शुध्द, दर्जेदार मधाचा 'रियल हनी ब्रॅंड'

दिनकर पाटील यांचा रिएल हनी हा मधाचा ब्रॅंड
दिनकर पाटील यांचा रिएल हनी हा मधाचा ब्रॅंड

मधमाधीपालन उद्योगात लातूर येथील दिनकर पाटील यांनी राज्यासह राज्याबाहेरही मोठे नाव तयार केले आहे. मधमाशी पेट्या व्यवसाय, परागीभवन, मधविक्री आदींमधून आर्थिक स्त्रोत भक्कम केले. मधमाशीपालनाची चळवळ व्यापक केली. पुढचे पाऊल म्हणून मार्केटिंगचे विविध फंडे वापरून ‘रिएल हनी’ या ब्रॅंडने आपला दर्जेदार मध बाजारपेठेत उपलब्ध केला आहे. ग्राहकांचाही त्यास मोठा प्रतिसाद लाभत आहे. मधमाशीपालन उद्योगातील मोठे नाव म्हणून लातूर येथील दिनकर पाटील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. चाकूर तालुक्‍यातील लातूर रोड (जि. लातूर) गावात त्यांची केवळ चार एकर शेती. मात्र ३७ वर्षे वयाच्या या पदवीधर तरुणाने मधमाशीपालन उद्योग अशा काळात (सन २००६- ०७) सुरू केला ज्या काळात मधमाशीपालन हा शब्द तसा नावापुरताच होता. पाटील यांनी उद्योजकतेची दृष्टी ठेऊन त्याचा विस्तार केला. आज व्यावसायिक मधनिर्मितीत उतरून त्यांनी या क्षेत्रात पुढचे पाऊल टाकले आहे. पाटील यांचा मध उत्पादन उद्योग

  • पूर्वी मध उत्पादन करायचे. मात्र बल्कमध्ये खादी ग्रामोद्योग किंवा अन्य लोकांना द्यायचे.
  • मागील एप्रिलपासून ‘रिएल हनी’ नावाने पॅकिंगमधून थेट विक्री
  • पॅकिंग- पेट व बॉटल स्वरूपात- ५० ग्रॅमपासून अर्धा, एक किलोपर्यंत विविध
  • गुणवत्ता

  •  दर्जेदार शुद्ध मध, कोणतेही ‘ॲडेटिव्ह’ मिसळले जात नाही.
  • फूड सेफ्टी क्षेत्रातील केंद्रीय संस्थेचे प्रमाणपत्र
  • विक्री

  • पूर्वी लेबल न लावता विक्री. त्यामुळे खप मर्यादित होता. संस्थेला तो कमी किंमतीत विकावा लागे.
  • आता सुमारे १६ महिन्यांत २० ते २२ टन विक्री
  • मधाचे प्रकार (फुलांवर आधारीत)  सूर्यफूल, मोहरी, अोवा, मिश्र, निलगिरी, तीळ आदी मार्केटिंगचे फंडे  पुणे, मुंबई, नाशिक, लातूर, सांगली- एजन्सी. सध्या पुणे शहरात तीन केंद्रे. होम डिलिव्हरी. वेबसाइटद्वारे ऑनलाइन विक्री

  •  पुण्यातील आरोग्याबाबत जागरूक ग्राहक आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न.
  • अविनाश कांबळे यांच्यावर ही जबाबदारी
  • महिन्याला सुमारे ३०० ते ४०० किलो विक्री
  • पुण्यातील ‘आयटी’ कंपन्यांमधून स्टॉल्स तेथील कर्मचाऱ्यांना मधाचा नमुना दिला जातो. मधाचे संकलन, प्रक्रिया, गुणवत्ता तेथील ग्राहकांना लॅपटॉपद्वारे पटवून दिली जाते. ‘क्‍लीप्स’द्वारे या गोष्टी पाहिल्यावर ग्राहक मधाची खरेदी केल्याशिवाय राहात नाहीत. फेसबुकचा वापर. - त्यावर आठवड्यातून दोन दिवस लक्षवेधी जाहिरात. विशिष्ट फुलाचा मध आला तर त्याची तसेच मधसंकलनाची माहितीही दिली जाते. ड्रायफ्रूटयुक्त मध दिवाळी किंवा सणांमध्ये स्वीटस, ड्रायफ्रुटस देण्याची प्रथा आहे. मात्र पाटील यांनी ड्राय फ्रूटस घातलेला नावीन्यपूर्ण मध सादर करून आपल्यातील नवनिर्मितीचे कौशल्य पुढे आणले आहे. या गीफ्ट पॅकची रचना मधमाशाच्या षटकोनी पोळ्याप्रमाणे आहे. यात साधारण पाच किंला सात विविध फुलांवर आधारीत मधाच्या बाटल्या आहेत. प्रति १५० ग्रॅमच्या. यातील दोन बाटल्यांत काजू, बदाम व मनुके (मध ७५ ग्रॅम अधिक ड्रायफ्रुटस ७५ ग्रॅम्स) असे मिश्रण. अशा सुमारे दहा हजार बॉक्‍सेसना मागणी आली आहे.

