agricultural success story in marathi, agrowon, karhol, aurangabad | Agrowon

पाण्याचे बचत गट बनवून दुष्काळ हटविणारे काऱ्होळ
संतोष मुंढे
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पाणी आल्यानं मोडलेल्या फळबागा पुन्हा उभ्या करणार. गावात पाण्याचे बचत गट निर्माण केले आहेत. निर्माण झालेल्या पाणीसाठ्यात गाळ साठणार नाही याची काळजी आम्ही गावकरी घेणार आहोत.
-गणेशराव कुंडलिक खलसे, शेतकरी, काऱ्होळ
संपर्क- ९७६५४७०५१४

अौरंगाबाद जिल्ह्यातील काऱ्होळ गावाने चक्क पाण्याचे बचत गट निर्माण केले आहेत. सुमारे बारा ते तेरा गटांनी केलेल्या कामांमधून पाण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जलसंधारणाच्या कामातून साठलेल्या पाण्याचा उपसा होऊ न देणे, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा कार्यक्षम वापर हे उद्दिष्ट ठेवून गट कार्यरत आहेत. त्यातूनच शेती व पयार्याने गावच्या अर्थकारणालाच गती मिळून इथलं सारं शिवार हिरवंगार झालं आहे.
 
दुष्काळाची गडद छाया अनुभवणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पाण्याची अवस्था तशी बेताचीच आहे. जिल्ह्यात मध्यम, लघू प्रकल्पातील पाणीसाठ्यांची अवस्था चिंता वाढविणारी होती. अशावेळी चार वर्षांपूर्वी पाण्यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील काऱ्होळ गावात मात्र यंदा पाण्याची निश्चिंती आहे. सुमारे सहाशे हेक्‍टरवर विस्तारलेल्या गावशिवारातील सुमारे १७० विहिरींना जलसंधारणाच्या कामामुळे दहा ते बारा फुटांवर पाणी लागले आहे.

लोकसहभागाची जोड
काऱ्होळ गावशिवारात सेवा संस्थेच्या माध्यमातून दोन वर्षांत जलसंधारणाच्या कामाला लोकसहभागाची जोड मिळाली. या जोडीमुळे गावकुसातील विहिरींची पाण्याची पातळी दहा बारा फुटावर आलीय. गावशिवारात फळबाग, भाजीपाल्याचे क्षेत्र वाढीस लागले. गावाच्या आर्थिक गाड्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दुग्ध व्यवसायातही वृद्धिंगत होण्यास वाव मिळाला आहे. कायम पाण्याच्या चिंतेत असलेल्या गावकऱ्यांचा मोठा प्रश्न मिटल्याने गावपुढाऱ्यांना आता पाणी सोडून गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या इतर विषयांकडे लक्ष देण्यास खऱ्या अर्थाने वेळ मिळत असल्याचे चित्र आहे.

जलसंधारणाच्या कामासाठी गावाची निवड
काऱ्होळ गावालगत चवंड नावाची नदी असून तिला चार ओढे येऊन मिळतात. मात्र पडणारे पाणी ओढ्यातून नदीत व तेथून थेट वाहून जात असल्याने टॅंकरच्या पाण्याशिवाय पर्याय नव्हता. बागांनाही टॅंकरने पाणी देण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रतिकूल परिस्थिती पाहून गावाची निवड जलसंधारण प्रकल्पासाठी करण्यात आली. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने सीएसआर फंडाच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये प्रकल्पासाठी हे गाव सेवा संस्थेला दत्तक दिले.

