आडसाली उसाचे घेतले एकरी १४८ टन उत्पादन

एकरी दोनशे टनांकडे वाटचाल एकरी शंभर टन उत्पादन अशोक खोत यांच्यासाठी विशेष बाब राहिलेली नाही. त्यांनी आता संजीव माने यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा एकरी २०० टन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवून ३० गुंठे क्षेत्र निवडले आहे. सध्या हा ऊस नऊ ते दहा कांड्यावर आहे. यात दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांचा वापर आहेच. शिवाय प्रति सव्वा फुटावर एक डोळा लावण, आंतरपीक नाही, एक लाख रुपये खर्च करून मॉड्यूलर स्प्रिंकलरची उभारणी आदींचा वापर केला आहे. शिवाय कंपोस्ट, कोंबडीखत व अन्य सेंद्रिय खतांच्या वापराचे चांगले नियोजन केले आहे.
उत्कृष्ट व्यवस्थापनातून अशोक खोत यांनी जोपासलेला ऊस
उत्कृष्ट व्यवस्थापनातून अशोक खोत यांनी जोपासलेला ऊस

उरूण-इस्लामपूर (जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी अशोक हिंदूराव खोत यांनी आडसाली उसाचे एकरी १४८ टन उत्पादन घेत जवळपास दीडशे टनांच्या आसपास उत्पादनाची दमदार मजल मारली आहे. संपूर्ण राज्याला आदर्श असेच त्यांचे ऊसशेतीतील प्रयोग आहेत. राज्यात लोकप्रिय असलेले प्रगतिशील ऊस उत्पादक कृषिभूषण संजीव माने यांच्या मार्गदर्शनाखाली एकरी २०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठवून खोत यांची शेती सुरू आहे. सांगली जिल्ह्यात उरूण-इस्लामपूर (ता. वाळवा) येथे अशोक हिंदूराव खोत यांची साडेदहा एकर शेती आहे. अशोक व बंधू भरत शेती पाहतात. तर लक्ष्मण नोकरी करतात. त्यांचे वडील पूर्वी पारंपरिक ऊस शेती करायचे. सन १९९८ पासून अशोक यांनी शेतीची जबाबदारी उचलली. त्यानंतर जाणीवपूर्वक सुधारित लागवड तंत्रज्ञान पद्धतीचा अभ्यास सुरू करून नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार केला. उसाच्या सुधारित शेतीतील टप्पे

  • सन २००१ पर्यंत उत्पादन- एकरी ५० ते ५५ टन.
  • त्यानंतर प्रगतिशील ऊस उत्पादक कृषिभूषण संजीव माने यांचे मोलाचे मार्गदर्शन घेण्यास सुरवात केली.
  • त्यासह शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ. अरुण मराठे, डॉ. बी. पी. पाटील यांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे.  
  • सुधारित तंत्र वापरातील ठळक बाबी

  • सबसॉयलरचा वापर. उभी- आडवी नांगरट दोन वेळा.
  • दरवर्षी सात डंपिंग शेणखत, दोन टन कोंबडीखत, कारखान्याची राख एक डंपिंग विस्कटली जाते.
  • घरची सहा ते सात जनावरे, त्यांचे शेण उपयोगाला येते.
  • खोडवा तुटल्यानंतर ताग, धैंच्या यासारख्या हिरवळीच्या पिकांची लागवड, त्यांची शेतात गाडणी
  • लागवडीवेळी जैविक व रासायनिक बीजप्रक्रिया. आतापर्यंत साडेचार फुटी सरीचा वापर. मात्र यंदा पाच फुटी सरी. एक डोळा पद्धतीचा वापर. दोन टिपरीतील अंतर नऊ ते दहा इंच
  • सेंद्रिय, रासायनिक खतांचा संमिश्र वापर, पालाकुट्टी, सोयाबीनचे काढणीपश्चात अवशेष यांच्यावर भर
  •  मुख्य रासायनिक खतांव्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात (उदा. मॅग्नेशिअम, गंधक आदी). ट्रायकोडर्मा बुरशीनाशक, ॲसिटोबॅक्‍टर, ह्युमिक ॲसिड, जीए, आयबीए, ६ बीए आदी संजीवके, सी वीड एक्‍स्ट्रॅक्‍ट
  • ठिबक व पाटपाणी अशा दोन्ही पद्धतींचा वापर
  • एकरी सुमारे ४२ ते ४३ हजार ऊस गाळपाला जाणारे. प्रत्येकाचे वजन सुमारे तीन ते साडेतीन किलोपर्यंत मिळाले आहे.
  • कुटुंब राबतेय शेतीत अशोक यांचे तीन भावांचे एकत्रित कुटुंब आहे. घरातील सर्व सदस्य शेतीकामांत व्यस्त असतात. रविवार जोडून मोठ्या कामांचे नियोजन होते. घरातील मुलांनाही शेतीची आवड निर्माण झाली आहे. एकरी उत्पादनाची आकडेवारी (एकरी)

  • आडसाली हंगाम, ऊसवाण- को ८६०३२
  • पूर्वीचे उत्पादन- ५० ते ५५ टन
  • अलीकडील उत्पादन
  • २०१३-१४- १०३ टन
  • २०१४-१५- १४८ टन (१८ ते १९ महिन्यांत तुटलेला)
  • यासाठी आलेला उत्पादन खर्च- एक लाख २० हजार रुपये.
  • २०१५-१६ ३० गुंठ्यात १०४ टन- पाटपाण्यावर घेतलेला ऊस
  • २०१६-१७- पूर्वहंगामी- (दोन सप्टेंबरची लागवड) १०४ टन
  • दरवर्षी खोडवा उत्पादन- ६० ते ६५ टन (बारा महिने कालावधी)
  • दरवर्षीचा उत्पादन खर्च- एकरी- किमान ८० हजार रुपये.
  • उसाला मागील वर्षी मिळालेला दर २४०० ते २५०० रु. प्रतिटन
  •  पुरस्कार

  • राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा ऊसभूषण
  • मराठमोळा युवक मंडळाच्या वतीनेही ऊसभूषण
  • अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीला भेटी दिल्या आहेत.
  • ऊस संजीवनी व्हॉट्‌सॲप ग्रुपमध्ये समावेश संजीव माने प्रणीत ऊस संजीवनी व्हॉट्‌सअॅप ग्रुप राज्यात प्रसिद्ध आहेत. त्याचे खोतदेखील सदस्य आहेत. त्यातूनच लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे सर्व नियोजन काटेकोर करण्याची दिशा खोत यांना मिळते. प्रतिक्रिया अशोक खोत यांनी एक एकरमध्ये उसाचे १४८ टन उत्पादन घेतले ही खरोखरीच प्रसंशनीय बाब आहे. आमच्या कारखान्याकडे हा ऊस गळीतास आला. खोत यांचे उत्पादनवाढीसाठी सुरू असलेले विविध प्रयोग समस्त शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. -एस. एम. पाटील, ऊस विकास अधिकारी, राजारामबापू कारखाना. संपर्क- अशोक खोत-९८२२७४४५५५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com