उत्पादनवाढ, गुणवत्ता अन जमिनीची सुपिकताही जपली

सुपीकता वाढवण्यावर भर आडसाली ऊस घेण्याआधी, तसेच केळीची रोपे लावल्यानंतर हिरवळीचे पीक म्हणून तागाचे पीक घेतले जाते. साधारण ४५ दिवसांनी ताग जमिनीत गाडला जातो. केळीचा खोडवा गेल्यानंतर सरी पॉवर टिलरने आणखी खोल केली जाते. केळीचे सारे अवशेष या सरीत गाडले जातात.
केळी पिकात जाधव बंधूंनी हातखंडा तयार केला आहे.  केळीचे अवशेष जागेवरच गाडले जातात.
केळी पिकात जाधव बंधूंनी हातखंडा तयार केला आहे. केळीचे अवशेष जागेवरच गाडले जातात.

ऊस आणि केळी या दोनच मुख्य पिकांवर लक्ष केंद्रित करून उत्पादनवाढीचे उद्दिष्ट ठेवताना गुणवत्ता व जमिनीची सुपीकताही राखण्याचा प्रयत्न हेच सुशील व रवी जाधव (बावची, जि. सांगली) यांच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल. त्यांच्या दोन्ही पिकांतील नियोजन व व्यवस्थापन अन्य शेतकऱ्यांसाठी निश्चित आदर्श असेच आहे. सांगली जिल्ह्यात पेठ-सांगली रस्त्यावर बावची गावचे शिवार लागते. संपूर्णपणे निचऱ्याची असलेली जमीन या भागात आढळते. हळद, उस, केळी घेणारे अनेक पट्टीचे शेतकरी या भागात आढळतात. गावातील प्रकाश वसंतराव जाधव यांची १४ एकर शेती आहे. एक विहीर, त्यावर थोडे बागायती क्षेत्र व उर्वरित क्षेत्रात जिरायती पिके घेतली जात. प्रकाश पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. नव्या पिढीची सुधारित शेती जाधव कुटुंबातील थोरले सुशील यांनी दहावी झाल्यानंतर हळूहळू शेतीत लक्ष घातले. महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होते. आपल्यासोबत भाऊ रविराज यालाही शेतीत मदतीला घेतले. त्या वेळी पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यामुळे विहीर खोदली. सुरवातीला भाजीपाला पिके घेऊ लागले, यातून चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र दरांच्या चढ-उतारामुळे सन २००३-०४ च्या दरम्यान भाजीपाला शेती थांबवली. जाधव बंधूंची आजची सुधारित शेती

  • केवळ ऊस व केळी हीच दोन मुख्य पिके. साधारण वर्ष- दीड वर्षात उत्पादन देणारी.
  • दोन्ही पिकांत फेरपालट
  • भाजीपाल्याचे दर सतत बदलतात. आपल्या हाती नसतात. त्यामुळे त्यावरील ‘फोकस’ कमी केला.
  • संपूर्ण क्षेत्राला टप्प्याटप्प्याने ठिबक सिंचन.
  • तागासारख्या हिरवळीच्या खताचा न चुकता वापर
  • रासायनिक खते निंबोळी पेंड व सेंद्रिय खतात मिसळून दिली जातात.
  • वैरणीसाठी थोडे क्षेत्र राखीव ठेवले आहे.
  • शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ते ठेवले आहेत.
  • घरातील सर्व सदस्य शेतात राबतात, त्यामुळे कायमस्वरूपी मजुरांची फारशी गरज भासत नाही. हंगामी स्वरूपातच त्यांची मदत घेतली जाते.
  • शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी चर घेतले आहेत.
  • उन्हाळ्यात जमीन तापू दिली जाते.
  • शेतीकामातून विरंगुळा मिळावा यासाठी घराशेजारी बाग फुलवली आहे.
  • सुरवातीपासून ‘ॲग्रोवन’चे वाचक
  • माती परीक्षण केले जाते. मात्र, अनेकवेळा त्या त्या वर्षातील हवामान, पीक आदी स्थिती पाहून
  • अन्नद्रव्यांच्या मात्रेत बदल करावे लागतात, असे सुशील सांगतात.
  • ऊस

  • रोपे पद्धतीने लागवड. कायम को- ८६०३२ उसाची निवड. प्रयोगशील शेतकरी सुरेश कबाडे यांच्याकडून खात्रीशीर रोपे आणली जातात.
  • गरजेनुसार स्वतःही बेणेमळा करतात.
  • पाच ते सहा फुटी सरी
  • मुख्य, सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबर मासळी खत, निंबोळी पेंड यांचाही वापर
  • सुमारे ११ महिन्यांत बेणेमळ्याचे एकरी उत्पादन ११० टनांपर्यंत मिळाले आहे.
  • केळी

  • फेब्रुवारी- मार्च किंवा जुलै- आॅगस्ट यापैकी लागवडीचा हंगाम. पैकी पहिल्या हंगामात
  • एकरी २५ ते २७ टन उत्पादन मिळते. यातील पहिल्या हंगामात उत्पादन कमी मिळत असले, तरी
  • त्यातील केळी उन्हाळ्यातील वळवाचा पाऊस, गारपीट यात सापडत नाही.
  • दुसऱ्या हंगामात ४० टनांपर्यंत उत्पादन मिळते.
  • आडसाली उसाचा खोडवा गेल्यानंतर जमिनीची मशागत करून केळीची (जी- ९) लागवड
  • घडांच्या संरक्षणासाठी स्कर्टिंग बॅगेचा वापर
  • चार वर्षांपासून आखाती देशांत निर्यातीसाठी केळी दिली जातात.
  • त्यांना प्रतिकिलो कमाल दर १६ रुपयांपर्यंतही मिळाला आहे.
  • उत्पादन खर्च सुमारे एक लाख रुपये येतो.
  • वाढवली जमिनीची सुपीकता आडसाली ऊस घेण्याआधी, तसेच केळीची रोपे लावल्यानंतर हिरवळीचे पीक म्हणून तागाचे पीक घेतले जाते. साधारण ४५ दिवसांनी ताग जमिनीत गाडला जातो. केळीचा खोडवा गेल्यानंतर सरी पॉवर टिलरने आणखी खोल केली जाते. केळीचे सारे अवशेष या सरीत गाडले जातात. केळीच्या ओळीवर खुंट काढून शिल्लक राहिलेल्या बुंध्यावर रोटर मारून त्या ठिकाणी नवीन सरी केली जाते. सरीत वापरलेले घटक झाकून वरंबा तयार केला जातो. त्या क्षेत्रात आडसाली उसाची लागवड केली जाते. यात घटक बाहेर काढणे, ट्रॅक्‍टरने संपूर्ण मशागत करणे हा खर्च वाचवला जातो. अशा पद्धतीमुळे मशागतीवरील खर्च कमी झाला. शिवाय, जमिनीची सुपीकतही वाढीस लागली आहे. उसात पाचटाची कुट्टी वापरणे ही बाब तर नियमित आहेच. दृष्टिक्षेपात जाधव यांची शेती आडसाली ऊस - ३ एकर खोडवा ऊस - ५ एकर केळी लागवड - २ एकर केळी खोडवा - अडीच एकर संपर्क- सुशील जाधव - ९८२२९२५२२९ रविराज जाधव - ७२६४०४२१०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com