दुग्धव्यवसायातून स्वयंपूर्ण झालेली मन्यारवाडी

मन्यारवाडीतील बहुतांश लोक शेतीसोबत दुधाचा व्यवसाय करीत आहेत. हजारांच्या आसपास दुधाळ जनावरे अाहेत. मात्र गावात जनावरांचा शासकीय दवाखाना नाही हीच एक मोठा त्रुटी जाणवते. -अरुणा शिवाजी डिंगरे सरपंच, मन्यारवाडी
मन्यारवाडीतील ग्रामस्थ दुग्ध व्यवसायात अविरत मेहनत करतात.
मन्यारवाडीतील ग्रामस्थ दुग्ध व्यवसायात अविरत मेहनत करतात.

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील मन्यारवाडीच्या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून समृद्धीकडे वाटचाल केली आहे. विशेष म्हणजे अपवाद वगळता प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे हा व्यवसाय आहे. म्हणूनच कुटुंबातील तिसरी, चौथी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. गावात दररोज तीन हजार लिटरवर दुधाचे संकलन होते. तालुक्याचे ठिकाण असलेल्या गेवराईकरांची दुधाची बहुतांश गरज मन्यारवाडीचे दुग्ध व्यवसायिकच भागवतात. विशेष म्हणजे नेहमी व्यवसायात गुंतलेल्या व अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मन्यारवाडीकरांना कधीही आत्महत्येच्या विचाराने ग्रासलेले नाही.

सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले मन्यारवाडी (ता. गेवराई, जि. बीड) हे गाव गेवराईपासून तीन किलोमीटरवर आहे. पालख्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या व सुमारे साडेसातशे हेक्टर जमीन असलेल्या गावचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. तसे पाहायला गेले तर शेतकऱ्यांकडे दुभत्या गाई, म्हशी अादी जनावरे असतातच. पण घरी खाण्यापुरतेच दूध उत्पादन असते. अतिरिक्त दुधाचीच काय ती विक्री व्हायची. सायकल ते मोटरसायकल सुमारे चाळीस वर्षांपूर्वी काही शेतकरी तांब्या, किटली आदींच्या माध्यमातून दूध घेऊन गेवराईत जाऊन विकत. त्यातून नगदी पैसा हाती येऊ लागला. दैनंदिन आर्थिक गरजा भागू लागल्या. मग हळूहळू गावातील इतरांनीही हा मार्ग चोखंदळला. पुढे सायकली आणि आता मोटारसायकलींवरून गेवराईत दूध जाते. आठशेंवर म्हशी; तीन हजार लिटरवर दूध गावात साधारण तीनशे कुटुंबे असून अपवाद वगळता प्रत्येकाच्या गोठ्यात दुधाळ जनावर आहेच. आता दुग्ध हाच मुख्य व्यवसाय झाल्याने गावात आठशेंवर म्हशी, तर दीडशेपर्यंत गाई असाव्यात. घोडेगाव (अहमदनगर), सांगोला (जि. सोलापूर) यासह हिरापूर (ता. गेवराई) येथील बाजारांतून या म्हशी शेतकरी खरेदी करतात. यामध्ये प्रामुख्याने गुजर, शिंगाळू या जातींचा समावेश आहे. यामध्ये दोन्ही वेळचे मिळून १५ ते २० लिटरपर्यंत दूध देणाऱ्या म्हशी आहेत. दुग्ध व्यवसायाचे अर्थकारण सुधारतेय मन्यारवाडी गावातील शेतकऱ्यांकडे असलेल्या म्हशींच्या किमती सुमारे ६५ upej रुपयांपर्यंत आहेत. एका म्हशीला दिवसाला पाच किलो पेंड (शंभर रुपये) व तेवढ्याच किमतीचा चारा लागतो. किमान दहा लिटर दूध दररोज देणाऱ्या म्हशींना तेवढा खर्च येतो. त्यातून ४० रुपये प्रति लिटर याप्रमाणे दूध रतिबाला देऊन हाती रोजचे चारशे रुपये येतात. अर्थात, त्यात ५० ते ७० टक्के खर्चही असतो.चारा शेतातलाच असतो. पण तो पिकवायला मेहनत तर लागतेच. दुग्ध व्यवसायातून स्वयंपूर्णत नवनाथ जगताप यांच्या गोठ्यात दहा म्हशी असून, त्यापैकी तीन सध्या दूध देतात. गेवराईत त्यांचे ३० लिटरपर्यंत दूध जाते. त्यांचा मुलगा शरद ही जबाबदारी सांभाळतो. त्यातून महिन्याकाठी ३० ते ३५ हजार रुपयांचे एकूण उत्पन्न मिळते. येत्या काळात दुभत्या म्हशींची संख्या वाढून दुधाचे प्रमाण शंभर लिटरपर्यंत जाऊ शकेल. वेळच्या वेळेला पाणी, ओला व सुका चारा, जनावरांना रोज धुणे, गोठ्याची निगा, आरोग्य व्यवस्थापन असे कष्ट मात्र सातत्याने उपसावे लागतात. त्यामुळे म्हशींना कुठला आजार होत नाही व दुधाची प्रतवारीही चांगली असते. गेवराईकरांची भिस्त मन्यारवाडीच्या दुधावर मन्यारवाडीत दररोज अंदाजे तीन हजार लिटरपर्यंत दूध संकलन होते. रतिबानेच दुधाची विक्री केली जाते. दुधाची प्रतवारीही चांगली असल्याने गेवराईतील ग्राहकांनाही त्याची भुरळ पडली आहे. तसे मन्यारवाडी आणि गेवराईकरांचे दुधाच्या अनुषंगाने नाते ४० वर्षांपेक्षा जास्त काळाचे आहे. सकाळी दूध काढल्यानंतर मन्यारवाडीतून सायकली, मोटारसायकली यांच्या रांगाच गेवराईच्या दिशेने निघतात. रतिबाचे ४० रुपये प्रति लिटर प्रमाणे पैसे दर महिन्याला मिळतात. मात्र हेच दूध डेअरीला दिले, तर केवळ २० ते २५ रुपयांच्या दरावर समाधान मानावे लागते. त्यामुळे डेअरी हा पर्याय बहुतेक दुग्ध व्यवसायिक वापरत नाहीत. शेणखताचा शेतीत वापर आणि विक्रीही गोठ्यातील शेण आणि पालापाचोळा संकलित करून त्याची एकत्र साठवण केली जाते. त्यातून चांगल्या प्रतीचे खत तयार होते. अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी खड्डे खोदले आहेत. वर्षाकाठी हे शेणखत शेतात टाकले जाते. अलीकडील काळात शेणाला मागणी वाढली आहे. ट्रॅक्टरच्या प्रति ट्रॉली शेणाचे दीड हजार रुपये मिळतात. जादा जनावरे असलेल्यांकडे साधारण ५० ट्रॉली खत उपलब्ध होऊते. वर्षाला त्यातून सुमारे ५० हजार ते ७५ हजार रुपयांची कमाई होते. या रकमेतून पेंड खरेदी करणे शक्य होते. सुधारणेच्या वाटेवरचं गाव डोंगरदऱ्या, नद्या, ओढे अशी नैसर्गिक भौगोलिक ‘देण’ असलेल्या गावात शासनाच्या विविध विभागाने बंधारे, सिमेंट बंधारे, माती नाला अशी जलसंधारणाची कामे केली आहेत. गावात पाणी योजना, सौर पथदिवे, एलईडी बल्ब आहेत. सार्वजनिक वाचनालय, स्वस्त धान्य विक्री केंद्र आहे. इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे. छोटी बाजारपेठ असून, पूरक व्यवसायही आहेत. कृषी विभागाने चारा कुट्टी यंत्रे अनुदानावर दिली आहेत.   शाळेत मुलींचा टक्का अधिक सातवीपर्यंत शाळा असलेल्या मन्यारवाडी गावात मुलांची संख्या ६१, तर मुलींची संख्या ८० पर्यंत आहे. विशेष म्हणजे आत्महत्येचा विचार इथल्या गावकऱ्यांच्या मनाला शिवत नाही.   प्रतिक्रिया   शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय केल्यामुळे दोन पैसे नगदी मिळतात. त्यातून फायदेशीर शेतीही करता येते. यामुळे सुखी जीवन जगणे शक्य झाले आहे. -नवनाथ जगताप, मन्यारवाडी संपर्क- शरद जगताप (मुलगा)- ८३०८८८०८४५ शिवाजी डिंगरे- ८८०५९५९६२३    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com