agricultural success story in marathi, agrowon, dasala, selu, parbhani | Agrowon

वर्षभर उत्पन्न देणारी गजमल यांची फळबाग पद्धती
माणिक रासवे
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

लिंबाची यशस्वी लागवड
उसाच्या तुलनेत कमी पाण्यावर येणाऱ्या, तसेच चांगले उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करावी असे गजमल यांना वाटू लागले. शेजारील राधे धामनगावातील विनायक गोरे अनेक वर्षांपासून चांगले लिंबू उत्पादन घेतात. त्यांच्या मार्गदर्शनातून एक एकरवर लिंबाच्या साई सरबती वाणाची लागवड केली. त्यानंतर सातत्याने चांगले व्यवस्थापन ठेवत हे पीक यशस्वी करणे त्यांना शक्य झाले आहे.

वर्षभर उत्पन्न सुरू ठेवणारे लिंबू व जोडीला हंगामात पैसे देणारे सीताफळ व पेरू अशी फळबागकेंद्रित शेतीपद्धती परभणी जिल्ह्यातील डासाळा येथील अशोक गजमल यांनी अंगीकारली आहे. दूरदृष्टी, उत्तम ते निवडण्याची क्षमता, कुशल व्यवस्थापन व मार्केटची मागणी अोळखणे या जमेच्या गोष्टी राहिल्यानेच प्रतिकूलतेतही शेती यशस्वी करणे त्यांना शक्य होत आहे.
 
परभणी जिल्ह्यातील डासाळा (ता. सेलू) हे अशोक गजमल यांचे गाव. बारावी इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर गेल्या २५ वर्षांपासून शेतीतला अनुभव त्यांचा पक्का झाला आहे. मुकुंद आणि प्रशांत ही त्यांना दोन मुले आहेत. मुकुंद यांचे एम.काॅम.पर्यंत शिक्षण झाले आहे़ तर प्रशांत यांचे शिक्षण सुरू आहे. मुकुंद सेलू येथे खासगी बॅंकेच्या सेवेत अाहेत. दर सुटीच्या दिवशी तेदेखील वडिलांना शेतीत हातभार लावतात.

गजमल कुटुंबाची शेती

 • सुमारे ३३ एकर शेती
 • हलकी ते मध्यम प्रकारची जमीन

फळपीक पद्धतीकडे वळले

पावसाचा अनियमितपणा वाढला आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांपासून उत्पादनाची हमी राहिलेली नाही.
एखाद्या वर्षी उत्पादन चांगले मिळते़, परंतु रास्त बाजारभावाची खात्री नाही.
दिवसेंदिवस मजुरांची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे केवळ जिरायती पिकांचे उत्पादन घेऊन शेती परवडणार नाही.
पीकपद्धतीत बदल महत्त्वाचा होता, परंतु सिंचनाची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक होते. त्यासाठी बोअर घेतले. त्याला चांगले पाणी लागले.
पाच एकरांवर ऊस लावला, परंतु दोन वर्षे ऊस गाळपाला न गेल्याने मोडून टाकावा लागला.

लिंबू लागवड
उसाच्या तुलनेत कमी पाण्यावर येणाऱ्या, तसेच चांगले उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे गजमल यांना वाटू लागले. शेजारील राधे धामनगावातील विनायक गोरे अनेक वर्षांपासून चांगले लिंबू उत्पादन घेतात. त्यांच्या मार्गदर्शनातून एक एकरवर लिंबाच्या साई सरबती वाणाची लागवड केली. त्यानंतर सातत्याने चांगले व्यवस्थापन ठेवत हे पीक यशस्वी करणे
शक्य झाले आहे.

गजमल यांची लिंबू बाग

 • सुमारे १५ ते १७ वर्षांपासून जोपासना
 • साई सरबती वाण
 • जुनी, नवी धरून एकूण सुमारे ४०० झाडे, पैकी १०० झाडे उत्पादन देणारी
 • सोयाबीन, तूर आदी आंतरपिकेही घेतली.

एकीमुळे मार्केटिंग सोपे
डासाळा परिसरात गोरे यांच्या पुढाकारातून लिंबू उत्पादक संघ स्थापन झाला आहे. त्यामार्फत या भागातील लिंबू उत्पादक एकत्रितपणे विक्री करतात.

