३३-२६७१३६५

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...