वांग्यासद चवदार भरितालाही मिळवले मार्केट

भरीताचा स्वतंत्र लोगो होणार आसोदा येथील वांग्याचे भरीत अमेरिका, युरोपापर्यंत पोचले आहे. आता भरीताचा स्वतंत्र लोगो तयार करून मार्केट वाढवण्याचा विचार आहे. जळगावात भरीत सेंटर्सचालकांपैकी बहुतांश जण शेतकऱ्यांची मुलेच आहेत, ही समाधानाची बाब आहे. - किशोर चौधरी- ७५८८८१६२०५ अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी मंडळ, आसोदा
आसोदा भागातील वांग्यांना भरीत सेंटरच्या माध्यमातून मार्केट मिळाले आहे.
आसोदा भागातील वांग्यांना भरीत सेंटरच्या माध्यमातून मार्केट मिळाले आहे.

खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेले आसोदा (ता. जि. जळगाव) दर्जेदार वांग्यांसाठी व चवदार भरीतासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भरीताच्या माध्यमातून मूल्यवर्धन साधत गावातील युवकांनी त्यास भरीत सेंटर्स व अन्य रूपांनी वांग्याला सक्षम मार्केट व्यवस्था निर्माण केली आहे. त्यातून अर्थकारणही उंचावले आहे .   भरीताच्या वांग्याचे गाव- आसोदा  हे जळगावपासून चार किलोमीटरवर आहे. भरीताच्या वांग्यांच्या शेतीसाठी ते खास प्रसिद्ध आहे,. दरवर्षी या पिकाखाली सुमारे ६५ ते ७० हेक्‍टर क्षेत्र असते.

वांग्याला गावाने मिळविले मार्केट

  • आसोद्याहून येथे जातात वांगी- विविध जिल्हे- दररोज सुमारे १३ क्विंटल
  • नाशिक, कल्याण, पुणे, मुंबई (आगाऊ नोंदणी होते)
  • दोन दिवसांआड- सुमारे आठ क्विंटल
  • या ठिकाणी आसोद्याच्या युवकांची भरीत सेंटर्स
  • कल्याण, नाशिक, शिरपूर (जि.धुळे), अमळनेर (जि.जळगाव)
  • सेंटर चालकांकडून स्वतंत्र मालवाहूची व्यवस्था
  •  जळगाव शहरातील मार्केट 

  • भरीत सेंटर्सद्वारे विक्री
  • जळगाव शहर परिसरात सुमारे ७० ते ९० भरीत सेंटर्स.
  • यात विक्रेते म्हणून आसोद्यातील शेतकऱ्यांचीच मुले अधिक असतात.
  • यात रिंगरोड, नवी पेठ, पोलन पेठ, जिल्हा पेठ आदींचा समावेश.
  • दररोजची विक्री
  • प्रति सेंटर- सुमारे १०० क्विंटल
  • -एकूण- ७०० ते ८०० क्विंटल.
  • थेट ग्राहक

  • अनेक ग्राहक शेतकरी विक्रेत्यांकडून थेट भरीत घेऊन जातात. अनेकवेळा मोठ्या आॅडर्स तसेच लग्नासाठीही मोठी मागणी असते.
  • हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात भरीत पाट्या रंगतात. आता भरीत सेंटरवरून भरीत, भाकरी मागवून घेण्याचा प्रघातच जणू पडला आहे.
  •  बाहेरगावी पाठवणूक आगाऊ मागणीनुसार खासगी बस, मालवाहतूक वाहनांद्वारे पुरवठा

     परदेशात सोबत नेतात भरीत जळगाव किंवा खानदेशातील जे युवक, युवती परदेशात नोकरीनिमित्त स्थिरावले आहेत ते दिवाळी किंवा हिवाळ्यात मायदेशी आले असताना आसोदा येथील तयार भरीत सोबत नेतात.   असे राहतात दर

  • केवळ भरीत- १२० ते १५० रुपये प्रतिकिलो
  • सेंटरमध्ये भरीताचे जेवण तसे स्वस्त म्हणजे ५० ते ६० रुपयांस मिळते.
  • त्यात भरीतासोबत भाकरी, कांदा, मुळा, नागली वा उडीदाचा पापड दिला 
  • वांगी उत्पादकांचा फायदा आसोदा येथील वांगी दर्जेदार, चमकदार असल्याने शिवाय भरीत सेंटरकडून रोजची मागणी असल्याने गावातील शेतकऱ्यांना दरही बऱ्यापैकी मिळतात. -आसोद्यातील काही शेतकरी हंगाम संपेपर्यंत भरीत सेंटरला १५ रुपये प्रति किलो दराने पुरवठा करतात. बाजारात दरांबाबत पडझड झाली तरी त्यांना त्याचा फारसा फटका बसत नाही. काही भरीत सेंटर्समध्ये जागा व अन्य कारणांमुळे वांगी भाजण्याची चांगली व्यवस्था नसते. मग आसोदा येथेच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तुऱ्हाटी, पऱ्हाटीवर वांगी भाजून घेतली जातात. यामुळे गावातील सुमारे ५० जणांना दररोज काम मिळाले आहे. उल्लेखनीय इतिहास पूर्वी लेवा पाटीदार समाजबांधव थंडीच्या काळात राजस्थान, गुजरातहून खानदेशात यायचे. रस्ताही खडतर होता. यावेळी सोबत आणलेली भरीताची वांगी भाजून ते खायचे. तीच परंपरा अनेक वर्षांपासून आजही जपण्यात येत आहे. भरीत खायचे तर लेवा पाटीदार मंडळींच्या घरचे असे आवर्जून म्हटले जाते. देशी वांग्याची चवच न्ह्यारी

  • खानदेशी भरीताचे वांगे मोठ्या आकाराचे, लांबुळके, हिरवे व बिनकाटेरी
  • चव वैशिष्ट्यपूर्ण. साहजिकच भरीतही त्याच चवीचे
  • हंगाम आटोपत असताना मार्चमध्ये लांबट निवडक वांगी झाडावरच पक्व होऊन पिवळी झाल्यावर तोडतात. घरी वाळवतात. त्यातून बिया काढून त्या गरम पाण्याने स्वच्छ करतात. चुलीमधील राख लावून स्वच्छ सुती वस्त्रात ठेवतात.
  • त्यांचाच वापर लागवडीसाठी होतो.
  • या वांग्याला निर्यातक्षम व्यापक बाजारपेठ मिळावी म्हणून आसोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाने भरीताच्या वांग्यांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळवण्यात यश मिळवले आहे.
  • जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष प्रयत्न जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकरदेखील या भरीताच्या प्रेमात आहेत. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून भरीताचे वांगे अधिक लोकप्रिय करण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रतिक्रिया वांग्यांचे दर्जेदार उत्पादन अनेक पिढ्यांपासून आम्ही घेत आहोत. निर्यातीस चालना, सक्षम बाजारपेठ मिळाली तर आसोद्याचे भरीत जगभर पोचेल. - सचिन चौधरी - ८६६८९९७७७०६ शेतकरी, आसोदा, मुंबई, पुण्यातून ऑर्डर्स अधिक येत आहेत. शीतपेटीत भरून ते भरीत पाठवितो. आसोदा येथेच वांगी भाजून घेतो. कच्चे भरीत सेंटरमध्ये आणून पक्के भरीत बनवितो. रोज सुमारे चार क्विंटल विक्री होते. यापेक्षाही मागणी वाढते. अविनाश नेहेते - ९८२२९९२८२२ सेंटर चालक, राधे राधे भरीत सेंटर, जळगा व

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com