लिंबासाठी बाजारपेठा- परभणी, सेलू

मागील वर्षी मिळाले अमृतसरचे मार्केट
राधेधामगाव तसेच डासाळा भागातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी पंजाब राज्यातील अमृतसरचे मार्केट मिळवले.

 • त्यावेळचा दर (किलोचा)
 • अमृतसर- ४५ रुपये स्थानिक- ३०
   

अमृतसरला माल पाठवायचा खर्च जास्त असला तरी स्थानिक दरापेक्षा किलोमागे किमान सहा रुपये दर जास्त मिळाला हे काही थोडे नाही.
-मुकुंद गजमल

फळपीक पद्धतीचा गजमल यांचा पॅटर्न

 • लिंबू सीताफळ- वर्षातील उत्पन्नाचा हंगाम- आॅगस्ट ते नोव्हेंबर
 • वर्षभर उत्पन्न देणारे पीक चार वर्षांपूर्वी उपलब्ध पाण्याचा विचार करून लागवड
 • (सुमारे ४०० झाडे) वाण- एनएमके-१, झाडे सुमारे १००
 • पेरू- ५०० झाडे- लखनौ सरदार- उत्पन्न हंगाम- डिसेंबर
 • सघन पद्धतीने लागवड
 • वार्षिक सुमारे एक ते दीड लाख
 • उत्पन्न, अर्थात दरांवर अवलंबून
 • दर- किलोला १५ ते २० रुपये- वार्षिक सरासरी
 • उन्हाळ्यात- ३० ते ३५ रुपये
 • उर्वरित क्षेत्रात सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, हरभरा आदी पिके

 संत्रा प्रयोगही केला
लिंबू बागेतून शाश्वत उत्पन्न मिळू लागल्यानंतर एकरभर संत्र्याची लागवड केली. काही वर्षे चांगले उत्पादन मिळाले. परंतु पाणी कमी पडू लागल्यामुळे झाडे कमी झाली. त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे.
 
सीताफळाचा ब्रॅंड

गेल्यावर्षीपासून सिताफळाचे उत्पादन सुरु झाले आहे. पहिल्या वर्षीचे उत्पादन नातेवाईक, मित्रमंडळी आदींना वाटण्यातच गेले. यंदा विक्री सुरु झाली. -जालना येथून प्रतिनग १५ रुपये याप्रमाणे कागदी बाॅक्स विकत आणून त्याद्वारे पॅकिंग

 • त्यात १२ नग
 • वजन- सुमारे दोन किलो ७०० ग्रॅम
 • ब्रॅंड- कृषी संजीवनी
 • बॉक्स- १६० ते १७० रूपये

हातोहात झाला खप

व्हाॅटसअॅप, फेसबुक द्वारे केले मार्केटिंग

 • स्थानिक भागातील वकील, डॉक्टर, इंजिनिअर मंडळींकडून त्वरित खरेदी
 • सेलू,परभणी, अकोला, उस्मानाबाद, कल्याण येथूनही मागणी  

नवी लागवड
चार वर्षांपूर्वी लिंबाची २०० झाडे तर दोन र्षांपूर्वी बाळानगर सीताफळाच्या एक हजार झाडांची लागवड
जुनी, नवी मिळून सात एकर नवी फळबाग लागवड

शेततळ्यामुळे पाणीपातळीत वाढ
अवर्षणाच्या स्थितीत लिंबू बाग वाचविण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. मडक्यामध्ये पाणी ठेवून बाग जगवावी लागली. दुष्काळात सात वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या योजनेंतर्गत शेततळे खोदले. आज सुमारे २० एकरांवरील पाणी शेततळ्यामध्ये जमा होऊन मुरते. यामुळे शेततळ्याजवळील बोअरचे फेरभरण होऊन पाणीपातळीत वाढ होत आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळ पडला. परंतु गजमल यांच्या बोअरला चांगले पाणी राहिल्यामुळे फळबाग जोपसता आली. उपलब्ध पाण्याचा ते काटकसरीने वापर करतात. बागेला ठिबक संचाद्वारे पाणी दिले जाते.

नैसर्गिक शेतीवर भर
गेल्या दोन वर्षांपासून रासायनिक निविष्ठांचा वापर बंद करून नैसर्गिक शेतीवर भर
बागेत जीवामृत व दशपर्णी अर्क यांचा वापर

संपर्क- मुकुंद गजमल- ९४०३८१४७४६
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...
शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित...सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) :...
व्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले...नाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र...