agricultural success story in marathi, agrowon, Chandkapur, Dist. Nagar group farmers soil upgradation with drainage system | Agrowon

भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची सुपिकतेकडे वाटचाल
सूर्यकांत नेटके
शनिवार, 23 जून 2018

पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याची समस्या राज्यात अनेक ठिकाणी आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्था, विद्यापीठ, शेतकरी कंपनी व कृषी विभाग यांच्या सामूहिक प्रयत्नांतून चंडकापूर (ता. राहुरी) गावात दोन शेतकऱ्यांकडे भूमीगत निचरा प्रणालीचा प्रयोग राबवला जात आहे. या पद्धतीने अति क्षारांचा तीन ते चार वर्षांत पूर्ण निचरा होऊन जमीन सुधारणा व सुपीकता येण्याला मदत होणार आहे.

पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याची समस्या राज्यात अनेक ठिकाणी आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्था, विद्यापीठ, शेतकरी कंपनी व कृषी विभाग यांच्या सामूहिक प्रयत्नांतून चंडकापूर (ता. राहुरी) गावात दोन शेतकऱ्यांकडे भूमीगत निचरा प्रणालीचा प्रयोग राबवला जात आहे. या पद्धतीने अति क्षारांचा तीन ते चार वर्षांत पूर्ण निचरा होऊन जमीन सुधारणा व सुपीकता येण्याला मदत होणार आहे.

मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रावर सतत तीच पिके घेताना अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खते आणि पाण्याचा अती किंवा अनियंत्रित वापर झाला. त्याचे परिणाम म्हणून जमिनी नापीक, चोपण, क्षारयुक्त झाल्या आहेत. त्यामुळे उत्पादन पूर्वीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी आले आहे. विशेषतः मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा नद्यांच्या कार्यक्षेत्रातील जमिनीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे.

क्षारपड जमिनींची सुधारणा
क्षारपड जमिनींची सुधारणा करणारी यंत्रसामग्री व तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. मात्र त्याचा खर्च, श्रम हे काही एकट्या शेतकऱ्याच्या दृष्टीने सुलभ नाही. विविध संस्था जर त्यासाठी एकत्र आल्या तर हे काम सोपे होऊ शकते. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथे त्यादृष्टीने प्रयोग सुरू आहेत.
प्रयोग - भूमीगत निचरा प्रणाली प्रयोग
ठिकाण - चंडकापूर
सहभाग

 • कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर (बुलढाणा) - प्रकल्प अंमलबजावणी
 • महात्मा फुले कृषी विद्यापीठ - तांत्रिक मार्गदर्शन
 • कृषी विभाग- ‘आत्मा'- योजना व गरजेनुसार मदत
 • दीपस्तंभ ॲग्रो प्रोड्यूसर शेतकरी कंपनी- मानोरी, ता. राहुरी
 • कंपनीतील फ्रान्सीस पंडित व प्रभाकर जरे
 • दोघेजण चंडकापूरचे असून त्यांच्या प्रत्येकी एक एकरांत प्रयोग सुरू
 • मार्गदर्शन व सहकार्य - कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील जलसिंचन व निचरा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, जलसिंचन व निचरा विभागाचे विभागाचे डॉ. सुनील कदम, कृषी विकास च्या व्यवस्थापिका दीपाली मानकर, धीरज कदम, संदीप चव्हाण
 • प्रयोग खर्च - सुमारे ५५ हजार रुपये
 • संस्था ४५ हजार रु. व शेतकरी १० हजार रु.
 • एका खाजगी बॅंकेने सामाजिक जबाबदारी म्हणून आर्थिक मदत केली आहे.

अशी आहे "भूमिगत निचरा प्रणाली'

 • क्षारयुक्त जमिनीत वीस ते पंचवीस मीटर अंतरावर चार फूट खोल व तीन फूट रुंदीचा उताराने चर खोदण्यात येतो. हे काम अलीकडे यंत्राद्वारेही होते. त्यानुसार चर चार फूट खोल व तीन फूट रूंद असतो. चर खोदण्यामागून पाईप टाकला जातो.
 • जमिनीच्या प्रकारानुसार दोन चरांतील अंतर बदलते. जेवढे अंतर कमी तेवढे चांगले.
 • उदा. हलक्या जमिनीत- २० मीटर, मध्यम जमिनीत २५ ते ३० तर भारी जमिनीत ४० मीटर
 • मध्यभागी मुख्य चर खोदला जातो.
 • मुख्य चरात क्षारयुक्त पाणी वाहून नेण्यासाठी छिद्र नसलेला पाईप टाकला जातो.
 • त्या पाईपाला सछिद्र पाईप्स जोडले जातात.
 • शेतात पाणी साठल्यावर जमिनीतील क्षार पाण्यात विरघळून पाण्यासोबत मुख्य पाईपमध्ये येतात. हे पाणी नदीला सोडले जाते.
 • साधारण दहा ते बारा वर्षे हा प्रयोग टिकू शकतो.
 • अन्य शेतकऱ्यांसाठी या प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. त्यातून अजून सहभाग वाढण्याचा प्रयत्न राहील.

