जांबूतच्या शेतकऱ्यांना मिळाला संरक्षित शेतीचा हुकमी पर्याय

पूर्वी मी खासगी कंपनीत मर्यादीत वेतनावर जॉब करीत असे. आता पूर्णवेळ शेतकरी व मालक झालो आहे. या शेतीत वर्षाला सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत उत्पादनखर्च येतो. मात्र नफाही चांगला मिळतो. संरक्षित शेतीतून आर्थिक उत्पन्न चांगले मिळत आहे. केवळ १८ ते २० महिन्यांत मी कर्जाचा बोजा या शेतीमुळे कमी केला आहे. मजुरांची समस्या मात्र फार मोठी आहे. घरचे सारे राबतो म्हणून हे शक्य होते. मुक्त विद्यापीठातून हॉर्टीकल्चर विषयातील पदवीही आता घेतो आहे. युवराज गाजरे, जांबूत
युवराज गाजरे यांना पॉलिहाऊस शेतीचा पर्याय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर वाटतो आहे.
युवराज गाजरे यांना पॉलिहाऊस शेतीचा पर्याय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर वाटतो आहे.

पुणे जिल्ह्यातील जांबूत गाव आता संरक्षित शेतीसाठी प्रकाशात येऊ लागले आहे. बदलते हवामान लक्षात घेऊन येथील शेतकरी शेडनेट, पॉलिहाउसमधील शेतीकडे वळताना दिसत आहे. पारंपरिक पिकांपेक्षा रंगीत, हिरवी ढोबळी मिरची, बिगर हंगामी काकडी, झेंडू अशी पिके त्यांना खुणावत आहेत. ही शेती आर्थिक उन्नतीसाठी चांगली अाहे असाही त्यांना अनुभव येत आहे. पुणे जिल्ह्यातील जांबूत हे शिरूर तालुक्यात वसलेले गाव आहे. कुकडी नदीच्या तीरावर वसलेल्या या गावापासून मुख्य बाजारपेठा दूर अंतरावर आहेत. दळणवळणाच्या साधनांचा विचार करता रस्ते वाहतुकीचा एकमेव पर्याय येथील शेतकऱ्यांसमोर असतो. येथील शेतकरी पूर्वी पारंपरिक पद्धतीने तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिके घ्यायचे. काही शेतकरी डाळिंबाकडेही वळले. संरक्षित शेतीची दिशा पूर्वी गावातील माल जांबूत किंवा परिसरातील गावांतील आठवडे बाजारात विकला जायचा. सक्षम पीक व विक्रीव्यवस्थेचा अभाव होता. जांबूतचे सुपुत्र असलेले उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी पुढाकार घेत गावाची संसद आदर्श ग्राम योजनेत निवड झाली. त्यानंतर शेतकरी, कृषी अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्या भेटी घडून आल्या. संरक्षित शेती अर्थात पॉलिहाउस व शेडनेट या दोन प्रकारांतील शेतीला चालना देण्याचे ठरले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण -शेतकऱ्यांनी मुर्टी येथील शेडनेट; तसेच विविध ठिकाणच्या हरितगृहांना भेटी दिल्या. तळेगाव दाभाडे येथेही पंधरा शेतकऱ्यांना हायटेक शेतीचे प्रशिक्षण मिळाले. यासाठी कृषी विभागाने ‘एनएचएम’मधून (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान) अनुदान उपलब्ध केले. संरक्षित शेतीचा पर्याय कशासाठी? सध्या हवामान बदल सतत जाणवतो आहे. गावातील कुकडी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी असले तरी मोक्याच्या वेळी पाण्याचा तुटवडा भासे. त्यातच भाजीपााल दरांतील चढउतार अशा समस्या होत्या. त्याला संरक्षित शेतीतून कुठेतरी उत्तर मिळेल असे वाटले. जांबूत गावातील संरक्षित शेती

  • गावातील पॉलिहाउस - ९ - एकूण क्षेत्र- अडीच एकर
  • त्यासाठी दिलेले एकूण अनुदान- ७४. ९३ लाख रुपये
  • शेडनेटसची संख्या - १२-
  • एकूण क्षेत्र- २.७० एकर- त्यासाठी दिलेले एकूण अनुदान- ५९ लाख रुपये
  • ठळक बाबी