अशी झाली कामे

 • सेवा संस्थेच्या वतीने गावकुसाचे २०१५ मध्ये तांत्रिक सर्वेक्षण. त्यातून १५ जागा निवडल्या. त्यावेळी गावात १७० विहिरी असूनही त्यांना दोन-तीन फुटापर्यंत पाणी होते. उन्हाळ्यात या विहिरी कोरड्या पडत. बोअरवेल्सलाही शंभर ते दीडशे फुटांपर्यंत पाण्याचा थेंब नव्हता.
 • सर्वेक्षणातून २०१६ मध्ये चवंड नदीवर तीन जुन्या बंधाऱ्यांचे नाला खोलीकरण.
 • तीन कामांमध्ये जुन्या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने जवळचे बोअर्स व विहिरींना पाणी आले.
 • पहिल्या तीन कामांमुळे बराच फरक पडला. गावातील टॅंकर बंद झाले.
 • सन २०१७ मे महिन्यात एका बंधाऱ्यात चार ते पाच फूट पाणी उपलब्ध होते असे ग्रामस्थ सांगतात.
 • पहिल्याच वर्षी केवळ खोलीकरणाच्या कामात यश मिळाल्याने गावकऱ्यांचा उत्साह वाढला. सन २०१७ मध्ये नव्याने खोलीकरणाची नऊ कामे. त्यातून जवळपास जलक्रांतीच.
 • गावशिवारातील पाण्याचा थेंब नसलेल्या विहिरींना दहा ते बारा फुटांवरच पाणी दिसू लागलं.
 • ज्या विहिरी बुजवायच्या असं शेतकरी म्हणायचे त्यांना पाणी दिसू लागले.
 • गावात पाण्याचे बारा ते तेरा बचत गट. त्यातून जलसंधारणाच्या कामांना वेगाने चालना. प्रत्येक गटात १० ते १२ सदस्यांचा समावेश.

कामांची फलश्रुती

 • पूर्वी गावात दोन-तीन एकरच फळबाग होती. आता सुमारे नऊ हेक्‍टरवर द्राक्ष तर आठ हेक्‍टरच्या आसपास मोसंबी, १२ हेक्‍टरवर डाळिंब. त्यासाठी पाण्याची चिंता मिटली.
 • दोन वर्षांत सुमारे ५० ते ६० शेततळी. संरक्षित सिंचनाला शेतकऱ्यांकडून प्राधान्य. आजमितीला सुमारे २२ शेततळ्यांत स्वखर्चातून शेतकऱ्यांनी पन्नी टाकली.
 • गावकऱ्यांना शुद्ध जल प्रकल्पाच्या माध्यमातून अत्यल्प दरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळते आहे. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होत अाहे.

जलस्वयंपूर्णतेचे होत असलेले फायदे

 • गावात निर्माण होताहेत रोजगाराच्या संधी. शेंद्रा ‘एमआयडीसी’त रोजगारावर जाणाऱ्या मजुरांना मिळाले गावातच काम
 • रब्बी पिके घेण्याची संधी
 • नवी झाडे लावण्याचा उपक्रम
 • गावात दोन डेअरी. त्यामाध्यमातून सुमारे साडेतीन हजार लिटर दुधाचे दररोज संकलन.
 • चाराही उपलब्ध होत असल्याने दुग्धोत्पादनाला व शेतीच्या अर्थकारणाला चालना

प्रतिक्रिया

पाण्यासाठी झुंजणाऱ्या आम्हा गावकऱ्यांना आता पाच रुपयांत वीस लिटर शुद्ध पाणी मिळू लागलं आहे. त्यामुळं आजारी पडण्याचं प्रमाणही घटलं आहे.
-गणेश गुसिंगे
संपर्क- ९७६४८४४६०२

 
शुद्ध पाणी देण्याचा प्रकल्प चालविण्याचं प्रशिक्षण घेतल्यानं रोजगार मिळाला.
-गणेश राऊत, युवक, काऱ्होळ
 
जलसंधारणाच्या कामांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. पण पाण्याबाबत आता निश्चिंती झाली आहे. यात लोकसहभाग महत्त्वाचा ठरला आहे.

-सचिन खलसे
उपसरपंच, काऱ्होळ, ता. जि. औरंगाबाद
संपर्क--९७६५००५५०६

पाण्यासाठी सर्वाधिक त्रस्त असलेल्या महिलांमध्ये आता समाधान आहे. पाण्यासाठी एकाच पाणवठ्यावर उडणारी जीवघेणी झुंबड थांबली आहे.
रामदास खलसे, ग्रामस्थ

गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी काही लाख रुपये खर्च केले. आणखी कामे प्रस्तावित आहेत.
पाण्याच्या बचत गटांपुढे जाऊन यापुढे गावाचं ‘वाॅटर बजेट’ तयार करून पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यावर भर राहील.
-अरविंद येलम 
प्रकल्प अभियंता, सेवा संस्था औरंगाबाद

संपर्क- ७५८८१६२१२९

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...
शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित...सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) :...
व्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले...नाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र...