agricultural stories in Marathi,Success story of weekly market in Aurangabad | Agrowon

शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत अर्थकारणाच्या कक्षा
संतोष मुंढे
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

वाढविणार शेतकरी सहभाग
शेतकऱ्यांना परवडणारा आणि ग्राहकांना वाजवी दरात ताजा भाजीपाला, फळे, धान्य मिळावे यासाठी हा बाजार सुरू करण्यात आला. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या गटाचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 जी. सी. वाघ,उपसरव्यवस्थापक, कृषी पणन मंडळ,
औरंगाबाद विभाग, ९४२२३४६९७,

 

 आर्थिक फायदा वाढला
शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यापूर्वी अडचणी होत्या. दोन वर्षांच्या प्रवासानंतर आमचा थेट ग्राहकांशी संवाद सुरू झाला आहे. ग्राहक आमच्याकडून थेट फळे, भाजीपाला, धान्य खरेदीला प्राधान्य देत आहेत. त्याचा आर्थिक फायदा आम्हाला होतो.
 विलास भेरे, ९४०४४७८९३८,  
निसर्ग राजा शेतकरी मंडळ, कोनेवाडी, जि. औरंगाबाद

 

संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराच्या संकल्पनेने शेतमालाची थेट विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय मिळाला. औरंगाबाद शहरात दोन वर्षांपासून सातत्याने भरणाऱ्या या शेतकरी आठवडे बाजारांनी शेतकऱ्यांची थेट ग्राहकांशी सांगड घालून दिली. त्यामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांचादेखील फायदेशीर ठरले आहे.

सध्या दुष्काळाच्या झळा शेतकरी आठवडी बाजारात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांवर मर्यादा घालताहेत. परंतु याही परिस्थितीमध्ये काही शेतकरी गट या बाजारात सातत्य टिकवून आहेत. त्यामुळे  बाजारपेठेतील मध्यस्थांची साखळी तोडण्यात यश मिळू लागले आहे. औरंगाबाद शहरात सध्या तीन ठिकाणी भरणाऱ्या शेतकरी आठवडी बाजाराच्या यशामुळे शेतकरी गट आणि पणन मंडळातर्फे या बाजारामध्ये आणखी शेतकरी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आठवडे बाजाराला सुरवात
औरंगाबाद शहरात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची थेट विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पणन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या समन्वयातून चांगले प्रयत्न झाले. पहिला शेतकरी आठवडे बाजार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रिकाम्या जागेत सुरू झाला. त्याची यशश्विता पाहून महानगरपालिकेनेही सहकार्य केले. त्यामुळे शहरात तीन ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार सुरू झाले. सुमारे बावीस शेतकरी गट या आठवडे बाजारांमध्ये सहभागी झाले आहेत.

बाजार ठरतोय फायद्याचा

 •   फळे भाजीपाल्याबरोबरच धान्य,
 • डाळी विक्रीची संधी.
 •   गहू, ज्वारी, बाजरीची ग्राहक करताहेत
 • आगावू नोंदणी.
 •   जात्यावरच्या डाळींलाही चांगली मागणी.
 •   मटकी, हूलगा, जवस, तीळ, वाळलेल्या मिरच्यांची मागणी.
 •   शेतकऱ्यांकडून धान्य, भाजीपाला, फळांचा घरपोचही मागणीनुसार पुरवठा.
 •   स्वच्छ व ताजा शेतमाल पुरविण्यावर
 • शेतकऱ्यांचा कटाक्ष.
 •   टप्प्याटप्याने शेतकरी गट मालाच्या उपलब्धतेनुसार होतात सहभागी.

 

