लिंबासह सीताफळ झाले हुकमी पीक

वाचनाची अावड व कात्रणांचा संग्रह शेती ही अधिक डोळसपणे करणाऱ्याची अाहे हे धोत्रे यांनी जाणले. त्यामुळेच ते गेली अनेक वर्षे शेतीशी निगडित साहित्य ते नियमित वाचतात. ॲग्रोवनची काही वर्षांपूर्वीपासूनच कात्रणे त्यांनी संग्रहित केली अाहेत. महिना व विषय निहाय डायरी लिहिली असून त्याची कात्रणे सांभाळली अाहेत. कोणतीही समस्या उभी राहिली किंवा माहिती हवी असेल तर कात्रण संदर्भासाठी वापरले जाते.
दर्जेदार सीताफळे पिकवली जातात.
दर्जेदार सीताफळे पिकवली जातात.

सध्याच्या तीव्र पाणीटंचाई होत चाललेल्या काळात अकोला जिल्ह्यातील विवरा येथे शेती करणाऱ्या धोत्रे बंधूंनी काळाची पाऊले अोळखत सीताफळाची निवड केली. लिंबू हेदेखील त्यांचे जुने हुकमी पीक आहे. आज याच दोन पिकांनी त्यांची आर्थिक स्थिती भक्कम केली आहे. कायम प्रयोगशील वृत्ती ठेऊन पाणी, मार्केटिंग, पीकनिवड आदी विविध क्षेत्रांत प्रभावी व्यवस्थापनाची चुणूक त्यांनी कायम दाखवली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर हा लिंबू उत्पादनात अग्रेसर समजला जातो. तालुक्यातील विवरा हे गाव त्यासाठी प्रसिद्ध अाहे. परंतु, दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या निर्माण होत असून लिंबू उत्पादकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत अाहे. अनेकांना इच्छा नसतानाही लिंबाच्या बागा तोडाव्या लागत अाहेत. याच गावातील जनार्दन धोत्रे यांनी काळाची पाऊले अोळखत पीकबदल करायचे ठरवले. कमी पाण्यात येऊ शकेल व चांगला पैसाही देऊ शकेल अशा समजुतीने २००६ मध्ये त्यांनी सीताफळाचा गावपरिसरातील पहिला प्रयोग केला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत गावातील काही शेतकरी सीताफळाकडे वळले अाहेत. सीताफळ झाले मुख्य पीक कमी पाण्यात व कमी उत्पादन खर्चात उभी राहलेली दोन एकरांतील सीताफळाची बाग धोत्रे कुटुंबाचा मुख्य अार्थिक स्त्रोत झाली अाहे. तसे लिंबू हे त्यांचे जुने म्हणजे सुमारे ३० ते ३५ वर्षांपासूनचे पीक आहे. त्यावेळपासून ते साधारण चार एकरांत घेतले जायचे. आता मागील वर्षीच पाणी कमी झाल्याने जुनी बाग काढून टाकली आहे. तीन एकरांत लिंबाची नवी बाग उभारली आहे. पारंपरिक पिके घेणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांसाठी धोत्रे यांची शेती मार्गदर्शक तसेच अनुकरणीय ठरत अाहे. उत्पादन खर्च केला कमी धोत्रे कुटूंब अकोला येथे राहते. त्यांना हरीश व श्रीकांत ही दोन मुले अाहेत. हीच दोघे भावंडे कुटुंबाची साडेअाठ एकर शेती सांभाळतात. अकोला शहरापासून सुमारे ४२ किलोमीटर अंतरावर ही शेती आहे. दररोज एवढे किलोमीटर अंतर ये-जा करून दोघे भाऊ सारी शेती सांभाळतात. काळानुरूप या भावांनी पीकपद्धतीत बदल केला. पूर्वीपासून विवरा भागात पारंपरिक सोयाबीन, कापूस या पिकांसोबत लिंबू हेच प्रमुख पीक अाहे. धोत्रे कुटुंबही दरवर्षी खरीपात सोयाबीन-तूर दोन एकर, उडीद तीन एकर, कापूस एक एकर अशी पिके घेतात. आता मात्र पारंपरिक पद्धतीत त्यांनी मोठा बदल साधला