agricultural success story in marathi, agrowon, karadgaon, parbhani | Agrowon

मिळवले ताजे उत्पन्न, जोखीम केली कमी
माणिक रासवे
बुधवार, 4 एप्रिल 2018

 
शेतीत स्वतः राबल्याशिवाय यश मिळत नाही. कोलकता झेंडूचे बारमाही उत्पादन घेण्याच्या विचारात आहे. गावातील शेतकऱ्यांना या झेंडूची लागवड केली आहे. सर्वजण एकत्रितरित्या पुणे येथे फुले पाठवत आहोत. येत्या काळात शेततळ्यामध्ये मत्स्यपालन तसेच शेळीपालन सुरू करणार आहे.
-भगवानराव मुंढे

खरीप व उन्हाळी अशा दोन हंगामात किंवा बहुविध बारमाही भाजीपाला, बाजारातील मागणी अोळखून त्यांची निवड, जोडीला झेंडूची फुलशेती अशी पीकपद्धती व त्यातून ताजे उत्पन्न करडगांव (जि. परभणी) येथील भगवानराव मुंढे यांनी तयार केली आहे. अत्यंत कष्ट व शेतीचे नेटके नियोजन करीत उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांनी तीन एकरांवरून सात एकर जमिनीपर्यंत शेतीचा विस्तार केला आहे.
 
परभणीपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या करडगांव येथील भगवानराव किशनराव मुंढे
सन १९८४ पासून शेती करीत आहेत. वडिलोपार्जित जमिनीपैकी त्यांच्या वाट्याला तीन एकर जमीन आली होती. दुधना नदी काठी असलेली ही काळी कसदार जमीन आहे.

बारमाही भाजीपाला उत्पादन
गावापासून परभणी शहर मार्केटजवळ असण्याची संधी भगवानरावांनी अोळखली. त्यानुसार भाजीपाला शेतीवर भर दिला. त्याची सुरवात २० गुंठे क्षेत्रावर वांगे लागवडीतून झाली. परभणी बाजारात चांगले दर मिळाले. त्यानंतर बाजारातील मागणी लक्षात घेत पिकांची योग्य घडी बसविली. साधारण दोन एकर क्षेत्र भाजीपाला पिकांसाठी ठेवले. त्यात प्रत्येकी वीस गुंठे क्षेत्रात चार पिके असे नियोजन केले.

जोखीम कमी करणारी शेती
खरिपातील भाजीपाला पिकांची काढणी झाली की उन्हाळी पिकांकडे वळायचे असा कल राहिला. म्हणजे
बारमाही पिके उपलब्ध होऊ लागली. ताज्या उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. सध्या त्यांच्याकडे दहा एकर क्षेत्र आहे. दरवर्षी त्यातील दोन एकरांत प्रत्येकी २० गुंठ्यात टोमॅटो, वांगी, कांदा, मिरची, भेंडी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांची आलटून पालटून लागवड होते. एखाद्या पिकाचे दर घसरले किंवा काही नुकसान झाले तरी अन्य पिकांतून मंदी वा नुकसान भरून निघू शकते. उर्वरित आठ एकर क्षेत्रांत सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, गहू आदी पिके घेतली जातात.

ताजे उत्पन्न
वांगी पिकातून २० गुंठ्यात सुमारे नऊ टन, टोमॅटोचे १२ टन, मिरचीचे सहा टन असे उत्पादन मिळते.
दररोज साधारण एक क्विंटल माल बाजारात विक्रीसाठी नेला जातो. त्यातून उत्पन्नाचा ताजा स्त्रोत मिळतो. यंदा भाजीपाला पिकात दोन झाडांमध्ये बीटरुटची लागवड केली आहे. यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

भोपळ्याचा प्रयोग
यंदा भोपळ्याचीही १० गुंठे क्षेत्रात लागवड केली अाहे. त्याचे १५ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. सांबार निर्मितीत त्याचा वापर मोठ्या शहरात होतो. ही संधी अोळखून तो पुणे येथे पाठविण्यात येत आहे. त्यास १५ रुपये प्रति किलो दर आहे.

भाजीपाला शेतीस फुलशेतीची जोड
भगवानराव यांचा मुलगा विशाल यांचा पुण्यात फूल सजावटीचा व्यवसाय आहे. त्यात चांगला अनुभव तयार झाला असल्याने बाजारातील मागणी लक्षात त्यांनी वडिलांना कोलकता झेंडूची लागवड करण्यास सांगितले. सुरवातीच्या वर्षी खासगी बसद्वारे पुणे येथे फुले पाठवली जात. पहिल्या वर्षी सव्वा एकरांतून सुमारे ५० क्विंटल उत्पादन मिळाले. त्या वेळी दिवाळीचा काळ असल्याने सरासरी ७० रुपये प्रति किलोचे दर मिळाले. त्यानंतर पुढील हंगाम निवडताना अडीच एकरांत नोव्हेंबरमध्ये लागवड केली. त्यास २५ ते ३० रुपये प्रति किलो दर मिळाले. जानेवारीत दोन एकरांवर झेंडूची लागवड केले असून त्याचा तोडा सुरु झाला आहे. यंदा अर्धा एकर शेवंतीची लागवड केली आहे.

इतर शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा
भगवानराव यांच्या अनुभवातून गावातील अन्य शेतकऱ्यांनाही कोलकता झेंडू लागवडीची प्रेरणा मिळाली आहे. यंदा त्यातून एकूण सुमारे १० एकरांवर लागवड झाली आहे. हे सर्व शेतकरी मिळून वाहनाद्वारे पुणे येथे फुले पाठवत आहेत.

पीक फेरपालटीवर भर
फेरपालटीमुळे पीक उत्पादनात वाढ होते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. बैलजोडी, तीन सालगडी यांच्यासह शेती करताना भगवानरावांना पत्नी सीताबाई यांची शेतीत समर्थ साथ मिळते.

सिंचनासाठी शेततळे
सिंचनासाठी विहिरीची सुविधा आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडत असे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात खंड पडत असे. कृषी विभागाच्या योजनेतून एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्याची उभारणी केली. त्यामुळे उन्हाळ्यातील सिंचनासाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पाण्याचा काटेकोर वापर करण्यावर भगवानराव यांचा भर असतो. शेतीला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते.

शेतीतील यश
पहाटे चार वाजता उठून रात्री दहा वाजेपर्यंत भगवानराव यांचे काम सुरू असते. त्या कष्टातूनच
केवळ शेतीतील उत्पन्नातून गावशिवारात सात एकर जमीन खरेदी करणे त्यांना शक्य झाले. सर्व मुलांना चांगले शिक्षण दिले. एका मुलीचे लग्न चांगल्या प्रकारे केले. दोन मुलांपैकी मोठा गोपाल बॅंकेत कृषी अधिकारी तर धाकटा विशाल यांचा पुणे येथे फूल सजावटीचा व्यवसाय आहे.

संपर्क- भगवानराव मुंढे-८३२९८८८५०८

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...