शेतमालाचा ब्रॅंड तयार करून थेट विक्री

चिकूत अोळख तयार केली गेल्या अनेक वर्षांपासून कदम बंधूंच्या दर्जेदार, रसाळ चिकूंनी ग्राहकांच्या मनात वेगळे स्थान तयार केले आहे. थेट विक्रीवर अधिक भर असतो. गंगाखेड बाजारपेठेत व्यापारीदेखील कदम यांच्याकडील चिकूंना पहिली पसंती देत असतात. थेट विक्रीतून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न हाती येते.
कदम बंधूंनी चिकू शेतीत अोळख तयार केली आहे.
कदम बंधूंनी चिकू शेतीत अोळख तयार केली आहे.

थेट विक्रीच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्राेत वाढवले तर शेती सुसह्य होऊन त्यातील फायदा वाढू शकतो. परभणी जिल्ह्यातील जवळा-रुमना (ता. गंगाखेड) येथील कदम बंधूंनी शेती व विपणन या दोन्ही आघाड्यांवर प्रयत्न करून हे सिद्ध केले आहे. ऊस रसवंती, हुरडा यांच्याबरोबरच अस्सल रसाळ चवीचा सेंद्रिय चिकू पिकवून या सर्वांचा ‘ब्रॅंड’ तयार करण्यात त्यांना यश आले आहे. परभणी जिल्ह्यात जवळा-रुमना (ता. गंगाखेड) येथे कदम बंधूंची एकत्रित कुटुंबाची शेती आहे.यात रमेशराव रामभाऊ कदम हे मोठे बंधू. त्यांना विनायकराव, भगवानराव या बंधूंची साथ मिळते. अठरा सदस्यांचे हे कुटुंब एकत्रित नांदते. रमेशराव ऊस रसवंती व शेती तर भगवानराव यांच्याकडे शेतीची संपूर्ण जबाबदारी असते. विनायकराव हे गंगाखेड तालुक्यातील संस्थेत प्राध्यापक आहेत. आपली नोकरी सांभाळून ते वेळ मिळेल त्यानुसार शेतीत राबतात. शेतीचे नियोजन कदम कुटुंबाची जवळा आणि रुमना शिवारात मिळून एकूण २८ एकर जमीन आहे. त्यापैकी १३ एकर वडिलोपार्जित आहे. शेताजवळून इंद्रायणी नदी वाहते. तर तीन किलोमीटवर गोदावरी नदी आहे. त्यांची जमीन काळी कसदार आहे. खरिपात सुमारे १० एकर कपाशी, चार एकर मूग, अडीच एकर तूर, अशी पारंपरिक पिके आहेत. दरवर्षी कलिंगड व खरबूज लागवड असते. यंदा २० गुंठे गलांडा आणि रसंवतीसाठी २० गुंठे ऊस लागवड आहे. रब्बीत हरभरा, गहू पिके असतात. घरची आठ जनावरे आहेत. शेणखताव्यतिरिक्त लेंडीखतही दिले जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. चिकू झाले प्रमुख पीक भगवानरावांना कृषी विभागाच्या अभ्यास सहलीत सहभागी होण्याची संधी मिळाली. कोकणातील डहाणू येथे चिकू लागवड अभ्यासत असताना शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. परभणी जिल्ह्यातील शेतकरी चिकू लागवडीसाठी फारसे वळत नाहीत. परंतु भगवानरावांनी आव्हान म्हणून आपल्या भागात तसे नवीन म्हणून या पिकाची लागवड करण्याचे निश्चित केले. सन २००० च्या सुमारास डहाणू-बोर्डी भागातून कालीपत्ती वाणाची रोपे विकत आणली. आजची बाग

