सुधारणा हाच ठरला एकमेव मंत्र

दुष्काळाची समस्या लक्षात घेऊन काही अंतरावर असलेल्या सोमठाना शिवारातील तलावावरून पटेल यांनी पाइपलाइन केली आहे. पाण्याच्या स्रोतासाठी दोन विहिरी व दोन बोअरवेल्स आहेत. एप्रिल ते मे हे दोन महिने त्यांना ‘डॅम’च्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. तेथून पाणी आणण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी सुमारे १४ लाख रुपये खर्च करावे लागले.
 तय्यब व समीर या मुलांसह शकुर पटेल.
तय्यब व समीर या मुलांसह शकुर पटेल.

आपण नेमकं कुठे कमी पडतो, हे एकदा शोधून काढलं, की पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो. ढवळापुरी (जि. अौरंगाबाद) येथील शकुर सांडू पटेल यांच्याबाबत हेच घडलं. गावचे सरपंच असताना शेतीकडे म्हणावं तसं लक्ष देता आलं नाही. त्यातच काही पिकांचे प्रयोग केले; मात्र दुष्काळ, दर व काही प्रसंगी योग्य व्यवस्थापनाअभावी ते ‘फेल’ गेले. ‘सुधारणा’ हा एकच मंत्र लक्षात घेत पटेल यांनी आज शेतीत बदल केले आहेत. त्यातून यशाकडे वाटचाल केली आहे. राजकारणात पडलं की माणसाला शेतीतलं काही सुचत नाही; पण औरंगाबाद जिल्ह्यातील ढवळापुरीच्या शकुर पटेल यांनी हे वाक्य खोडून काढलं. जवळपास दीड वर्षाच्या गावच्या सरपंचकीनंतर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानं ते शेतीकडे वळले ते कायमचेच. ‘गड्या आपली शेतीच बरी’ची हाक त्यांच्या मनानं दिली.   केलेल्या सुधारणा

  •  सुरवातीला काही पिकांचे प्रयोग फेल गेले तरी जिद्द सोडली नाही. डाळिंब व त्यानंतर पेरूची जोड शेतीला दिली.
  • राजकारणातून अंग काढून घेतलं. जे करायचं ते शेतीसाठीच हा ध्यास घेतला. त्यामुळे त्यांच्याबरोबरच खांद्याला खांदा लावून शेतात राबत असलेल्या दोन मुलांचा उद्याचा काळही निश्चित सुरक्षित झाला.
  • पाण्याचे स्रोत वाढविले.
  •  राजकारणापेक्षा शेतीलाच घेतलं वाहून वडिलोपार्जित चाळीस एकर शेती असलेले शकुर सांडू पटेल ढवळापुरी पंचक्रोशीत सर्वांच्या परिचयाचे. राजकारणात रमलेले. सन २००६ मध्ये सरपंचपदाची संधी त्यांना मिळाली. पण वर्षभराचा कालावधी जात नाही तोच त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आला. दरम्यान, शेतीत रमलेल्या काही माणसांच्या संपर्कात ते आले. मग अविश्वास प्रस्ताव थांबविण्याऐवजी राजकारण सोडून शेतीवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण कुटुंबच राबतं शेतीत आज स्वतः शकुरभाई तसेच तय्यब आणि समीर ही दोन मुलं व घरच्या महिला सदस्य असे सगळे शेतीत राबतात. त्यामुळे मजुरांचा प्रश्नही त्यांनी बऱ्याच प्रमाणात सोडवला आहे. शेतीतल्या सुधारणा

  • पटेल यांनी पारंपरिक पिकांना बगल देताना केळी, पपई, मिरची आदी पिकं घेतली. त्याचवेळी दुष्काळही आला. केळीसाठी पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. पपई, मिरची ‘व्हायरस’मुळे गेली.
  • त्यानंतर पाणी, मजुरी व बाजारपेठ अशा सर्व अंगांनी विविध पिकांचा शोध घेतला. त्यात डाळिंब आणि पेरू ही पिकं बरी वाटली.
  • भागातील कृषिभूषण प्रयोगशील शेतकरी सिकंदर जाधव मदतीला आले. त्यांचं विशेष मार्गदर्शन मिळू लागलं.
  • आज डाळिंब व पेरू हीच मुख्य पिकं झाली आहेत. डाळिंबाची सुमारे १६०० झाडं आहेत.
  • आत्तापर्यंत त्याचे दोन बहर घेतले. त्यातून अनुक्रमे ३५ टन व ५६ टन (एकूण उत्पादन) मिळालं.
  • साधारण किलोला ४० रुपये दर मिळाला आहे.
  • पेरू शेतीही तशी नवी आहे. वर्षाला दोनवेळा छाटणी करून दोन बहर घेतले आहेत. सुमारे २२०० झाडं आहेत.
  • पेरूची बाग एप्रिलपासून ताणावर सोडली जाते. मेच्या सुरवातीला बागेची छाटणी केली जाते. छाटणीनंतर ड्रीपच्या साहाय्याने पाणी दिलं जातं. पंधरवड्याने दररोज दोन तास पाणी साधारणत: जूनपर्यंत दिलं जातं. छाटणीनंतर पंधरवड्याने कळी लागणं सुरू झालं की गरजेनुसार फवारणी घेतली जाते.
  • पेरूचं एकूण एकराशे क्रेट पहिल्या बहरातील उत्पादन मिळालं. दुसऱ्या बहरातील बाग दोन लाख रुपयांना व्यापाऱ्यांना देण्यात आली. तिसऱ्या बहरापासून चांगलं उत्पादन व उत्पन्न पटेल यांना अपेक्षित आहे. क्रेटला ७०० ते एक हजार रुपये दर सुरू आहे. पेरूला नोटाबंदीचाही सामना करावा लागला. जागेवरून जवळपास १५० रुपये प्रतिक्रेट दराने पेरू विकावे लागले.
  • अन्य पिकांचं नियोजन पीकपद्धतीत सुधारणा करताना पटेल यांनी बाजारपेठेचाही बारकाईने अभ्यास केला आहे. पारंपरिक पिकांचं नियोजन करताना प्रत्येक वर्षी जवळपास २० एकर कपाशीची होणारी लागवड यंदा पाच एकरांवर आणली आहे. वीस एकर कपाशीतून प्रत्येक वर्षी १०० त १२५ क्‍विंटल कापूस व्हायचा. त्याला प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयांदरम्यान दर मिळायचा. सुमारे २५ वर्षांच्या कापूस शेतीत शंभर क्‍विंटल कापसाला एकवेळच सात हजार रुपये दर मिळाल्याचं ते सांगतात. यंदा पाच एकर कपाशीपैकी अडीच एकर ड्रीपवर आहे. पाच एकरांतून आजवर ४० क्‍विंटल उत्पादन मिळालं आहे. पूर्वी सुमारे १५ एकरांत मका असायचा. त्याला एक हजार ते चौदाशे रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत दर मिळायचा. आता यंदा सहा एकरच मक्याचं क्षेत्र ठेवलं आहे. गव्हाचंही क्षेत्र चांगलं असतं. यंदा पाच एकरांवर खरबुजाचंही नियोजन आहे. संपर्क- शकुर पटेल - ९९६००४२४४८  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com