हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कल

हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कल
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कल

एप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे दर वाढत आहेत. मक्याची मागणी वाढती आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे.  चीन सध्या भारतातून आयात करीत आहे. त्यामुळे कापसाच्या किमतीत तेजी आहे.

निवडणुकीमुळे बहुतेक पिकांच्या किमती वाढत आहेत. ‘अल निनो’चा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याचा अंदाज केला गेला आहे. ‘अल निनो’संबंधी अधिक माहिती या महिन्यात उपलब्ध होईल. मार्च महिन्यात (मे डिलिव्हरीसाठी) रब्बी मका, गवार बी, हरभरा व कापूस यांच्या दरात वाढीचा कल होता. हळदीचे दर घसरत होते. साखरेत व खरीप मक्यात काहीही व्यवहार झाले नाहीत.

 या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गव्हाचे व हरभऱ्याचे (नवीन पिकाच्या आवकेमुळे) दर घसरले. (आलेख १).  सोयाबीनचे  दर स्थिर होते. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे. उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत. या महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे दर वाढत आहेत. मक्याची मागणी वाढती  आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे. चीन  सध्या भारतातून आयात करीत आहे. त्यामुळे कापसाच्या किमतीत तेजी आहे. या सप्ताहात त्यांनी उच्चांक गाठला. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यात रब्बी आवकेमुळे गव्हाचे, हरभऱ्याचे व मक्याचे भाव घसरतील. मात्र, वाढत्या मागणीमुळे ही घसरण फार नसेल. इतरांचे मात्र वाढतील (आलेख २).

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार मका रब्बी मक्याच्या (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. १,५७० ते रु. १,८००) या सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी वाढून रु. १,९४१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,१३२ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत.  मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील.

साखर साखरेच्या (मे २०१९) किमती मार्चमध्ये व्यवहार नसल्याने रु. ३,११९ वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१४६ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.

सोयाबीन   सोयाबीन फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात रु. ३,६९५ व रु. ३,८२६ यादरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या रु. ३,८२३ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,९३१ वर आल्या आहेत. हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ८ एप्रिल रोजी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,८७५, ३,९७०, ३,९४२, ३,८००, ३,४९३ व ३,४९३ भाव होते.

  हळद हळदीच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ६,४९२ ते रु. ६,०९२). गेल्या सप्ताहात त्या वाढून रु. ६,४४२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ५.२ टक्क्यांनी वाढून रु. ६,७७८ वर आल्या आहेत. हा गेल्या काही महिन्यातील उच्चांक आहे. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५१३ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ७.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,९९०). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण, मागणीसुद्धा वाढत आहे.

गहू   गव्हाच्या (मे २०१९) किमती मार्च महिनाअखेर घसरल्या. (रु. १,८६२ ते रु. १,७९७). या सप्ताहात त्या रु. १,८४३ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. १,८७६ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,९०६). नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मेमध्ये बाजारभाव हमीभावाच्या जवळ असतील.

हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या (रु. ४,१८६ ते रु. ४,४००). या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ४,४७३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३८७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जुलै २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६१२). मागणी मोठ्या प्रमाणांत वाढत आहे. शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). रबीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२५२ ते रु. ४,४९०). या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,४७१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जुलै २०१९ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५८५). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

 - arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com