  • सुमारे अडीच एकर क्षेत्र.
  • सुमारे १०० झाडे.
  • सुमारे १६ वर्षांहून अधिक या पिकाचा अनुभव.
  • सेंद्रिय पद्धतीने जोपासना.
  • प्रति झाड ८० ते १०० किलो उत्पादन.
  • सन २०१४-१५ मध्ये अवर्षणामुळे उत्पादन घटले. मात्र हिमतीने बाग निगा सुरूच ठेवली.
  • सुरवातीला सिंचन सुविधा नव्हती. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील दोन वर्षे नदीवरून सायकलच्या माध्यमातून पाणी आणून बाग जोपासली. सन २००६ मध्ये बोअर घेतले.
  • विविध पिकांच्या अवशेषांचे मल्चिंग केले जाते.
  • गांडूळखत, शेणखत, स्लरी, जीवामृत यांचा वापर. कीडनाशक म्हणून दशपर्णी अर्काची फवारणी.
  • रासायनिक खत दिलेल्या शेतातील पाणी चिकू बागेत जाऊ नये म्हणून बागेभोवती चारही बाजूंनी चर खोदण्यात आले आहेत.
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मित द्रवरुप जीवाणू संवर्धकांचा वापर.
  • फेब्रुवारी ते मे असा विक्रीचा हंगाम. फळे पाडाला आली की पाणी तोडले जाते. फळांची तोडणी कुटुंबातील सर्व सदस्य करतात.
  • शेताजवळ स्टॉल उभारून विक्री गंगाखेड-परभणी रस्त्याला लागून कदम कुटुंबीयांचे पाच एकर क्षेत्र आहे. त्या ठिकाणी रसवंती सुरू करण्यात आली आहे. त्याच जागी चिकूदेखील विक्रीसाठी ठेवले जातात. त्यासाठी बागेतून तोडणी केलेली फळे डालीमध्ये ठेवून त्यावर पोते आणि गवत झाकून ती पिकविली जातात. फळांची ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. याच ठिकाणी कलिंगडाची प्रति किलो १५ ते २० रुपये तर खरबुजाची २५ ते ३० रुपये दराने थेट विक्री होते. साहजिकच नफ्याचे मार्जिन निश्चिच वाढते. शेतामध्ये वास्तव्य

  • कदम यांचे दोन भावांचे कुटुंब शेतामध्ये वास्तव्यास असते. त्यांनी पूर्णवेळ शेतीस वाहून घेतले आहे.
  • कुटुंबातील सर्व सदस्य काम करीत असल्याने मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. त्यावरील खर्चात बचत झाली आहे.
  • आर्थिक स्राेत वाढवले हंगामानुसार पिकांचे नियोजन करण्यात येते. रमजान महिन्यातील मागणी लक्षात घेऊन दरवर्षी दोन ते अडीच एकरांत कलिंगड असते. त्याचे मागील वर्षी एकरी २० टन उत्पादन मिळाले. जोडीला फूलविक्रीतूनही दररोज ४०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. तूर, कपाशीचे उत्पादन ठिबक सिंचन पद्धतीने घेतले जाते. सिंचनासाठी तीन बोअर आहेत. पाच एकर जमीन ठिबकखाली आणली आहे. रब्बीमध्ये हुरड्याच्या ज्वारीचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. हुरड्याची मागील वर्षी किलोला २०० रुपये तर यंदा १५० रुपये दराने विक्री केली. पार्सलद्वारेही ग्राहकांपर्यंत पाठवून उत्पन्न कमावले. ॲग्रोवनची प्रेरणा घेऊनच शेतीचा विकास विनायकराव म्हणाले की सुरवातीपासून आम्ही ॲग्रोवनचे वाचक आहोत. त्यातील यशकथा वाचूनच थेट विक्री, हुरडा विक्री आदी उपक्रमांना प्रेरणा मिळाली. आमच्या शेती विकासात ॲग्रोवनचा मोलाचा वाटा आहे. सकाळी देवपूजा जशी नेमाने करतो त्याचप्रमाणे ॲग्रोवनदेखील वाचतो. संपर्क- भगवानराव कदम -९८८१३७३१३१  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com