agricultural success story in marathi, agrowon, firoz maniyar, kaolpa, latur | Agrowon

शास्त्रीय, नेटक्या पध्दतीने व्यावसायिक शेळीपालन
डॉ. टी. एस. मोटे
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

व्यवसायाची सुरवात
शेळीपालनाला सुरवात करण्यापूर्वी फिरोज मणीयार यांनी राज्यातील काही ठिकाणांना भेटी दिल्या. व्यवसायाचे अर्थकारण समजावून घेतले. हा व्यवसाय यशस्वी व अयशस्वी होण्याची कारणेही जाणून घेतली. शेळीपालन आपण करू शकतो हे लक्षात आल्यानंतर डिसेंबर २०११ मध्ये काही उस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन सुरू केले.

लातूर शहरापासून नजीक असलेल्या कोळपा येथे फिरोज मणियार हा युवक शास्त्रोक्त व बंदिस्त शेळीपालन करीत आहे. सुमारे पाच ते सहा वर्षांच्या या अनुभवसिद्ध व्यवसायातून वर्षाला सुमारे एक हजार शेळ्यांची विक्री करणे या युवकाला शक्य झाले आहे. ज्या शेळ्यांच्या जातींना मागणी अाहे अशांच्याच संगोपनावर भर देत बाजारपेठ हस्तगत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

 लातूर शहरापासून काही किलोमीटरवर असलेल्या कोळपा येथे मणियार कुटुंबाची सुमारे २१ एकर शेती आहे. या शेतात पूर्वी हंगामी पिके घेतली जायची. मात्र पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी जोड व्यवसाय करावा असे या कुटुंबाला वाटत होते. कुक्कुटपालन, शेळी, दुग्ध आदी व्यवसायांवर चर्चा होऊन अखेर शेळीपालन करायचे नक्की झाले. कुटुंबाचा बांगड्या विक्री व कपड्यांच्या होलसेल विक्रीचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कुटुंबातील फिरोज व्यवसाय सांभाळून शेतीही पाहतात.

व्यवसायाची सुरवात
शेळीपालनाला सुरवात करण्यापूर्वी फिरोज यांनी राज्यातील काही ठिकाणांना भेटी दिल्या. व्यवसायाचे अर्थकारण समजावून घेतले. हा व्यवसाय यशस्वी व अयशस्वी होण्याची कारणेही जाणून घेतली. शेळीपालन आपण करू शकतो हे लक्षात आल्यानंतर डिसेंबर २०११ मध्ये काही उस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन सुरू केले. नवखा अनुभव व काही तांत्रिक कारणांमुळे यातील काही शेळ्या दगावल्या. पण फिरोज खचले नाहीत. व्यवसाय बंद न करता झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा सल्ला वडिलांनी दिला.

सिरोही, आफ्रिकन बोअरने दिली उभारी
अभ्यासांती अजून दणकट व सक्षम तसेच बाजारपेठेत मागणी असलेल्या शेळ्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानातून सुमारे २०० सिरोही शेळ्या आणल्या. त्याचबरोबर आफ्रिकन बोअर जातीच्या पाच मादी व एक नर फलटण येथील एका प्रसिद्ध संस्थेतून खरेदी केल्या. खरेदी करताना शेळ्यांचे वय सुमारे अडीच महिन्यांचे होते.

शेळीपालन व्यवस्थापन

 • सध्याची संख्या- सिरोही- ५०० पर्यंत तर बोअर- १५० - एकूण सुमारे ६५०
 • (संख्येत बदल होत राहतो.)
 • सुरवातीपासूनच बंदिस्त पद्धतीने संगोपनावर भर
 • दोन एकरांत फार्मची उभारणी. सुमारे साडेपाचशे फूट लांब तर १८० फूट रुंदीचे शेड
 • त्यात जमिनीपासून सहा फूट उंचीवर कंपार्टमेंटस (प्रत्येक सुमारे २८ बाय ११ फुटीचे)
 • व्यवसायात वृद्धी होत गेली त्यानुसार कंपार्टमेंटसची संख्या वाढवण्यात आली.
 • यात ‘बेसमेंट’ला लाकडी फळ्या. दोन फळ्यांमध्ये थोडे अंतर ठेवले आहे. त्यातून शेळीचे मलमूत्र खाली पडते.
 • एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी सलग पॅसेज ठेवला आहे.
 • प्रत्येक कंपार्टमेंटला गेट.
 • वयानुसार शेळ्यांचे वर्गीकरण व त्यानुसार कंपार्टमेंटस. (उदा. माजावर झालेल्या, गाभण शेळ्या तसेच नरांसाठी स्वतंत्र)
 • सुरवातीच्या अडीच महिन्यांपर्यंत करडांना दूध पाजले जाते. शेळीचे दूध काढले जात नाही. पिलांसाठीच त्याचा उपयोग होत असल्याने त्यांची वाढ झपाट्याने होते.
 • फार्म शेडच्या पुढे मोकळी जागा. त्यापुढे कुटारखाना बांधला आहे.

