बायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दी

बायोगॅस प्रकल्प उभारलेले कडवंचीचे युवा द्राक्ष बागायतदार विनोद क्षीरसागर.
बायोगॅस प्रकल्प उभारलेले कडवंचीचे युवा द्राक्ष बागायतदार विनोद क्षीरसागर.

जालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील बायोगॅस प्रकल्पातील स्लरीचा वापर त्यांच्याच द्राक्ष शेतीत वर्षभरात ठराविक अंतराने करण्याचा प्रकल्प मागील अठरा महिने राबविण्यात आला. ही स्लरी अत्यंत परिणामकारक म्हणून सिद्ध झाली आहे. एकूण व्यवस्थापन व सेंद्रिय घटकांची जोड यातून द्राक्षाचे एकरी उत्पादन वाढलेच, शिवाय मातीचा पीएच कमी होऊन सेंद्रिय कर्ब, विविध अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित झाले. जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली. जालना जिल्ह्यातील कडवंची गावाने द्राक्षपीक, शेततळ्यांचं गाव म्हणून नावलौकीक मिळवला आहे. त्याचबरोबर जलसंधारणात भरीव काम केलेल्या या गावाने पाण्याचा ताळेबंद मांडण्याचीही कामगिरी केली आहे. अशा या प्रयोगशील गावात नेहमीच दिशादर्शक प्रयोग सुरू असतात. त्यातीलच अलीकडे राबविलेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे जैवइंधन अर्थात बायोगॅस स्लरी प्रकल्प. प्रकल्प शीर्षक- द्राक्ष पिकात बायोगॅस स्लरीच्या वापराचा जमिनीतील सेंद्रिय कर्ब व उत्पादकतेवर होणारा परिणाम प्रकल्पात सहभागी संस्था

  • राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आणि पंचायतराज, हैदराबाद, तेलंगणा
  • (अधिकारी समावेश- डॉ. डब्ल्यू. आर. रेड्डी, महासंचालक, डॉ. ज्ञानमुद्रा, प्राध्यापक)
  • शासकीय ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, जालना- प्रत्यक्ष प्रकल्प अंमलबजावणी
  • एल. ए. शिंदे- व्याख्याते व प्रकल्प संशोधक
  • यशदा, पुणे
  • मार्गदर्शन- डॉ. हरिहर कौसडीकर
  • प्रकल्प कालावधी- आॅगस्ट २०१६ ते मार्च २०१८
  • सहभागी शेतकरी- १८ (प्रत्येकी सहा शेतकऱ्यांचा एक याप्रमाणे तीन गट)
  • पार्श्वभूमी बायोगॅस प्रकल्पातील कडवंची राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रम या योजनेतून मौजे कडवंची येथे २००७-०८ नंतर शेतकऱ्यांकडे अनुदानावर बायोगॅस सयंत्रे उभारण्याची मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्‍यातील यसगाव दिघी येथील बद्री साहेबराव दिवटे यांनी त्यासाठी मदत केली. असे प्रकल्प उभारण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. कडवंची- आजचे बायोगॅस प्लॅंट- सुमारे २०० स्लरी देण्याची पूर्वीची पद्धत कडवंची गाव शिवारात सुमारे ५१० हेक्‍टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड आहे. इथले शेतकरी पूर्वी द्राक्षाला पारंपरिक पद्धतीने म्हणजे शेणापासून स्लरी तयार करून द्यायचे. ती अनेक वेळा कुजत नसल्यामुळे त्यात लाभदायक जीवाणू, अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असायचे. सुधारीत पद्धत बायोगॅस प्रकल्पातून बाहेर पडणारी स्लरी मोठ्या हौदात साठवण्यात येते. ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करून एक हजार लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक ड्रमद्वारे ती झाडांना दिली जाते. यात ट्रॅक्टरचा शाप्ट, सक्शन पंप यांचा वापर होतो. या पद्धतीत सुमारे दीड तासात एक एकरभर स्लरी देणे शक्य होते. यासाठी एक ते दोन व्यक्ती पुरेशा ठरतात. पूर्वी याच कामाला मोठा वेळ व चार मनुष्यांची गरज भासायची. प्रयोगातील ठळक बाबी

