agricultural success story in marathi, agrowon, belora, tal. chandurbazar, dist. amravati | Agrowon

प्रयोगशील वृत्तीतून जोपासली बहुविध पीकपद्धती
विनोद इंगोले
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला आहे. ॲग्रोवनचे वाचन तसेच अत्यंत अभ्यासू व शोधक वृत्तीतून त्यांनी शेतीतील व्यासंग वाढवला आहे.

बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला आहे. ॲग्रोवनचे वाचन तसेच अत्यंत अभ्यासू व शोधक वृत्तीतून त्यांनी शेतीतील व्यासंग वाढवला आहे.

बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले. बारावीत असतानाच नोकरी किंवा शेती हे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. मात्र नोकरीपेक्षा शेतीचाच पर्याय त्यांनी निवडला. बहूपीक पद्धतीचा मार्ग अवलंबिणाऱ्या आशुतोष यांनी शेतीलाच प्रयोगशाळा बनवले.

आशुतोष यांच्या शेतीची सूत्रे

 • बहुविध पीकपद्धतीवर भर
 • उत्पादन खर्च कमी करणे
 • शेतीतील जोखीम कमी करणे
 • यांत्रिकीकरणावर भर
 • अभ्यास व शोधक वृत्तीतून व्यासंग वाढवणे

शेतीची सुरवात
सन १९९५ च्या सुमारास आशुतोष यांनी आपल्या ३० एकर शेतीच्या व्यवस्थापनाची सूत्रे आपल्याकडे घेतली. हे संपूर्ण क्षेत्र कोरडवाहू होते. यातून एक लाख रुपयांच्या वर उत्पन्न मिळाले वरच्या रकमेतून गाडी घे असे आव्हान वडिलांनी त्या वेळी दिले होते. एकरी एक, दोन ते चार क्‍विंटल एवढी अत्यल्प उत्पादकता तूर, मूग, उडीद, करडई, कापूस आदी पिकांची होती. सरळ वाणांचा वापर कापसात व्हायचा.

प्रयोगांना सुरवात
तिवसा येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मेळाव्याचे आयोजन झाले. त्या वेळी मिळालेल्या ज्ञानातून आशुतोष यांनी प्रयोग करण्यास सुरवात केली. उत्पादकता वाढीसाठी पाण्याची गरज असल्याचे लक्षात आले. सन २००१ मध्ये बोअरवेल खोदली. पाण्याची सोय झाल्यानंतर व्यावसायिक पीक म्हणून पाच एकरांवर संत्रा लागवड केली. त्यात सुमारे साडेपाचशे झाडे होती. तीन वर्षे त्यास फळे लागत नव्हती. संत्रा उत्पादक राऊत यांच्या सल्ल्याने आंतरमशागत करण्याचे थांबवले. आज व्यवस्थापन सुधारण्यावर भर देत साडेचारशे झाडांचे यशस्वी संगोपन होते आहे. साडेतीन ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळते.

खरीप कांद्याचा प्रयोग
आशुतोष यांनी १६ वर्षांपूर्वी आपल्या भागात खरीप कांदा लागवडीचा प्रयोग आशुतोष यांनी केला. त्यात आज सातत्य आहे. दरवर्षी रोपनिर्मिती करून लागवड होते. पहिल्यावर्षी दहा गुंठ्यात २५ क्‍विंटल उत्पादन मिळाले. आजही एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन ते घेतात. किलोला १५ रुपयांपासून ते २०, २५ व कमाल काही प्रसंगी ४० रुपयांपर्यंतही दर मिळतो. डिसेंबर काळात कांद्याला दर चांगले मिळत असल्याने खरीप लागवड फायदेशीर ठरते असा आशुतोष यांचा अनुभव आहे. गावातील अन्य शेतकऱ्यांनीही त्यांच्या प्रेरणेतून खरीप कांदा लागवडीवर भर दिला आहे. बेलोरा गावात सुमारे ६० एकरावर कांदा लागवड होते. नागपूर, अमरावती येथे बाजारपेठ आहे.

सोयाबीनचा प्रयोग
सन २०१०-११ मध्ये अमेरिकन जिप्सी नावाच्या सोयाबीन वाणाचा प्रयोग केला. हे बियाणे कर्नाटकातून आणले होते. हा प्रयोग पाहण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी शेताला भेट दिली. सुमारे १२० दिवसांच्या या वाणाचे त्या वेळी उत्पादन १० क्विंटलच्या पुढे मिळाले. पण दुसऱ्या वर्षी प्रयोग फसला. आता प्रचलित वाणांचीच लावण होते. एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते.

