जमीन सुपिकतेसह निरोगी अन्नाचे उत्पादन

जमीन होतेय सुपीक सलग तीन वर्षांपासून रासायनिक निविष्ठांचा वापर नाही. नैसर्गिक व्यवस्थापन असल्याने जमिनीत गांडूळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जमीन भुसभुशीत झाली आहे. जमीन लवकर वाफसा अवस्थेत येते. निचरा चांगला होतो. सध्या ५० गुंठ्यात नैसर्गिक शेती होत असली तरी येत्या काळात उर्वरित क्षेत्रातही त्याचा वापर सुरू करणार असल्याचे अरविंद जाधव म्हणाले.
ऊसशेती करताना जमिनीचे आरोग्य राखले आहे.
ऊसशेती करताना जमिनीचे आरोग्य राखले आहे.

तरुण शेतकरी अरविंद जाधव (बोरगाव, जि. सांगली) २०१५ पासून ५० गुंठ्यांत रासायनिक निविष्ठांचा वापर न करता म्हणजे नैसर्गिक पद्धतीने शेती करीत आहेत. ऊस, त्यात विविध आंतरपिके, हळद आदी पिके त्यांनी घेतली आहेत. शेतीतील खर्च कमी करण्याबरोबर जमिनीची सुधारणा व रासायनिक अंशमुक्त अन्न पिकवणे ही उद्दिष्टे साध्य करण्याकडे आपल्या शेतीची वाटचाल सुरू असल्याचे समाधान मिळवले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यात कै. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या पूर्वेस बोरगावचे शिवार लागते. उसाचा हा हुकमी पट्टा. त्यास दुग्धव्यवसायाची जोड ही येथील शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धत. कृष्णा नदीकाठावर वसलेलं बोरगाव राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, शेती क्षेत्रात विकसनशील म्हणून ओळखले जाते. शेती युवा शेतकऱ्याची बोरगावातील युवा शेतकरी अरविंद शामराव जाधव यांनी एमएपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर साखर कारखान्यात नोकरी धरली. वडिलोपार्जित तीन एकर जमीन. दोन लहान भाऊ, बहीण, आई, वडील असा त्यांचा परिवार. पारंपरिक पद्धतीने शेती व्हायची. ॲग्रोवनने बदलली शेतीची दिशा ॲग्रोवन व साम टीव्ही यातील सेंद्रिय, नैसर्गिक व रासायनिक अंशमुक्त शेतीच्या यशोगाथा अरविंद यांच्या वाचनात व पाहण्यात आल्या. सध्याच्या खर्चिक शेतीवर त्यातून काहीसा पर्याय मिळेल असे त्यांना वाटले. यशकथेतील संबंधित शेतकऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून त्याविषयी बारकाईने माहिती घेण्यास सुरवात केली. या विषयातील प्रशिक्षणही घेतले. घरातून झाला प्रखर विरोध अरविंद यांनी नैसर्गिक शेती करण्याचा विचार घरच्यांपुढे मांडला खरा. पण घरातून कडाडून विरोध झाला. तू फक्त नोकरीच कर, शेतीचं आम्ही बघतो असा सल्ला मिळाला. अरविंद निराश झाले. मात्र चिकाटी न सोडता हा मुद्दा सतत रेटून धरला. अखेर वडिलांनी बोरगाव- खेड रस्त्यावरील ५० गुंठे जमिनीवर यासंबंधीचे प्रयोग करायला संमती दिली. मात्र यातून चांगले उत्पादन व उत्पन्न न मिळाल्यास कर्ज काढून घर चालवावे लागेल असाही इशारा दिला. मात्र ही शेती यशस्वी करायचे अशीच अरविंद यांनी जिद्द ठेवली. प्रयोगांना सुरवात हा काळ होता २०१५ चा. नैसर्गिक शेती करण्यासाठी देशी गायी असणे गरजेचे आहे हे लक्षात आले. एक खिलार व गीर अशा दोन गायींपासून सुरवात केली. तणांचा अवशेष म्हणून वापर, मशागत टाळणे, रासायनिक खतांचा वापर पूर्ण थांबवणे या बाबींचा अवलंब सुरू झाला. प्रयोगांची सुरूवात खोडवा उसापासून झाली. या पिकाची आॅगस्टपर्यंतची वाढ अत्यंत संथ होती. जाणारे-येणारेही पिकाच्या वाढीबाबत शंका व्यक्त करीत होते. मात्र अरविंद यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. नैसर्गिक शेतीतील प्रयत्न