खुराकाचे काटेकोर नियोजन

 • खुराकाचा प्रकार व वेळ यांचे काटेकोर नियोजन. त्यामुळेच शेळ्यांचे वजन झपाट्याने वाढते आणि शरीरावर विशिष्ट तेजही दिसते.
 • कोणता खुराक किती प्रमाणात द्यायचा याचा ताळेबंद तयार केला आहे.
 • सुमारे दहा एकरांत मका, कडवळ, मेथी घास यांची लागवड
 • वजन वाढत नसलेल्या शेळ्यांना टॉनिक अधिक कॅल्शिअम दिले जाते.
 • वेळच्या वेळी पीपीआर, एफएमडी आदी रोगांसाठी लसीकरण

विक्री व्यवस्थापन

 • विक्री उद्देश- पैदासीसाठी, बकरी ईदसाठी
 • चांगल्या संगोपनातून
 • एक वर्षे वयाचा
 • सिरोही नर- वजन ५० किलोपर्यंत, आफ्रिकन बोअर नर- वजन ७० किलोपर्यंत

विक्री वजनावर (प्रति किलो)

 • मादी- ३२५ रुपये
 • नर- ४०० रुपये
 • -वर्षभरात होणारी विक्री- सुमारे १००० ते १२०० पर्यंत (नर व मादी मिळून)
 • -यंदाच्या बकरी ईद सणावेळी १७० नरांची विक्री झाली. विक्री केलेल्या शेळ्या ४५ ते ७० किलो वजनाच्या होत्या.

लेंडी खतातून उत्पन्न
शेळी विक्रीव्यतिरिक्त लेंडीखताच्या विक्रीतूनही अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे. सुरवातीच्या काळात लेंडीखताचा वापर ते आपल्या शेतीसाठीच करायचे. परंतु त्यात वाढ झाल्याने उत्पन्नाचा नवा मार्ग मिळाला. गेल्या वर्षी तीन हजार तर या वर्षी साडेचार हजार बॅग्ज एवढ्या लेंडीखताची विक्री साध्य झाली. प्रति २० किलो खताची बॅगेचा ४०० रुपये दर आहे. शेळी संगोपनगृहात लेंड्या जमा करून त्या वर्षभर खड्ड्यात कुजवल्या जातात. त्यानंतर ग्राईडिंग मशिनमधून पावडर तयार करून ती बॅगेत भरली जाते.

पाण्याचा पुनर्वापर
‘गोट फार्म’मध्ये प्रवेश केला की एरवी शेळ्यांचा व त्यांच्या मलमूत्राचा विशिष्ट पसरलेला गंध येतो. तो कमी करण्यासाठी व शेळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिरोज फार्मच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देतात. शेळ्यांसाठीचा प्लॅटफॉर्म पाण्याने नियमित स्वच्छ केला जातो. हे पाणी हौदात जमा होईल अशी व्यवस्था केली आहे.

कुटारखाना

 • सुक्‍या, अोल्या चाऱ्याच्या साठवणुकीसाठी पत्र्याचे वेगवेगळे शेड
 • सुक्या चाऱ्याची वर्षभर साठवण करावी लागते. त्यासाठी जास्त जागा लागते. सोयाबीन, तूर, हरभरा, भुसकट विकत घेऊन तसेच खरीप व रब्बीतील ज्वारीचा कडबाही साठवण्यात येतो.
 • चाऱ्याची बचत व्हावी म्हणून यंत्राद्वारे कुटी तयार केली जाते.

शेळीची वैशिष्ट्ये
सिरोही
प्रामुख्याने राजस्थानात आढळते. दूध व मांसासाठी सांभाळली जाते. दणकट, काटक असून रंगाने बदामी किंवा करड्या ठिपक्याची. एक वर्षे वयाच्या मादीचे वजन ३० ते ४० किलो तर नराचे वजन ४० ते ५० किलोपर्यंत. शेळीची उंची सरासरी ६० ते ७० सेंमी.

बोअर शेळी
मूळ दक्षिण आफ्रिकेतील. जगभर प्रसार. शरीराने धिप्पाड व काटक, वजनदार, दिसायला आकर्षक, चांगली दूध उत्पादनक्षमता. यामुळे अधिक लोकप्रिय. कोणत्याही प्रतिकूल हवामानात टिकण्याची क्षमता. त्यामुळे तिचा झपाट्याने प्रसार होतो. रंग पांढरा, डोक्‍यावर, मानेवर तांबडा, चॉकलेटी रंग, आखुड केस. एक वर्ष वयाच्या मादीचे वजन ४० ते ५० किलो तर नराचे वजन ७० किलोपर्यंत असते.

संपर्क- फिरोज मणियार- ९१७५८६०७८६
(लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...