  • शेतकऱ्यांनी शेडनेट व पॉलिहाउसचे प्रस्ताव तयार करून कृषी विभागाला दिले.
  • पॉलिहाउससाठी लागणारी माती लोणावळ्याहून आणली.
  • संरक्षित शेतीत कोणता माल उत्पादित करावा, त्यांची गुणवत्ता, मिळणारा बाजारभाव आदींची माहिती शेतकऱ्यांनी घेतली. बाजारपेठा, माॅल्स या ठिकाणी भेटी दिल्या.
  • पाणी, भांडवल, मजूर आदी गोष्टींबाबत शेतकऱ्यांनी चर्चा केल्या.
  • सध्या घेत असलेली मुख्य पिके- हिरवी तसेच रंगीत ढोबळी मिरची, काकडी व शेटनेटमध्ये झेंडू
  • विक्रीनियोजन काही शेतकरी स्वतंत्र, तर काही गटाने विक्रीचे नियोजन करतात. मंचर येथे उभारलेल्या मॉलच्या खरेदी केंद्राना माल विकला जातो. त्यामुळे काही प्रमाणात विक्रीची समस्या सुटली आहे. काही शेतकरी पुणे, वाशी मार्केटला माल पुरवतात. आश्वासक उत्पन्न पूर्वी बहुतांशी शेतकरी कांदा हे मुख्य पीक घेत. त्यातून एकरी दहा टनांपर्यंत उत्पादन मिळत असे. उत्पादन खर्च वजा जाता एकरी जास्तीत जास्त चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळायचे. आता संरक्षित शेतीतून नफ्याचे प्रमाण या तुलनेत निश्चित वाढले आहे. प्रतिक्रिया आताच्या बदलत्या परिस्थितीमुळे शेती तोट्यात चालली आहे. शेतकऱ्यांकडील कमी होणारे धारण क्षेत्र यावर संरक्षित शेती हा कमी क्षेत्रात शाश्वत उत्पन्नाचा मार्ग आहे. - रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी जांबूत गावातील शेतकऱ्यांना आता ढोबळी मिरची, फुलपिके घेणे आधुनिक शेती पद्धतीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतीमालाची प्रत सुधारली असून चांगले दर मिळू लागले आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून संरक्षित शेतीला अनुदानही देण्यात आले आहे. - एस. एम. पिंगट, तालुका कृषी अधिकारी, शिरूर संपर्क- ९६०४६२३६४९ माझ्याकडे दहा गुंठे पॉलिहाउस; तर शेडनेट वीस गुंठे आहे. ढोबळी मिरची, झेंडूसारखी पिके घेत आहे. त्यातून दरवर्षी चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते आहे. - सुभाष जगताप, शेतकरी संपर्क- ९५४५४४९३७७ नोकरीतील वेतनपेक्षा शेतीत अधिक उत्पन्न

  • पूर्वी दहा गुंठे पॉलिहाउस होते. आता ते वीस गुंठे केले आहे. सुमारे पाच वर्षांपासून संरक्षित शेती करतो
  • आहे. रंगीत ढोबळी मिरची व काकडी अशी पिके घेतो. दहा गुंठ्यासाठी पॉलिहाउस उभारणी व तत्सम आवश्यक असा सुमारे १३ लाख रुपये खर्च येतो. चार लाख ६० हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
  • रंगीत ढोबळी मिरचीचे दहा गुंठ्यांत ११ टनांपर्यंत, तर काकडीचे १० ते १२ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे.
  • मिरचीला किलोला ३५, ५० ते ६५ रूपये असे दर मिळतात. एकवेळ तो १५० ते १७० रूपये इतका कमाल दरही घेतला आहे. रब्बीत काकडी घेतल्याने दर चांगले म्हणजे किलोला ३० ते ३५ रूपये दर मिळतो.
  • - युवराज गाजरे, जांबूत संपर्क- ९८२२८३१७१२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com