  • घनजीवामृत व जीवामृत तयार करून त्याचा वापर
  • पुढे खोडवा उसाचे ५० गुंठ्यांत ६५ टन उत्पादन मिळाले. कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य झळकले. या प्रयत्नांना सकारात्मक दिशा दिसली.
  • खोडवा पीक गेल्यावर नांगरटीविना केवळ रोटावेटर वापरून मारुन सरी सोडून त्यात उन्हाळी मुगाचे पीक घेतले. त्याचे चार क्विंटल उत्पादन मिळाले.
  • मूग काढल्यानंतर हळद. त्याचे सुकवलेले २५ क्विंटल उत्पादन.
  • सांगली येथील व्यापाऱ्याने हळकुंडाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यास सांगितले. त्याची
  • ११ हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली. सुमारे दोन क्विंटल हळदीची पावडर तयार करून
  • २५० रुपये प्रति किलो दराने विक्री केली.
  • हळदीनंतर आठ बाय दोन फुटावर को ८६०३२ वाणाच्या उसाची लावण केली. आंतरपिके घेण्यासाठी
  • पट्टा अधिक रुंदीचा ठेवला. यात खरिपात उडीद व भुईमूग ही पिके घेतली. त्यांचे उत्पादन अनुक्रमे
  • ५० किलो व १०० किलो याप्रमाणे मिळाले. त्यानंतर रब्बीत गहू व बाजूला चवळी घेतली.
  • चवळीची किलोला ७० रुपये तर गव्हाची ३० रुपये दराने विक्री केली. त्यातून समाधानकारक रक्कम हाती आली. उत्पादन खर्च त्यातून कमी झाला. सध्या ऊस आठ ते दहा कांड्यांवर आहे.
  • हळद पावडर, चवळी, मूग यांची विक्री घरूनच होते. सोशल मीडियावरूनही मागणी होते.
  • उडीद, मूग, चवळी, पावटा, घेवडा, तूर आदी वाणांची घरी साठवणूक. बियाणे घरीच तयार करून वापरले जाते.
  • जीवामृत पिकांना देण्यासाठी कल्पकता वापरली आहे. विहिरीजवळ पाचशे लिटर क्षमतेची प्लॅस्टिक टाकी बसवली. त्यात जीवामृत तयार केले जाते. विद्युत पंपाखाली सक्‍शन पाईपला तोटी काढून फूट व्हॉल्व्ह टाकीत सोडला जातो. पंप सुरू झाल्यानंतर हळूहळू जीवामृत खेचले जाते व चेंबरद्वारे थेट पाण्यातून दिले जाते. त्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत.
  • गायी बनल्या कुटुंबातील सदस्य जाधव कुटुंबाने आपल्या दोन गायींचे गायत्री व नंदिनी असे नामकरण केले आहे. दोन दिवसांतून एकदा स्वच्छ धुवून कपड्याने त्यांना पुसून घेतले जाते. हळदी कुंकू लावून पूजा केली जाते. घरासमोरील अंगणात बांधलेल्या या गायी धष्टपुष्ट असून जरेत भरतात. नाव घेतले की, त्या दिशेने कान टवकारतात. दररोज सकाळी तयार झालेली पहिली भाकरी किंवा पोळी त्यांच्या मुखात दिली जाते. घरात येणाऱ्या प्रत्येकाचे या देशी गायीचे दूध देऊनच स्वागत केले जाते. घरगुती कारणासाठी वापरून उर्वरित दुधाची प्रति लिटर ८० रुपयांप्रमाणे विक्री केले जाते. संपर्क-  अरविंद जाधव - ९६२३९४०२९९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com