मोल निचरा पद्धत

 • क्षारयुक्त युक्त पाण्याचा निचरा करून क्षारमुक्त जमीन करण्यासाठी मूल निचरा पद्धतीही राहुरी तालुक्‍यात याच प्रकल्पाच्या अंतर्गत राबवली जात आहे.
 • क्षेत्र - १६ एकर, शेतकरी १६
 • क्षारयुक्त शेतात बारा फूट अंतरावर अडीच फूट खोलीवर जमिनीत मोकळा चर केला जातो.
 • यात ६५ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरला सबसाॅयलरप्रमाणे मोल नांगर जोडण्यात येतो.
 • तो दोन फूट खाली जातो. नळीद्वारे पोकळी तयार होते. जास्तीचे पाणी भेगांमधून पोकळीत येते.
 • ढाळ दिलेला असतो. त्यामुळे मुख्य चरात पाणी येते. पाईपद्वारे चरात आलेले पाणी बाहेर काढले जाते.
 • या पद्धतीला हेक्टरी एकरी साते आठ हजार रुपये खर्च येतो.
 • साधारण तीन वर्षे हा प्रयोग टिकतो.

प्रकल्पाच्या अनुषंगाने अन्य सुरू बाबी

 • जमीन सुपीक करण्यापूर्वी पाण्याचे १० व मातीचे ५० नमुने राहुरी विद्यापीठाकडून तपासले.
 • यात सामू, विद्युतवाहकता, सेंद्रिय कर्ब, एनपीके, सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये, बाय कार्बोनेट, क्‍लोराईड, सल्फेटस आदी अनेक महत्त्वाच्या बाबी तपासण्यात आल्या.
 • त्यात क्षारपड जमिनींची तातडीने सुधारणा करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले.
 • त्याचाच भाग म्हणून तीन लाभार्थ्यांना क्षार वेगळे करणारे यंत्र, सतरा लाभार्थ्यांना ठिबक संच, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी तीस ठिकाणी गांडूळ प्रकल्प आणि ३८ ठिकाणी बायोगॅस प्रकल्पासाठी अनुदान
 • कोपरगाव तालुक्‍यातही असा उपक्रम

जमिनीतील क्षार कमी करण्यासाठी भूमीगत निचरा प्रणाली फायदेशीर प्रयोग आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जमीन सुधारणेसाठी त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे.
- डॉ. सुनील गोरंटीवार
विभाग प्रमुख, जलसिंचन व निचरा विभाग, अभियांत्रिकी महाविद्यालय
महात्मा फुले कृषी विद्यापीठ
९८८१५९५०८१

खत, पाण्याच्या अती वापरामुळे अमोल किमतीच्या जमिनी क्षारयुक्त झाल्या आहेत.
त्यासाठी भूमीगत निचरा प्रणाली प्रयोग अधिकाधिक शेतकऱ्यांनी करावा असा आमचा प्रयत्न आहे.
भाऊसाहेब बऱ्हाटे - ९४२३७८८६००
प्रकल्प संचालक, आत्मा, नगर

आमच्या ‘दीपस्तंभ’ शेतकरी कंपनीने जमीन सुधारणा प्रकल्पात सहभाग घेतला. चंडकापूर येथील प्रयोग अभ्यासून अन्य शेतकरी त्याचा आदर्श घेतील.
डॉ. दत्तात्रय वने, कृषिभूषण, मानोरी
९४२२७५२१०१

जमीन चोपण, क्षारपड झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होतो. तंत्राचा वापर करून येत्या चार वर्षांत जमिनीत सुधारणा होईल अशी आशा बाळगली आहे.
फ्रान्सीस पंडित, चंडकापूर (संपर्क - ९८५०३६१९६८)
प्रभाकर जरे, शेतकरी, चंडकापूर ( संपर्क : ९४२३२४८७८१)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...