उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा नमुना असलेली मांडगेंची शेती

मांडगे कुटुंबाच्या प्रगतीची वैशिष्ट्ये चार भावांची एकी प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी शेतीला दुग्धव्यवसायाचा बळकट आधार मजुरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी यंत्रांचा पर्याय दुग्धप्रक्रिया सेंद्रिय घटकांचा मुबलक वापर करून जमिनीची वाढवलेली सुपीकता.
शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देत चारा पिकांसाठी अधिक क्षेत्र ठेवले आहे.
शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देत चारा पिकांसाठी अधिक क्षेत्र ठेवले आहे.

कयाधू नदीचे पात्र ओलांडून गेल्यास तीन किलोमीटरवर तर नर्सी नामदेव मार्गे गेल्यास हिंगोली शहरापासून १४ किलोमीटरवर बेलवाडी हे छोटे गाव आहे. हिंगोली शहराला दूधपुरवठा करणारे गाव अशी त्याची ओळख आहे. याच गावातील रामेश्वर मांडगे यांचे चार भावांचे कुटूंब आज प्रयोगशील शेतकऱ्यांचे कुटूंब म्हणून अोळखले जाते. कुटुंबाच्या प्रगतीचे टप्पे

  • १) रामेश्वर यांचे वडील किशनराव यांची बेलवाडी शिवारात वडिलोपार्जित केवळ तीन ते साडेतीन एकर जिरायती जमीन होती. त्यातून फारसे उत्पादन मिळत नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालविणे जिकिरीचे झाले होते. त्यांना सालगडी म्हणून तसेच मजुरीची कामे करावी लागत.
  • २) रामेश्वर यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांनी सुरवातीच्या काळात एसटी महामंडळ, परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र व हैद्रराबाद या ठिकाणी खासगी नोकऱ्या केल्या. पण त्यात मन रमले नाही. दरम्यानच्या काळात वडिलांनी म्हैस खरेदी केली. हिंगोली शहरात घरोघरी दूधविक्री सुरू केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागले
  • ३) मिळणाऱ्या नफ्यातून दरवर्षी एक-दोन म्हशी विकत घेत संख्या वाढवली.
  • ४) दुसरीकडे दरवर्षी दोन ते चार एकर असे करीत १०० एकर जमीन खरेदीपर्यंत मजल मारली. जमीन आणि म्हशी असे दुहेरी शतक करण्याची किमया कुटुंबाने साधली.
  • शेती- बेलवाडी शिवार व वरुड गवळी शिवारात प्रत्येकी ५० अशी एकत्रित १०० एकर.त्यातील ३५ एकर हलकी, उर्वरित मध्यम स्वरुपाची.

    पीक व्यवस्थापन

  • सोयाबीन- २५ एकर, तूर, मूग, उडीद, हरभरा, ज्वारी, करडई.  उर्वरित क्षेत्र चारा पिकांसाठी. यात मका, लसूण घास, टाळकी ज्वारी, भेंडी ज्वारी, ऊस, सुधारित गवत, रब्बीत वर्षभराच्या कडब्यासाठी २५ ते ३० एकर ज्वारी  
  • सिंचन- दोन विहिरी, चार बोअर्स. कयाधू नदीवरून पाइपलाइनद्वारे पाणी. चार शेततळी. यामुळे संपूर्ण शंभर एकर क्षेत्र हंगामी सिंचनाखाली.  
  • कपाशी- एकरी १५ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे चार वर्षांपासून कापूस घेणे थांबवले.
  • दुग्धव्यवसाय

