संत्र्यांचे ग्रेडिंग-पॅकिंग करणाऱ्या विदर्भातील ‘मंडी’

खरेरीदार कंपनी आणि शेतकरी यांच्यात थेट व्यवहार होण्याच्या दृष्टीने महाआॅरेंजने मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. मायवाडी (ता. मोर्शी, अमरावती) आणि कारंजा घाडगे (वर्धा) येथे त्यासाठी संत्रा खरेदीची सोय उपलब्ध केली आहे.
अचलपूर, जि. अमरावती येथील खासगी मंडीत संत्र्यांचे ‘मॅन्युअली’ ग्रेडिंग सुरू असताना
अचलपूर, जि. अमरावती येथील खासगी मंडीत संत्र्यांचे ‘मॅन्युअली’ ग्रेडिंग सुरू असताना

विदर्भात विशेषतः अमरावती, नागपूर व अकोला या जिल्ह्यांत संत्र्यांचे ग्रेडिंग-पॅकिंग करणारी व्यापाऱ्यांची खासगी केंद्रे पाहण्यास मिळतात. स्थानिक भाषेत त्यास मंडी म्हटले जाते. या ठिकाणी संत्र्यांचे लिलाव होत नाहीत. व्यापारी शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन दर ठरवतात. त्यानंतर या केंद्रांमधून केवळ पुढील प्रक्रिया होते. शेतकरी संघटित होऊन आपले दर ठरवू लागले, तर त्यांना कोणत्याही विक्री व्यवस्थेतून जाताना अधिक फायदा होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते.   नागपुरी किंवा विदर्भातील संत्र्याची खास अोळख आहे. अमरावती हा संत्र्यांच्या बागांसाठी विशेष प्रसिद्ध असलेला भाग. या जिल्ह्यात संत्रा लागवडीखाली सुमारे ८५ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. बागांमुळे साहजिकच या भागात व्यापाऱ्यांचेही मोठे ‘कल्चर’ तयार झाले. भागातील शेतकऱ्यांना कळमना (नागपूर), वरुड आदी बाजारपेठा आहेत. ‘महाआॅरेंज’ संघाच्या माध्यमातूनही मार्केट उपलब्ध आहे; मात्र व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हुंडी पद्धतीनेही बागा खरेदी करतात. असे व्यापारी मग पुढे एखाद्या विशिष्ट ठिकाणी केवळ फळांचे ग्रेडिंग-पॅकिंग करून माल पुढील बाजारपेठेत पाठवतात. अशा जागांना स्थानिक भाषेत मंडी म्हटले जाते. खाजगीरीत्या ग्रेडिंग-पॅकिंग वरुड, मोर्शी, अचलपूर, अकोट (जि. अकोला) आदी भागात अशा मंडी पाहण्यास मिळतात. येथे संत्र्याच्या ग्रेडिंगबरोबर त्याला ‘वॅक्सिंग’ करण्याची प्रक्रियाही पार पडते. त्यानंतर हा माल देशांतर्गत बाजारपेठेत पाठविला जातो. यामुळे या भागातील मजुरांना आंबिया बहारातील फळांसाठी चार महिने म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर त्यासोबतच मृग बहारातील फळांसाठी जानेवारी ते एप्रिल असे चार महिने काम मिळते. या कामांसाठी मध्य प्रदेशातील तसेच स्थानिक मजूरही राबतात. अत्याधुनिक यंत्रणांचा वापर अचलपूर येथील काही व्यापाऱ्यांकडे फळांना ‘वॅक्सिंग’ करण्याची सुविधा आहे. या मंड्यांमधून सध्या तरी ‘मॅन्युअली ग्रेडिंग’ होते. लकडे येत्या काळात ‘ग्रेडिंग मशिन’ बसविणार अाहेत. त्याची किंमत ३० ते ३९ लाख रुपये आहे. नजीकच्या काळात या यंत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आले असून, संगणकाच्या माध्यमातून त्याचे संचलन होते. वजनानुसार ग्रेडिंग करण्याची सोय त्यात आहे. लाकडी बॉक्‍सचा व्हायचा वापर पूर्वी लाकडी बॉक्‍सचा वापर संत्रा पॅकिंगसाठी व्हायचा. त्यावर ६५ ते ७० रुपये खर्च व्हायचा. यासाठी लागणाऱ्या लाकडी फळ्यांचा पुरवठा नागपूरहून व्हायचा. मजुरांमार्फत एकत्र जोडत बॉक्‍स तयार करावा लागत होता. ही फार वेळकाढू आणि खर्चिक बाब होती. दूरच्या बाजारात नेल्यानंतर ५०० पैकी ५० बॉक्स तरी तुटायचे. त्यामुळे संत्रा खराब व्हायचा. दिल्ली बाजारपेठेत तीन दिवसांत माल पोचतो. या काळात लाकडी बॉक्‍समधील संत्रा डागाळायचा. यामध्ये तणसदेखील खूप लागायचे. आता लाकडी बॉक्स ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. स्वस्त क्रेटमुळे काम झाले सोपे आता १०० ते १२५ रुपयांना प्लॅस्टिक क्रेट मिळतात. क्रेटमधून माल पाठविताना याच्या चारही बाजूने हवा खेळती राहत असल्याने मालाची टिकवणक्षमता अधिक राहते, असा व्यापाऱ्यांचा अनुभव आहे. कोरुगेडेट बॉक्‍सचा वापर काही व्यापारी करतात. ग्राहकांच्या मागणीनुसार हाताळण्यास सोपी अशा आकाराचे तीन किलोपासून २५ किलो क्षमतेपर्यंत हे बॉक्‍स तयार केले जातात. या बॉक्‍ससाठी ५० रुपयांचा खर्च होतो. अशा प्रकारचे बॉक्‍स तयार करणारे कारखाने नागपूर परिसरात मोठ्या संख्येने आहेत. दिल्लीहूनही अशा बॉक्‍सचा पुरवठा होतो.