  • शेतकऱ्यांच्या बागेत चार रांगा निवडल्या. पैकी दोन रांगांत स्लरीचा वापर व दोन रांगांत वापर नाही.
  • ऑक्‍टोबर छाटणीनंतर दर तीन महिन्यांनी २५ किलो प्रति झाड याप्रमाणे स्लरीचा वापर.
  • पिकाचे उत्पादन मोजण्यासाठी स्लरी दिलेल्या आणि न दिलेल्या द्राक्षाच्या प्रत्येकी दोन
  • रांगांतील २० झाडांवरील द्राक्षाचे सरासरी वजन घेतले.
  • प्रकल्पाच्या १८ महिन्यांच्या कालावधीत चार वेळा माती नमुन्यांचे शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळा, औरंगाबाद येथून परीक्षण.
  • प्रयोगातील निष्कर्ष- घटक स्लरीचा वापर होण्यापूर्वी जमिनीचा सामू (पीएच) ८.०१ होता. स्लरी वापरानंतर तो ७. ५२ (ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत) झाला. स्लरी व वापरलेल्या बागेत तो  ८.०४ होता.  विद्युत वाहकता (ईसी) स्लरी वापरापूर्वी  ०.३२ ds/m होती. ती ०.१३ ds/m झाली. सेंद्रिय कर्ब ०.६५ टक्क्यावरून ०.८१ टक्के झाला. स्लरी न वापरलेल्या बागेत तो ०.५४ टक्के राहिला. द्राक्ष उत्पादकता (हेक्टरी) ३१. ७९ टनांवरून ३९. ९२ टन झाली.

    अन्नद्रव्यांचे प्रमाण (किलो प्रति हेक्टर) स्फुरदाचे ६०. ९८ वरून १०३. २४, पोटॅशचे ५४७.४८ वरून १७०९. ५७ वर गेले. स्लरीतील उपलब्ध एक टक्के पोटॅश आणि सूक्ष्म जिवाणूंच्या जमिनीतील प्रक्रियेमुळे पोटॅशमध्ये वाढ झाल्याचे आढळले.

    सूक्ष्म अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे (पीपीएम प्रमाण सांगायचे तर तांबे (कॉपर) १.३६ वरून ३.२७, लोह ०.५९ वरून ०.९९ जस्त १.३३ वरून २.०६ तर मॅंगेनीज ०.२५ वरून ७.०८ पीपीएम असे आढळले.

    निरीक्षणे

  • सेंद्रिय पदार्थाचे हवाविरहीत अवस्थेत विघटन झालेल्या स्लरीमध्ये सूक्ष्म मूलद्रव्यांचे प्रमाण जास्त अाढळले.
  • जमिनीचा पीएच कमी झाला. त्यामुळे पिकाला लागणारी अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली.
  • स्लरी न वापरलेल्या रांगेतील विद्युत वाहकता पूर्वीएवढीच राहिली. स्लरी वापरल्याने अनेक सेंद्रिय संयुगांची जमिनीतील क्षारांसोबत रासायनिक प्रक्रिया होऊन मुक्त क्षाराच्या प्रमाणात घट झाली. परिणामी विद्युत वाहकतेत घट झाली.
  • सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. सेंद्रिय कर्ब- नत्र (सी-एन रेशो) १२- १ असा संतुलित ठेवण्याचा प्रयत्न.
  • जमीन भुसभुसीत झाली. मुळांना खेळती हवा मिळून पांढऱ्या मुळ्यांच्या संख्येत वाढ झाली.
  • शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऊस, सूर्यफूल, डाळिंब यानंतर कडवंचीत द्राक्षबागा ठळकपणे दिसतात. बायोगॅसमुळे इंधन खर्च वाचलाच. शिवाय स्लरी वापराने जमीन भुसभुशीत व कसदार होऊ लागली. आहे. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढण्यासह उत्पादनही वाढण्यास मदत झाली. -कैलास क्षीरसागर- ९९२३७४४४०७ स्लरीच्या वापराने जमिनीचा व द्राक्षाचा दर्जा सुधारला. रासायनिक खते वापरण्याचे प्रमाणही निम्म्यावर आले. -विनोद क्षीरसागर- ७८७५४६३९७८ बायोगॅसचा दहा वर्षांपासून वापर सुरू आहे. स्लरीमुळे जमिनीची सुपीकता टिकवण्याबरोबर उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. -रमेश क्षीरसागर स्लरीच्या वापराने लाभदायक सूक्ष्मजीवांची संख्या वाढली आहे. माती जिवंत झाली आहे. शेती शाश्वत करण्याकडे कडवंचीतील शेतकऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे. -एल. ए. शिंदे- ९४२३७१२७८१ प्रकल्प संशोधक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com