agricultural success story in marathi, agrowon, karanwadi, valva,sangli | Agrowon

खोडवा उसाचे तब्बल १२० टन उत्पादन
श्यामराव गावडे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

सोशल मीडियाद्वारे मार्गदर्शन
‘होय आम्ही शेतकरी’ या ‘व्हॉट्सॲप ग्रुपमधील महत्त्वाच्या सदस्यांपैकी कबाडे मुख्य सदस्य आहेत.
शेतीतील सर्व नोंदी ते ठेवतात. मोबाईललाच त्यांनी आधुनिक नोंदवही बनवली आहे.

सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश अप्पासाहेब कबाडे प्रयोगशील ऊस उत्पादक आहेत. लागवड उसाच्या एकरी १०० टन उत्पादनात त्यांनी कायम सातत्य ठेवले आहे. बियाणास तुटलेल्या उसाचा खोडवा ठेऊन त्याचे एकरी ---टन उत्पादन घेतले आहे. काटेकोर व्यवस्थापनाद्वारे खोडवा ऊसशेतीही आदर्शही त्यांनी शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे.
 
सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात कारंदवाडी गावचे शिवार लागते, कृष्णा नदीच्या पाण्याने समृध्द झालेला परिसर व निचऱ्याची जमीन यामुळे ऊस व भाजीपाला पिकांवर अधिक भर दिला जातो.

कबाडे यांची ऊस शेती
सुरेश कबाडे यांची कारंदवाडी गावात ३० एकर जमीन आहे. वडील अप्पासाहेब यांच्या काळात उसाचे एकरी ४० ते ५० टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळायचे. काटेकोर व्यवस्थापन व सुधारित तंत्राचा अवलंब यातून एकरी उत्पादन त्यांनी १०० ते १२० टनांपर्यंत नेले. उसावर ऊस घेतल्याने काही वेळा उत्पादन घटायचे. उपाय म्हणून केळी व हळदीद्वारे पीक फेरपालट सुरू केली. त्याचा बेवड चांगलाच फायदेशीर ठरला.

कबाडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
१)दर्जेदार बेण्यासाठी आग्रही. स्वतःच्या शेतासाठीचे बेणे आपल्याच बेणेमळ्यात तयार करतात. उतिसंवर्धित (टिश्‍यू कल्चर) रोपांचा वापर. एकस्तरीय, द्विस्तरीय व त्रिस्तरीय पद्धतीने बेणे मळा विकसित करतात.
२)खोडव्याचे व्यवस्थापन- बियाण्यासाठी तुटलेल्या खोडवा व्यवस्थापनासाठी गळितास तुटलेल्या खोडव्यापेक्षा चार महिने जादा मिळतात. त्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला आहे.
३)खोडवा ऊसशेतीत बुडखे तासले जातात. बुरशीनाशकाची फवारणी होते.
४)उर्वरित पाला सरीत दाबून बैलाच्या नांगरीने बगला मारल्या जातात.
५)डीएपी, युरिया, पोटॅश व दाणेदार कीटकनाशक तसेच झिंक, मॅंगेनिज, मॅग्नेशियम, सिलिकाॅन, बोरॉन, सल्फर आदींचा जरुरीप्रमाणे वापर
६)पाचट काढून एक आड एक सरीत टाकले जाते.
७)पीएसबी, ॲझोटोबॅक्‍टर आदी जिवाणू खतांची ५० दिवसांनी, ६५ व ८० दिवसांनी आळवणी
८)चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

मशागत व लागवडीचा टप्पा
हळद, केळी आदी पिके निघाल्यानंतर अवशेष रोटावेटरद्वारे जमिनीत गाडले जातात. पंधरा मेच्या दरम्यान सऱ्या सोडल्या जातात. हिरवळीच्या खतांसाठी ताग, धैंचा विस्कटला जातो.
 
खोडवा प्रयोग

 • रोपे २०१५ आॅगस्टमध्ये भरली.
 • सप्टेंबरमध्ये रोप (उतिसंवर्धित) लागवड केली
 • लागवडीचे अंतर- पाच बाय दोन फूट
 • बेणे मळ्यासाठी जून २०१६ मध्ये ऊस तुटला.
 • त्यानंतर खोडवा ठेवला. तो डिसेंबर २०१७ च्या सुमारास निघाला.

उत्पादन
क्षेत्र- सव्वा चार एकर (दोन प्लाॅटसमध्ये विभागणी)
-अडीच एकर- त्यात एकूण उत्पादन- २६० टन
(एकरी १०४ टन) तर ७० गुंठे क्षेत्रात २१० टन.
(एकरी १२० टन).
खोडवा उसात आलेला खर्च- एकरी- सुमारे ४५ हजार रुपये.

व्यवस्थापनातील मुख्य बाबी

 • दर्जेदार बेण्याची विक्री आठ हजार रुपये प्रतिगुंठा दराने केली जाते. त्यातून उत्पन्न वाढते.
 • हळदीचे एकरी ३० क्विंटलपर्यंत तर केळीचे ४० ते ४५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. केळीत वरंबा न ठेवण्याची पद्धत
 • पट्टा पद्धतीत जोड ओळ उथळ तर पट्टा खोल हा वेगळा प्रयोग
 • सर्व खते मातीआड केली जातात. सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतात मिसळून दिली जातात.
 • को ८६०३२ वाणाला प्राधान्य.
 • सुमारे बारा वर्षांपासून पाचट न पेटवता कुट्टी म्हणून वापर
 • एक डोळा किंवा रोप लागण.
 • महाराष्ट्र, कर्नाटकसह मध्य प्रदेश, गुजरातमधील शेतकऱ्यांची कबाडे यांच्या ऊस शेतीस भेट

सोशल मीडियाद्वारे मार्गदर्शन
‘होय आम्ही शेतकरी’ या ‘व्हॉट्सॲप ग्रुपमधील महत्त्वाच्या सदस्यांपैकी कबाडे मुख्य सदस्य
-सुमारे तीन लाख शेतकरी या ग्रुपला ‘कनेक्‍ट’. डॉ. अंकुश चोरमुले, अमोल पाटील व अन्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन. वडील अप्पासाहेब कबाडे, पत्नी सौ. पद्मजा यांची मोलाची मदत. शेतीतील सर्व नोंदी ठेवतात. मोबाईललाच आधुनिक नोंदवही बनवली आहे.

अन्य उत्पादनाची आकडेवारी

 • गेल्या वर्षी खोडवा उत्पादन- एकरी ८३ टनांपर्यंत.
 • लागवड ऊस- २०१३-१४- ११ एकर- ११२५ टन
 • २०१४-१५- चार एकर- ३० गुंठे- ५०२ टन
 • २०१५-१६- चार एकर- ४०६ टन
 • २०१६-१७- तीन एकर - ३०२ टन

संपर्क- सुरेश कबाडे - ९४०३७२५९९९

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...