agricultural success story in marathi, agrowon, achalpur,amaravati | Agrowon

बहुविध पीकपद्धतीसोबतच राखले जमिनीचे आरोग्य
विनोद इंगोले
शुक्रवार, 1 जून 2018

ज्ञानवृद्धीचा छंदच
ललित यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले आहे. त्यांनी वाचनाचा छंद त्यांनी जपला आहे. त्यातूनच शेतीत प्रयोगशीलता जपणे शक्‍य झाल्याचे ते सांगतात. ॲग्रोवनचे ते नियमित वाचक आहेत. शिवाय कृषीविषयक अन्य साहित्य, कवितावाचन यांची आवडही जोपासली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संपर्कात ते सातत्याने राहतात. सुमारे ३० वर्षांपासून त्यांच्याकडे मजूर टिकून आहेत. आज ४५ ते ५० मजुरांची राहण्याची व्यवस्था आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही आर्थिक मदत केली जाते

संयुक्त कुटुंबपद्धतीच्या शंभर एकर क्षेत्रात बहुविध पीकपद्धती व त्यातील व्यवस्थापनाचा आदर्श अचलपूर (जि. अमरावती) येथील ललित मडगे यांनी जपला आहे. संत्रा हे मुख्य पीक ठेवत जमिनीची सुपीकता राखण्यासाठी ५० एकरांवर हिरवळीची पिके, धरणातील गाळाचा वापर, शेणखताच्या उपलब्धतेसाठी पशुपालकासोबत करार, मजुरांसाठी निवासी व्यवस्था आदी वैशिष्ट्यांची जपणूकही त्यांनी केली आहे.

शेतकरी- ललित मडगे
ठिकाण- अचलपूर, जि. अमरावती
शेती- १०० एकर (संयुक्त कुटुंबाची)

पीकपद्धती
संत्रा

 • ५० एकरांवर संत्रा. वाण- नागपूरी. सुमारे सहा हजार झाडे. (३०, २५ ते पाच वर्षांपर्यंतची)
 • जमिनीचा पोत राखला तरच फळांचा दर्जा आणि उत्पादकता शक्‍य होईल या जाणिवेतून
 • सेंद्रिय अधिक रासायनिक पद्धतीचे व्यवस्थापन
 • आंबिया बहारातील उत्पादन
 • प्रतिझाड (१५ वर्षांचे) उत्पादन- १२०० फळे
 • अनेक वर्षांपासून संत्रा पिकात सातत्य असल्याने थेट दिल्लीला पुरवठा
 • फळांचा दर्जा राखला जात असल्याने मालाला दरवर्षी मागणी
 • किलोला १५, २० ते कमाल ४० रुपयांपर्यंत दर

रोपवाटिका व्यवसाय
संत्रा शेतीला उत्पन्नाचा आधार त्यातून दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा, मोर्शी, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, अकोट (अकोला) हा परिसर संत्र्यासाठी ओळखला जातो. विदर्भातील एकूण दीड लाख हेक्‍टरपैकी सुमारे ८४ हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड याच भागात आहे. त्यामुळे या भागात संत्रा रोपांना मागणी राहते, हे लक्षात घेत ललित यांचे वडील रमेशराव यांनी ३५ वर्षांपूर्वी संत्रा रोपविक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला सुमारे २५ हजार रोपे तयार करून त्यांची विक्री व्हायची. आज व्यवसायाचा चांगला विस्तार केला आहे. रंगपूर या खुंटावर कलम केले जाते. विक्री प्रतिकलम २५ रुपये याप्रमाणे होते.

केळी

 • दरवर्षी साधारण सहा एकर क्षेत्र. ग्रॅंड नैन वाण. या पिकात अनुभव १५ वर्षे.
 • प्रतिझाड २५ ते ३० किलोची रास.
 • व्यापारी बांधावर येऊन कटाई करून घेऊन जातो. विक्रीची समस्या नाही.