    अन्य ठळक बाबी

  • लातूरमध्ये मॉलमधून विक्री
  • छोट्या व्यावसायिकांना २० किलो बकेटमधून बल्क पुरवठा
  • व्यवसायासाठी चॅनेल- पुणे येथे ‘आयटी इंजिनिअर’ म्हणून काम केल्यानंतर प्रकाश जाडे यांनी लातूर येथे आपली ‘मार्केटिंग कंपनी’ सुरू केली आहे. त्यांच्यासोबत पाटील यांनी करार केला आहे.
  • त्याद्वारे विविध कंपन्यांमधील ग्राहक मिळवण्याचे काम सुरू आहे.
  •  उत्पादन ते विक्री व्यवस्थापन (ॲन्ड टू ॲन्ड प्रकल्प) या सर्व आघाड्या स्वतःच सांभाळतात.
  • भाचे अविनाश धर्मापुरीकर यांच्याकडेही काही जबाबदाऱ्या.
  • उद्योगाची प्रेरणा मागील वर्षी पाटील यांच्याकडे सूर्यफुलावर आधारीत जवळपास २० टन मध उपलब्ध होता. त्या वेळी खादी ग्रामोद्योग तो खरेदी करण्यास तयार नव्हते. पाटील मोठ्या अडचणीत सापडले. मार्ग शोधण्यासाठी त्यांनी फलोत्पादन विकास अभियानाचे संचालक डॉ. एस. एल. जाधव यांची भेट घेतली. जे पिकवता ते स्वतःच विका असे मार्मिकपणे सांगून जाधव यांनी उद्योगाची प्रेरणाच दिली. पाटील यांनी अल्पावधीतच जिद्दीने प्रकल्प उभारला. श्री. जाधव यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन केले. प्रकल्प शेड चाकूर येथील औद्योगिक वसाहतीत ८० बाय ४० फुटाचे शेड. त्यासमोरील सुमारे तीनहजार चौ. फुटांची जागा भाडेतत्त्वावर. मधावर प्रक्रिया करण्याचे युनिट लुधियाना (पंजाब) येथून आणले. यासाठी साडेसहा लाख रुपये खर्च. बॉयलर, फिल्टर, तीन सेटलिंग टॅंक, फिलिंग मशीन, बॉटलिंग अँड सिलिंग मशीन व अनुषंगिक यंत्रणा. बॅंकेकडून दहा लाख रुपयांचे कर्ज. काचगृह - मधप्रक्रियेत धुळीचे प्रदूषण होऊ नये यासाठी शेडच्या कोपऱ्यात २० बाय २० फूट आकारमानाचे काचगृह. सर्व खिडक्‍यांना बाहेरील बाजूने काचा. यात मधावर प्रक्रिया करणारी यंत्रणा. काचगृहात दोन बाजूने भिंती. काचगृहाची वरची बाजू प्लायवूडने बंद. यासाठी तीन लाख रुपये खर्च. प्रशिक्षणाद्वारे विस्तार

  • मधपाळाचे काम कौशल्यपूर्ण, शास्त्रीय व कष्टाचे असते. झोकून दिले तर चांगला व्यावसायिक बनणे शक्य होते. हीच गरज लक्षात घेऊन पाटील यांनी सशुल्क प्रशिक्षण सुविधा उपलब्ध केली.
  • यात ५० मधपेट्या व अडीच लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असते. संपूर्ण ‘प्रॅक्टीकल’ ज्ञान प्रशिक्षणार्थींना मिळते.
  • आजपर्यंत महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आदींसह सुमारे २० जण झाले प्रशिक्षित
  • पाटील यांच्याकडे सध्या सातशे पेट्या. राज्याबरोबरच पंजाब, हरियाना, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात राज्यातही जाऊन परागीभवन, मध संकलन. परागीभवनासाठी प्रतिपेटी पंधराशे रुपये शुल्क घेतात. कृषी विभागाकडून ‘बी ब्रीडर’ म्हणून मान्यता.
  •   दिनकर पाटील - ९६३७१३५२८४ (लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com