  • एकूण ९० म्हशी. मुऱ्हा व जाफराबादी.
  • पूर्वी दीडशे संकरीत गायी व ६० म्हशी होत्या. परंतु, गायीच्या दुधास मागणी कमी असल्याने म्हशीची संख्या वाढवली. दोन संकरित गायी. गेल्या पाच वर्षांत म्हशीची संख्या जवळपास दुपटीने वाढविली.
  • गोठ्यातील व्यवस्थापन  प्रत्येकी १०० बाय २२ फूट आकाराचे एकाशेजारी एक तीन टीन पत्र्यांचे गोठे. सिमेंटची गच्ची. त्यामुळे शेण, मूत्र यामुळे खड्डे पडत नाहीत. गव्हाणीत फरशी. चारा व पाणी पिण्याची व्यवस्था. वातावरण थंड ठेवण्यासाठी छताला पंखे. फाॅगर्सचा वापर. हिवाळ्यात तापमान नियंत्रित राखले जाते.सर्व म्हशींची आधार नोंदणी. मुक्त संचार गोठ्याची उभारणी सुरू चारा व्यवस्थापन यंत्राद्वारे ज्वारीचा कडबा, ऊस, गवत आदींची कुट्टी.  सोयाबीन, तूर,ज्वारी आदी पिकांची गुळी साठवून वर्षभर वापर. कॅल्शियमयुक्त आहाराची गरज लक्षात घेऊन धान्यांचा छोट्या गिरणीद्वारे भरडा. दररोज दोन वेळेस दुभत्या म्हशींना सरकी पेंड दुग्धव्यवसायाचे अर्थकारण दररोजचे संकलन - ४५० ते ५०० लिटर. हिंगोली शहरात घरोघरी जाऊन सुमारे ३०० लिटर दुधाचे रतीब  दुधाचा दर- ६० ते ७० रुपये प्रति लिटर वैशिष्ट्य- खात्रीशीर, उत्तम दर्जाच्या दुधामुळे ३० ते ३५ वर्षांपासून ग्राहक टिकून आहेत. प्रक्रिया हिंगोली शहरात ‘अकोला बायपास’ रस्त्यावर ‘मिल्क बार’.  दररोज संध्याकाळी सुमारे १५ लिटर मसाला दूध, पनीर, दही. महिन्याला सुमारे ३० किलो पनीरची विक्री. प्रक्रिया उद्योगात घरच्या महिला सदस्यांची मोठी मदत अशी वाढवली जमिनीची सुपीकता

  • वार्षिक शेणखत- १५० ते २५० ट्रॉली.
  • दरवर्षी मेंढपाळ बोलावून शेतात मेंढ्या बसविल्या जातात.
  • गोठ्यातील पाणी, मूत्र, स्वीमिंग पूलमधील पाणी (स्लरी) हौदात एकत्रित केले जाते.
  • ठिबक यंत्रणेला फिल्टर. त्यानंतर पंपाद्वारे स्लरी विविध पिकांना दिली जाते.
  • हलक्या प्रतीच्या रानाला नियमित शेणखत मिळू लागल्यामुळे सुपीकता वाढली आहे.
  • कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर. जीवामृत निर्मिती.
  • अन्नद्रव्य व्यवस्थापनातून रासायनिक खतांवरील खर्च कमी केला.
  • कामांची विभागणी

  • रामेश्वर कुटुंबात जेष्ठ सदस्य. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामांची विभागणी
  • दुग्ध व्यवसाय- बंधू बाजीराव, अशोक, सुभाष
  • रामेश्वर यांचा मुलगा बाबाराव- शेती, पुतण्या परमेश्वर- मिल्कबार व्यवसाय
  • सचिन, माधव यांच्यासह भावाच्या मुलांची दुग्धव्यवसायात मदत.
  • आठ सालगडी
  • पुरस्कार व अन्य कार्य

  • सिंचन सहयोग परिषदेत (परभणी-२०१७) सन्मानित
  • हिंगोली जिल्हा परिषदेचा हिंगोली कृषिरत्न,
  •  पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे गौरव
  • रामेश्वर समाजकारणालाही वेळ देतात. शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग
  • शेतकरी मंडळाच्या माध्यमातून गावात दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा मानस.
  • मार्गदर्शन -- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डाॅ. उत्तमराव इंगळे. विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषी विभाग. संपर्क- रामेश्वर मांडगे - ९७६३८१०५२४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com