तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

शेंगा पोखरणारी अळी
शेंगा पोखरणारी अळी

 सध्याची पीक व कीड प्रादुर्भाव अवस्था तुरीचे पीक फुलोऱ्यात तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. पीक हिरवेगार, लुसलुशीत आणि दाट पानांचे असल्यामुळे त्याकडे अनेक किडी आकर्षित होतात. पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही कीड तुरीवर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत क्रियाशील असते.

किडीची नेमकी ओळख

  • किडीचा पतंग पिवळसर. पुढील पंख तपकिरी रंगाचे. त्यावर काळे ठिपके. मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या.
  • मादी पतंग कोवळी पाने, देठ अथवा कळ्या फुले तसेच शेंगांवर अंडी घालते. अंडी घालण्याची प्रक्रिया बहुधा संध्याकाळी सुरू होते.
  • नुकसान कसे करते?

  • एक मादी सरासरी ६०० ते ८०० अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीस कोवळी पाने व देठ कुरतडून खातात.
  • पूर्ण विकसित झालेली अळी पोपटी रंगाची असून विविध रंगछटा असणाऱ्या अळ्यासुद्धा दृष्टीस पडतात.
  •  सहसा पानावरील प्रादुर्भाव आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक नसतो.
  • प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळी कळी व फुलांवर तर नंतरची अवस्था फुलांपेक्षा शेंगावर जास्त प्रमाणात आढळून येते.
  • अळी शेंगावर अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून अर्धी आत व बाहेर राहून शेंगातील अपरिपक्व दाणे खाते. एक अळी सात ते १६ तुरीच्या शेंगाचे नुकसान करते.
  • असे करावे नियंत्रण

  • तूर पीकविरहीत ठेवावे. तसेच मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा.
  • शेतात हेक्‍टरी ५० पक्षी थांबे उभारल्यामुळे अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.
  • किडीच्या सर्वेक्षणासाठी हेक्‍टरी १० कामगंध सापळे लावावेत.
  • ८ ते १० पतंग प्रति सापळा २ ते ३ दिवस किंवा एक अळी प्रति झाड किंवा ५ टक्के शेंगाचे नुकसान दिसून येताच नियंत्रणाचे उपाय योजावेत.
  • जैविक उपाय फवारणी

  • सुरवातीच्या काळात प्रतिबंधक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्‍टिन दहा हजार पीपीएम १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून
  • एचएएनपीव्ही ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क एक मिली प्रति लिटर पाण्यातून
  • रासायनिक नियंत्रण

  • आर्थिक नुकसान पातळी अोलांडल्यास...खालीलपैकी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी
  • (प्रमाण प्रति १० लिटर पाणी)
  • इमामेक्‍टीन बेंझोएट (५ एस जी) ४ ग्रॅम
  • किंवा क्‍लोरॲंन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी)- ३ मिली
  • स्पिनोसॅड (४५ एससी) २.५ मिली
  • संपर्क-  डॉ. अंकुश चोरमुले - ८२७५३९१७३१ (लेखक कीटकनाशक विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com