आहे. सीताफळाचे व्यवस्थापन सन २००६ लावलेल्या बाळानगर जातीच्या सीताफळाची बाग जवळपास सेंद्रिय पद्धतीनेच जोपासली जात आहे. त्यातून कमी खर्चात चांगले उत्पादन व उत्पन्न मिळत अाहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या या फळांना ग्राहकांचीही चांगलीच पसंती मिळत अाहे. शेतापासून लगत असलेल्या नदीवरून जलवाहिनीद्वारे पाणी अाणले जाते. विवरा परिसरात दरवर्षी विहिरींचे पाणी कमी होत चालले अाहे. त्यामुळे या भागातील असंख्य शेतकरी अडचणीत सापडले अाहेत. धोत्रे भावांनीही कमी पाण्यात फळशेती जगविण्याचा खटाटोप सुरु केला अाहे. लिंबूची बाग वाचवण्यासाठी त्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी टँकरने पाणी विकत आणले. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे त्यांना महत्त्व कळाले अाहे. काही वर्षांपूर्वी गावात पहिले ठिबक आपण बसवून अन्य शेतकऱ्यांना त्याची प्रेरणा दिल्याचे धोत्रे यांनी सांगितले. सेंद्रिय पद्धतीचा अवलंब धोत्रे बंधूंनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर थांबवला अाहे. ते अधिकाधिक प्रमाणात सेंद्रिय व जैविक बाबींचा वापर करतात. जीवामृत, बायोडानॅमिक पद्धतीने तयार केलेले खत वापर करतात. पारंपरिक सोयाबीन, तूर, उडीद या पिकांतही सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. देशी गोमूत्र अधिकाधिक वापरले जाते. अकोला येथील राहत्या घरी त्याचे संकलन केले जाते. शेजाऱ्याकडील गायीचे गोमूत्र संकलित करून त्या बदल्यात त्यांना अापल्या शेतातील भाजीपाला पुरवितात. घरात गोमूत्र भरून ठेवलेल्या बॉटल्स, कॅन पाहण्यास मिळतात. विक्री व्यवस्थापन - सीताफळाचे उत्पादन घेतल्यानंतर ती बाग व्यापाऱ्याला विकली तर फारसे उत्पन्न हाती राहात नाही. मागील हंगामात व्यापाऱ्यांनी सीताफळाची बाग धोत्रे यांना अवघ्या ३० हजार रुपयांना मागितली होती. परंतु, धोत्रे बंधूंनी अकोला येथे थेट ग्राहक विक्री करून घसघशीत उत्पन्न खिशात टाकले आहे. यंदाच्या वर्षी पाण्याच्या समस्येमुळे बाग २५ टक्केच अाल्याने ती व्यापाऱ्याला दिली. परंतु पुढील हंगामात स्वतःच विक्री करण्याचे त्यांचे नियोजन आहे. मागील चार वर्षांत म्हणजे २०१४ मध्ये एकूण क्षेत्रात ९५ हजार रुपये, २०१५ मध्ये ९३ हजार तर २०१६ मध्ये एक लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवले यंदा ७० हजार रुपयांवरच समाधान मानावे लागले आहे. उत्पादन प्रतिझाड सुमारे ६० किलो होते. झाडांची एकूण संख्या सुमारे ४५० पर्यंत आहे. थेट विक्रीचा हंगाम साधारण दीड ते दोन महिने चालतो. त्या काळात किलोला ६० रुपयांपासून ते १०० रुपये दराने फळांची विक्री होते. लिंबाचे पीक म्हणजे एटीएम लिंबाचे पीक आपल्यासाठी एटीएमसारखे असल्याचे धोत्रे सांगतात. कारण त्याचा बहार वर्षभर सुरू असतो. वर्षभर लिंबांना मागणी असते. त्यामुळे कधीही विक्री केल्यास हातात उत्पन्न येत राहते असे धोत्रे यांनी सांगितले. हरीश धोत्रे - ८८०५०९५८१७  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com