उन्हाळी काकडीचे मास्टर सचिन भोर

काकडीचे अर्थकारण सचिन भोर सांगतात की काकडीला किलोला १२ रुपये तरी किमान दर मिळतो. उत्पादन २० ते २५ टन गृहीत धरले तर दोन लाख २४ हजार रुपये ते तीन लाख रुपये हाती येतात. एकरी ८६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. म्हणजेच तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात किमान दोन लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक देऊन जाते. असे दोन हंगाम गृहीत धरले तरी दुप्पट उत्पन्न हाती येऊ शकते.
काकडी पिकातील कुशल शेतकरी म्हणून सचिन भाेर यांची अोळख झाली आहे.
काकडी पिकातील कुशल शेतकरी म्हणून सचिन भाेर यांची अोळख झाली आहे.

जानेवारी ते एप्रिल या कालावधीत दोन वेळा काकडीची लागवड करून त्याची शेती धामणखेल (जि. पुणे) येथील सचिन खंडू भाेर यांनी फायदेशीर केली आहे. सहा वर्षांपासून या शेतीचा अनुभव घेणारे सचिन या पिकात आता मास्टर झाले आहेत. मुख्य म्हणजे काकडीची मागणी व मार्केट यांचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन करण्याचे इंगित त्यांना अवगत झाले आहे. पुणे जिल्ह्यातील धामणखेल (ता. जुन्नर) येथील सचिन खंडू भाेर काकडी पिकातील प्रगतिशील शेतकरी अोळखले जातात. त्यांचे वडीलदेखील या पिकाची शेती करायचे. गेल्या सहा वर्षांपासून सचिन यांनीही सातत्य ठेवत या पिकात मास्टरी मिळवली आहे. आपले वडील व काका यांच्या साह्याने ते शेती सांभाळतात. सचिन यांची काकडी शेती दोन हंगामात लागवड जानेवारी- उन्हाळी हंगामाच्या ताेंडावर काकडीची आवक कमी असते. त्‍यामुळे वाढलेल्या दराची संधी साधण्यासाठी या हंगामाची निवड -काकडीचे थेट बियाणे लावले तर थंडीमुळे उगवण्याचे प्रमाण कमी, तर मरतूक जास्त हाेते. हे टाळण्यासाठी जानेवारीत पाॅलिहाउसमध्ये खासगी नर्सरीतून १० दिवसांच्या राेपांची लागवड केली जाते. यामुळे राेपांचा दर्जा राखला जाऊन दर्जेदार उत्पादनवाढीस मदत हाेते. -या रोपांची फेब्रुवारीत लागवड. -या काळात वेलवर्गीय पिकांची वाढ चांगली होते. एप्रिल यावेळी थेट बियाणे लावले जाते. पुढे पावसाळा, रमजान व अन्य सण असल्याने दरांचा फायदा मिळतो.   ठळक बाबी

  • सुमारे तीन महिन्यांचे पीक.
  • पूर्वी सरी पद्धतीने पीक घेतले जायचे. आता ते बेडवर घेतले जाते.
  • पिकाला पाणी भरपूर म्हणजे एकाअाड एक दिवस लागते. या भागात बोअरवेल्स तसेच धरण असल्याने पाण्याची सोय चांगली आहे.
  • पॉली मल्चिंगचा वापर.
  • त्याचे फायदे
  • खुरपणीचा खर्च वाचतो.
  • पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
  • पिकाचा जोम वाढतो. काकडीला तजेलदारपणा येतो.
  • उत्पादन सचिन सांगतात की, तीन महिन्यांच्या काळात एक दिवसाआड सुमारे एक ते दीड टनाचे तोडे होतात. पुढे ते वाढतातही. एकूण पीक कालावधीत सुमारे २० तोडे होतात. एकूण उत्पादन- एकरी २५ ते ३० टनांपर्यंत. काकडीचे अर्थकारण सचिन सांगतात की, किलोला १२ रुपये तरी किमान दर मिळतो. उत्पादन २० ते २५ टन गृहीत धरले तर दोन लाख २४ हजार रुपये ते तीन लाख रुपये हाती येतात. एकरी ८६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. म्हणजेच तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात किमान दोन लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक देऊन जाते. असे दोन हंगाम गृहीत धरले तरी दुप्पट उत्पन्न हाती येऊ शकते. या बाबींवर होतो मुख्य खर्च (लागवड ते काढणी- निविष्ठांव्यतिरिक्त)

  • राेपवाटिकेत राेपे तयार करणे- प्रति राेप १ रुपया १० पैसै, एकरी ८ हजार राेपांप्रमाणे - ८ हजार ८०० रु.
  • मल्चिंग पेपर - एकरी ८ बंडल- ११, २०० रु.
  • शेणखत तीन ट्राॅली - प्रति ट्राॅली ४ हजार रुपयांप्रमाणे - १२ हजार रु.
  • वेल बांबूवर बांधणीसाठी तंगुस, सुतळी, वेल बांबूवर चढविणे.
  • या खर्चात ठिबक, मल्चिंग पेपर आणि बांबूचा उपयाेग पुढील टाेमॅटाे पिकासाठी हाेतो.
  • बाजारपेठ फेब्रुवारीचा हंगाम हाच दर अधिक देण्याच्या दृष्टीने अधिक चांगला असल्याचे सचिन सांगतात. सरासरी दर किलोला १२ ते १५ रुपये राहतोच. पूर्वी हाच दर किलोला २० ते २२ रुपयांपर्यंतही मिळायचा. सर्व माल वाशी मार्केटला पाठवला जातो. अनेक वर्षांपासून हीच बाजारपेठ पकडल्यामुळे अन्यत्र जाण्याची वेळच न आल्याचे सचिन म्हणाले. आमच्या परिसरात अलीकडील काळात काकडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. गावात अनेक काकडी उत्पादक असल्याने सर्वांचा एकत्रितपणे माल एकाच गाडीतून पाठवला जातो. एकाचा आदर्श दुसऱ्याला मिळून काकडीचा प्रसार होत गेल्याचेही सचिन यांनी सांगितले. मॉललाही विक्री अलीकडील काळात मॉलचा पर्यायही शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे. सचिनदेखील आपला माल मॉलला देतात. त्यास किलोला १८ रुपये दर मिळतो. मात्र त्यांची मागणी केवळ १०० ते १५० किलोपर्यंतच असते. यंदाच्या मार्चमधील दर दृष्टिक्षेपात

    दिनांक उत्पादन (किलाे) तोडेनिहाय -

    मिळालेला दर (रुपये)प्रति किलो

    १७० २०
    ४५ १४
    ६५ १२
    १२ ३९० १५
    १४ ५७० १०

    ॲग्रोवनचा झाला फायदा ॲग्रोवनचे नियमित वाचक असलेले सचिन म्हणाले की, या दैनिकातील विविध माहिती, ज्ञानाचा उपयोग शेतीत वेळोवेळी होतो. त्यामुळेच शेतीत सुधारणा करणे शक्य होते. संपर्क- सचिन भाेर- ९१७५५०१४२६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com