सहभागी शेतकरी गट

 • देवगिरी शेतकरी पुरुष बचत गट, अब्दीमंडी, जि. औरंगाबाद
 • जय किसान शेतकरी गट, गेवराई ता. पैठण जि. औरंगाबाद.
 •  रेणूकामाता महिला शेतकरी बचत गट, अब्दीमंडी,जि. औरंगाबाद.
 •  संस्कृती कृषी प्रक्रिया उद्योग, गेवराई (बार्शी),ता. पैठण, जि. औरंगाबाद.
 •  माता चंडिका शेतकरी बचत गट, मांडणा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद.
 •  सीतामाता महिला बचत गट, मांडणा, ता. सिल्लोड,जि. औरंगाबाद.
 •  निसर्गराजा शेतकरी मंडळ, कोनेवाडी, जि. औरंगाबाद.
 •  श्री स्वामी समर्थ शेतकरी मंडळ, पुसेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद
 •  ओमसाई पुरुष बचत गट, मांडणा, ता. सिल्लोड,जि. औरंगाबाद
 •  जय सेवालाल जय किसान अमर शेतकरी गट, बनवाडी तांडा, जटवाडा,जि. औरंगाबाद.
 •  युवा माउली शेतकरी बचत गट, लाखेगाव, ता. पैठण,जि. औरंगाबाद
 •  पांडूरंग शेतकरी गट कातपूर, पैठण, जि. औरंगाबाद.
 •  समृद्ध शेतकरी बचत गट, जळगाव फेरण,जि. औरंगाबाद
 •  बळिराजा शेतकरी गट, मांडणा, ता. सिल्लोड,
 • जि. औरंगाबाद.
 •  शिवशक्‍ती शेतकरी गट, गोलटगाव, जि. औरंगाबाद
 •  जय बाबाजी शेतकरी बचत गट,पळशी,जि. औरंगाबाद
 •  हरितक्रांती शेतकरी मंडळ, कोनेवाडी, जि. औरंगाबाद
 •  लोकसेवा शेतकरी गट, कोनेवाडी, जि. औरंगाबाद 
 • सह्याद्री शेतकरी गट, कोनेवाडी, जि. औरंगाबाद.
 • एकता शेतकरी गट, शेवगा, जि. औरंगाबाद
 • गौरीकृपा शेतकरी गट, ढासला, ता. बदनापूर, जि. जालना.
 • जय भगवान बाबा शेतकरी गट, धोंडखेडा,जि. औरंगाबाद

बाजाराचे दिवस आणि वेळा

 •  अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसर, औरंगाबाद : रविवार, सकाळी ९ ते दुपारी १
 •   ज्योती नगर मनपा वाचनालयासमोर, औरंगाबाद : शुक्रवार, सकाळी ८ ते दुपारी २
 •  ज्योती नगर, मनपा सांस्कृतिक सभागृह, दशमेश नगर, औरंगाबाद : बुधवार, सकाळी ८ ते १२
 •  शनिवार बाजार, परभणी - बुधवार, सकाळी ९ ते दुपारी १

 

शेतमाल विक्रीची वाढली उलाढाल
औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या शेतकरी आठवडे बाजारातून जानेवारी २०१९ अखेरपर्यंत ५३६. ६५ टन भाजीपाल्याची विक्री झाली. शिवाय परभणी येथे दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या आठवडे बाजारातून पहिल्याच महिन्यात १ टन भाजीपाल्याची विक्री झाली. प्रामुख्याने यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, शेंगवर्गीय भाज्यांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील शेतकरी आठवडे बाजारातून जानेवारी अखेरपर्यंत थेट शेतकऱ्यांनी ग्राहकांना १६४.२९ टन फळांची विक्री केली. शिवाय परभणी येथील शेतकरी आठवडे बाजारातून ०.६ टन फळांची विक्री झाली. फळांमध्ये केसर आंबा, द्राक्ष, पपई, मोसंबी, पेरू, जांभूळ, सीताफळाचा समावेश आहे.

 

भाजीपाल्यास चांगली मागणी
वांगे, भेंडी, गवार, वाल, चवळी, दोडके, गाजर, टोमॅटो, मोसंबी, मेथी, कोथिंबीर आदींची विक्री करतो. ताजा भाजीपाला देण्यावरच आमचा भर असतो. बहूतांशी शेतमाल सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करतो.
- प्रेमसिंग चव्हाण,
जय सेवालाल जय किसान अमर शेतकरी गट, बनवाडी तांडा, ता. जि. औरंगाबाद.

 

मोसंबीला मिळाला योग्य दर
आमच्या शेतात उत्पादित मोसंबीला १२ हजार रुपये टनाने मागणी झाली होती. तीच मोसंबी आम्ही शेतकरी बाजारात आमच्या गटाच्या माध्यमातून विक्री केली. आम्हाला ३६ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. आमचही समाधान झालं अन्‌ ग्राहकांनाही वाजवी दरात मोसंबी मिळाली. जवळपास दोन वर्षांपासून आम्ही बाजारात थेट विक्री करतो.
- शेख इरफान शेख अकबर
गौरीकृपा शेतकरी गट, ढासला, ता. बदनापूर जि. जालना.

थेट ग्राहकांशी संवाद

दीड वर्षापासून गटाच्या माध्यमातून आले, लसूण, सोबतच घरगुती चिक्‍कीची थेट विक्री करतो. आमच्याकडून एकदा माल घेतलेला ग्राहक पुन्हा आमच्याकडूनच शेतमाल खरेदी करतो. हा आमचा अनुभव आहे. थेट विक्रीमुळे शेतमालाला किफायतशीर दर मिळू लागला आहे. वर्षभर विविध भाजीपाला, फळांच्या विक्रीचे आमच्या गटाने नियोजन केले आहे.
- रामहरी जाधव,
जय बालाजी शेतकरी गट,
घोडेगाव,  ता. खुल्ताबाद
जि. औरंगाबाद.

 

 

 

 

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...