फूल शेती

 • सुमारे ८ वर्षांपासून एक एकर गुलाब. यंदा काढणी करणार.
 • महिन्याला ४००० फुलांचे उत्पादन. मात्र वर्षातील आठ महिनेच असे उत्पादन.
 • स्थानिक मार्केट- परतवाडा (सुमारे पाच कि.मी.)
 • दर- दोन ते २.५ रुपये प्रतिनग
 • दरवर्षी चार एकरांवर झेंडू. दसरा, दिवाळीसाठी.

हळद

 • गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्य. सुमारे पाच ते सहा एकर क्षेत्र.
 • वाण- सेलम. विक्री मराठवाड्यातील वसमत, हिंगोली बाजारपेठेत.
 • व्यापाऱ्यांशी संवाद साधून दर जाणून घेत त्यानंतरच बाजारपेठेचा पर्याय
 • उत्पादकता- एकरी २२ ते २५ क्विंटल. सुकलेली.
 • मागील वर्षी हळकुंडांना ६५ रुपये प्रति किलो दर मिळाला.

मिरची

 • दरवर्षी चार एकरांवर खरिपात लागवड
 • एकरी उत्पादन २०० क्‍विंटल
 • विक्री नागपूर, अमरावती बाजारात
 • एकरी ७० हजार रुपये उत्पादन खर्च. दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न
 • टोमॅटो, फ्लॉवर आदींमध्येही सातत्य. स्थानिक बाजारपेठेतच विक्री
 • भाजीपाला विक्रीतून मिळणारा पैसा दैनंदिन गरजांची पूर्तता तसेच शेती व्यवस्थापनासाठीच्या पैशांची निकड भागवितो.

पाणी

 • शंभर एकरांसाठी सहा विहिरी, सात बोअरवेल्स
 • संपूर्ण क्षेत्र १०० टक्के ठिबकखाली आणले.

जमीन सुपीकतेसाठी केलेले प्रयत्न

अ) धरणातील गाळाचा वापर
ब) हिरवळीच्या पिकांची लावण
क) शेणखताचा वापर

अ) दरवर्षी धरणातील गाळाचा वापर केला जातो. साधारण ४० ट्रक एवढी गरज भासते.
प्रतिट्रक तीन हजार रुपये दर आहे. एवढा गाळ ८ ते १० एकरांना पुरतो. दरवर्षी वेगवेगळ्या जमिनीत त्याचा वापर होतो.

ब) पहिला पाऊस पडल्यानंतर संत्रा बागेत बोरू, धैंच्याचे बियाणे वापरले जाते. साधारण ४५ दिवसानंतर हे पीक जमिनीत गाडले जाते. ट्रॅक्‍टरचलित यंत्राचा वापर त्यासाठी होतो. सुमारे ५० एकरांत दरवर्षी या खताचा वापर हे मडगे यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

क) जमिनीचा पोत राखण्यासाठी शेणखत देणे क्रमप्राप्त आहे. ललीत यांच्याकडे मर्यादीत जनावरे आहेत. त्यांच्यापासून शंभर एकरांवर शेणखताची गरज भागवणे व त्यासाठी ते विकत घेणेही परवडणारे नाही. मात्र इच्छा तेथे मार्ग या विचाराप्रमाणे ललीत यांना या समस्येचे समाधान गावातच सापडले. एका दुग्धोत्पादकाला त्यांनी आपली रस्त्यालगत असलेली जागा वापरण्यासाठी दिली. याच ठिकाणी संबंधित दुग्धोत्पादक आपली जनावरे बांधतो. त्यासाठी शेडही बांधले आहे. चारा साठविला जातो. या जागेच्या वापरापोटी भाडेशुल्क म्हणून जनावरांचे शेण हा दुग्धोत्पादक ललित यांना शेतीसाठी मोफत देतात. तसा दोघांमध्ये करार झाला आहे. इथे साधारण १५० म्हशी असून शेणखत वर्षाला ३०० ट्रॉलीपर्यंत उपलब्ध होते.

संपर्क-ललित मडगे-९४०३०५४५१५, ७०२०२२०६६७

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...