  • बॉक्स- निर्यातीसाठी- १० ते १३ किलो वजनाचा. हाताळण्यास सोपा जातो.
  • -देशांतर्गत- २० किलोच्या बॉक्‍सला मागणी
  • वॅक्सिंग मशिन याची किंमत बारा लाख रुपये आहे. ताशी तीन टन प्रक्रिया करण्याची काही यंत्रांची क्षमता आहे. ‘व्हॅक्स’ (अर्थातच मान्यताप्राप्त) लावल्याने संत्र्यावर खास आवरण चढते. त्यामुळे फळाची टिकवण क्षमता व चकाकी वाढते. तशी संत्र्याची टिकवणक्षमता १० दिवस आहे. वॅक्सिंगमुळे ती पाच चे सात दिवस आणखी वाढते, असे श्रीधर ठाकरे यांनी सांगीतले. संत्रा बाग व्यवस्थापनात रसायनांचा अधिक वापर केल्यास टिकवण क्षमता कमी होण्याची भीती राहते. भंडारा जिल्ह्यातून येते तणस क्रेटमध्ये टाकण्यासाठी धानाचे (तांदूळ) तणस वापरले जाते. त्यांचा पुरवठा धान उत्पादक भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून होतो. विक्री- व्यवहार पद्धती ‘महाआॅरेंज’ संघाचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे म्हणाले, की खरे तर याचे नाव मंडी असे असले तरी त्यात लिलाव होत नाहीत. केवळ ग्रेडिंग व पॅकिंग करण्याचे काम येथे होते. हे काम होण्यापूर्वी व्यापारी शेतकऱ्यांच्या बागात जाऊन हुंडी पद्धतीने बाग खरेदी करतात. तेथे व्यवहार ठरतात. अलीकडील काळातील संत्र्याचे दर आंबिया बहार-२०१६-पाच हजार रु. प्रतिटन, यंदा- २० हजार ते २५ हजार रु. कमाल ५० हजार रु. मृग बहार- २०१६- १५ हजार ते २० हजार रु. अलीकडील वर्षांतील सरासरी- प्रतिटन- १५ हजार ते २० हजार रु.

    प्रतिक्रिया संत्रा उत्पादकांनी संघटित होऊन आपल्या मालाचा दर आपणच ठरवला, तर त्या दराने खरेदी करणे व्यापाऱ्याला भाग पाडले जाईल; मात्र संघटनाअभावी व्यापारी ठरवेल त्याच दराने बाग दिली, तर त्यात शेतकऱ्याचा फायदा कमी असेल. संपर्क- श्रीधर ठाकरे- ९८२२२२८५३३ अध्यक्ष, महाऑरेंज

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com