यांत्रिकीकरणावर भर
मजुरांच्या समस्येमुळे २०१० मध्ये छोटा ट्रॅक्‍टर (साडे अठरा एचपी) विकत घेतला. राजकोट येथे काही दिवस राहून या ट्रॅक्‍टरविषयीचे अनुभव जाणून घेतले. हळद, तूर पेरणी, आंतरमशागत आदींसाठी त्याचा वापर होतो. या माध्यमातून मजूरटंचाईवर मात करता आली. पेरणी, टोकण आणि कोळपणी असे बहूउपयोगी यंत्र कल्पकतेतून तयार केले आहे. एका चाकावर चालणारे ‘मॅन्युअल’ यंत्र तयार केल्याचा दावा आशुतोष करतात. एक व्यक्‍तीच्या माध्यमातून तीन ते चार एकर पेरणी वा खत देणे या यंत्राच्या माध्यामातून देणे शक्‍य होते असे ते सांगतात.

अन्य प्रयोग

 • हळद लागवडीसाठी एक ते दोन मजुरांचीच गरज भासेल अशी दोन बाय सहा इंच याप्रमाणे ट्रॅक्‍टरद्वारे लागवडीची पद्धत. गेल्या वर्षीपासूनच हे पीक घेण्यास सुरवात
 • एक एकरवर कारली, दहा गुंठे पानकोबी
 • दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून इक्रीसॅट संस्थेकडून तुरीचे संकरित वाण मिळविले.
 • चार वर्षांपूर्वी त्याची आठ एकरांवर लागवड केली. एकरी ११ क्‍विंटलचा उतारा मिळाला. मात्र पुढे परागीभवन व अन्य तांत्रिक कारणांमुळे हे वाण घेणे थांबवले. सध्या प्रचलित वाणाचे ८ ते १० क्विंटल एकरी उत्पादन मिळते.
 • अलीकडील काळात पाच एकरांत नॉन बीट कपाशीचा वापर. लागवड अंतर चार बाय एक फूट. रसशोषक कीड नियंत्रणासाठी पाच एकरांत २५० पिवळे चिकटे सापळे. त्यातून रासायनिक फवारणी खर्चात बचत. पुढीलवर्षी मृगधारा स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून सापळ्यांच्या उत्पादनाचा प्रस्ताव आहे. साधारण एकरी दहा क्‍विंटल उत्पादनाची अपेक्षा.
 • तीन वर्षांपासून केळी लागवड. एकरी २५ टन उत्पादन. व्यापाऱ्यांना थेट विक्री करण्यावर भर

सोशल मीडियाचा प्रभावी वापर
आशुतोष यांनी यू ट्यूबवर स्वतःचे चॅनेल सुरू केले आहे. त्यावर आपल्या यांत्रिकी शेतीचे व्हिडीओ ‘अपलोड’ केले. लखीमपूर (उत्तरप्रदेश) येथील पलविंदरसिंग यांनी लखनऊ ते नागपूर असा विमान प्रवास करून आशुतोष यांचे शेत गाठले व प्रयोगांची माहिती घेतली. या चॅनेलचे देशभरात सात हजारांपर्यंत ‘सबस्क्रायबर’ असल्याचा दावा आशुतोष करतात. कृषी प्रदर्शन व संशोधक संस्थांना भेटी देण्यावर भर राहतो. प्रयोगशील वृत्ती, नवे करण्याची जिद्द आणि उत्साह या गुणांमुळे शेती सुकर झाल्याचे आशुतोष सांगतात.

ॲग्रोवनचे जुने वाचक
आशुतोष पहिल्या दिवसांपासून ॲग्रोवनचे वाचक आहेत. त्यांच्या पुढाकारातून आज गावात अॅग्रोवनचे सुमारे ३४ अंक पोचत आहेत. आपल्या भाषणांमधूनही ते ॲग्रोवनची उपयुक्तता व्यक्त करीत असतात.

आशुतोष देशमुख, ९४०४६८९८४०

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...
दोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
शोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...
सुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....
वातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार...पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने...
‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा...अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि....
तीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात...रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज...
संघर्षातून चौदा वर्षांपासून टिकविलेली...लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक...
विकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...
संघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी...आटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या...
भाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार...
दुष्काळात ऊस वाचविण्यासाठी ...यंदाच्या तीव्र दुष्काळात ऊस उत्पादक चिंतेत असून...
ताजी दर्जेदार दुग्धोत्पादने हीच...सध्या दूध उत्पादकांपुढे प्रक्रिया उद्योग किंवा...
पुदिना शेतीतून मिळाला वर्षभर रोजगारमेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ...