मार्केटच्या अभ्यासावर चालणारी भोसलेंची शेती

संपर्कातून तयार केलेले जागेवरचे मार्केट आज ढोबळी मिरची, द्राक्षे किंवा टोमॅटो असो, त्याला जागेवरच मार्केट तयार करण्यात भोसले बंधूंना यश मिळाले आहे. आकाराने मोठी, रंगाने आकर्षक अशा या मिरचीची भुरळ व्यापाऱ्यांना न पडल्यासच नवल!
ढोबळी मिरचीची गुणवत्ता दाखविताना नाना व वामन हे भोसले बंधू.
ढोबळी मिरचीची गुणवत्ता दाखविताना नाना व वामन हे भोसले बंधू.

बाजारपेठेचा सूक्ष्म अभ्यास, त्यानुसार पिकाची निवड, एखाद्या पिकात सातत्य, दोन टप्प्यात पिकाची लागवड, जागेवरच विक्री, अशा वैशिष्ट्यांसह सोलापूर जिल्ह्यातील नाना व वामन या भोसले बंधूंनी आपली साडेबारा एकर शेती यशस्वी केली आहे. बदलत्या काळाबरोबर चालणारी त्यांची शेती निश्चित अनुकरणीय आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे नाना आणि वामन या भोसले बंधूंची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील त्यांच्या काळात पारंपरिक शेती करायचे. गावाच्या कडेला अगदी माळरान, मध्यम अशी जमीन. पूर्वी ज्वारी, तूर, मूग, मका अशी हंगामी पिके घेतली जायची. आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची. त्यामुळे भोसले बंधू फारसे शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यातचच १९९० मध्ये वडिलांचे निधन झाले. घरची व शेतीची जबाबदारी दोघा भावांवर येऊन पडली. नानांनी एका ठेकेदार मित्रासोबत भागीदारीचा व्यवसाय सुरू केला. धाकटे वामन ‘एमआयडीसी’मधील कंपनीत कामगार म्हणून नोकरीस लागले. एका टप्प्यावरील हा संघर्ष त्यांनी भोगला. सन २००० स्थळ- गावातीलच निवृत्ती पाटील यांची टोमॅटो शेती

  • नाना- अरे वा! काय सुंदर प्लॉट आहे निवृत्तीदादांचा. असं काही तरी प्रयोगशील केलं पाहिजे.
  • वामन- नवी पीक पद्धती वापरल्याशिवाय प्रगती नाही हेच यातनं दिसतयं.
  • चला- आजपासून नव्या विचारानं शेती करू.
  • सन २००० नंतर

  • मित्रांच्या साह्याने पहिल्यांदा लिंबूची लागवड केली. त्यात काहीसे यश मिळाले.
  • टोमॅटोची निवड केली. त्यातून तब्बल ८० हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उत्साह वाढला.
  • मग दोन्ही भावांनी व्यवसाय, नोकरी यापेक्षा थेट शेतीतच पूर्ण लक्ष घातले.
  • आजची भोसले बंधूंची शेती

  • क्षेत्र- साडे १२ एकर.
  • द्राक्षे- तीन एकर-तीन वेगवेगळे वाण
  • टोमॅटो- सुमारे १७ वर्षांपासूनचे नियमित पीक
  • ढोबळी मिरची- सुमारे तीन-चार वर्षांपासूनचे पीक
  • -शेतीची वैशिष्ट्ये

  • प्रत्येक हंगामी पिकाची दोन टप्प्यात लागवड- त्यामुळे दरांमधील धोके कमी होतात.
  • उदा. टोमॅटो ढोबळी एका टप्प्यात नुकसान झाल्यास
  • पहिली लागवड जून जून दुसऱ्या टप्प्यातून भरून निघते. दुसरी लागवड आॅगस्ट नोव्हेंबर
  •  नुकसान भरून काढण्याचे नियोजन समजा एखादे पीक रोगामुळे वा हवामानामुळे वा कमी दरामुळे वाया गेले तर त्वरीत त्या जागी दुसरे मागणी असलेले पीक लावून ते नुकसान भरून काढण्याची पद्धत. उदा. यंदा ढोबळी मिरची- दीड एकर- रोगाने वाया गेली. त्वरीत त्या जागी झेंडू लावला. आता तो काढणीस येईल. तो पैसा देईल. मागील वर्षी- टोमॅटो- पावणेदोन एकर- वाया गेला. त्वरीत त्याच बेडवर दोडका लावला. त्याने तीन लाख रुपये मिळवून देत नुकसान भरून काढले. बाजारपेठेचा मोठा अभ्यास प्रत्येक पिकाची बाजारातील मागणी व दर यांचा अभ्यास करून लागवडीची सवय या मित्रांची होते शेतीत मदत प्रवीण यादव, संदीप गायकवाड उत्पादन

  • ढोबळी मिरची- एकरी ४० टनांपर्यंत. दीड एकरात ८० टन उत्पादन.
  • हंगामनिहाय उत्पादनात बदल
  • टोमॅटो- एकरी ४० टन, त्याहूनही अधिक
  • द्राक्षे- एकरी १५ टन
  • चांगल्या उत्पादनास पूरक ठरलेल्या बाबी

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- उदा. ठिबक सिंचन, मल्चिंग, बाजारपेठेच मागणी असलेल्या संकरीत वाणांची निवड विद्राव्य खतांचा वापर
  • दरवर्षी सेंद्रिय घटकांचा वापर एकरी
  • शेणखत- चार ते पाच ट्रेलर
  • कोंबडीखत- चार ते पाच टन
  • सुरवातीची स्थिती नाना- बागेत मालाची तोडणी सुरू आहे, घेता का? व्यापारी- क्रेटला २०० रुपये दराने जागेवर घेतो, बघा, पसंत असल्यास पुढची बोलणी करू. नाना- चालेल, घ्या दोन दिवसांनी नानांचे मित्र- अहो नाना, पाचशे रुपये रेट सुरू होता. व्यापाऱ्यानं फसवलं की तुम्हाला! निष्कर्ष- बाजारपेठेचा कमी अभ्यास असल्याने किमान एक लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. आताची परिस्थिती ढोबळी, द्राक्षे तोडणीला तयार होत आहेत. नाना- कुणाला देऊ? नानांचे शेतकरी मित्रांचे नेटवर्क आहे. नाना- काय दर सुरू आहेत तुमच्या भागात?

    बारामती शेतकरी -व्हाईट द्राक्षाला किलोला २५ ते ३० रुपये तर कलर व्हरायटीला ७० ते ८० रुपये रेट सुरू आहे. सोलापूर शेतकरी- ढोबळीला हैदराबादला किलोला ४५ रुपये अन दिल्लीच्या व्यापाऱ्यांचा ३० ते ३५ रुपये सुरू आहे. सांगोला शेतकरी - टोमॅटोला क्रेटला ६०० रुपये नाना- बरं भाऊ धन्यवाद. हैदराबाद मार्केटलाच माल देणं योग्य ठरेल. हैदराबादची गाडी येऊन बॉक्समध्ये माल भरून घेऊन जाते. निष्कर्ष- शेतकरी मित्रांचा संपर्क दांडगा ठेवल्याने बाजारपेठा समजतात. दरांत फसवणूक होत नाही. नानांनी दिल्या टिप्स

  • टिकवणक्षमता अधिक असलेल्या टोमॅटो जातीची निवड, म्हणजे दूरच्या मार्केटला पाठवता येतो.
  • एखाद्या पिकात मोठे सातत्य हवे. तरच नफा मिळतो. (उदा. टोमॅटो, १७ वर्षांपासून घेतला जातो)
  • संरक्षित पाणी हवेच. साडे सहा लाख रुपये स्वखर्चाने मोठे शेततळे घेतले. त्यातून चार महिने पाणी पुरते.
  • संपर्क- नाना भोसले- ९९२२१५६५९१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com