विक्रीव्यवस्था बळकट करणारी उच्चशिक्षित शेतकऱ्याची शेती

माटोडा येथील मंगेश कुकडे यांनी विविध उत्पादनांच्या निमिर्तीवर व विक्रीवर भर दिला आहे.
माटोडा येथील मंगेश कुकडे यांनी विविध उत्पादनांच्या निमिर्तीवर व विक्रीवर भर दिला आहे.

हळदीच्या शेतीतील अाघाडीचे गाव म्हणून माटोडाची (जि. अकोला) अोळख अाहे. याच गावात मंगेश कुकडे हा इंजिनिअर तरुण नोकरी सोडून प्रक्रिया उद्योगात स्थिरावू लागला आहे. सुमारे ५० हून अधिक शेतकऱ्यांना सोबत घेत धान्ये, कडधान्ये, हळद- मिरची पावडर आदी सुमारे ३० उत्पादनांना त्याने मार्केट मिळवून दिले आहे. त्यासाठी विक्री केंद्रेही उभारली आहेत.

माटोडा गावातील कुकडे यांची पार्श्वभूमी

  • अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील या गावात अनेक वर्षांपासून हळदीची शेती होते.
  • येथील गजानन कुकडे व त्यांचे भाऊ अनेक वर्षांपासून हळद घेतात.
  • गजानन यांचा मुलगा मंगेश बीई मेकॅनिकल आहे. पुण्यात सुमारे १२ वर्षे चांगल्या कंपन्यांमधून त्याला नोकरीचा अनुभव आहे.
  • उद्योजक म्हणून प्रवास

    मंगेश काय म्हणतो? आपली १२ एकर शेती. पूर्वीपासून हळद, कडधान्ये घेतो. त्यांची क्षमता पूर्ण वापरून प्रक्रिया करून विक्री सुरू केली तर? चांगला नफा वाढेल. कंपनीत अनेक बंधने, अटी असतात. उद्योजक झालो तर स्वतःचा माल स्वतःच विकून अन्य शेतकऱ्यांचा मालही विकणे शक्य होईल.   शहर- पुणे- नोकरीचे ठिकाण-  हाॅटेल्स, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडे जाऊन मंगेश म्हणतो...माझ्या गावची, घरची हळद आहे. स्वाद, दर्जा एक नंबर. एकवेळ घेऊन पाहा...

    मंगेश व पालकांमधील संवाद

    मंगेश- पुणे, मुंबई मार्केट चांगले आहे. आत्मविश्वास येतोय. विक्री चांगली होतेय. आता पूर्णवेळ उद्योजक व्हावं असं वाटतंय. घरची मंडळी - तू इंजिनिअर आहेस. हुशार आहेस. चांगल्या कंपनीत चांगला पगार आहे. या सगळ्यावर पाणी सोडून गावाकडं शेती करण्याचा विचार धोकादायक आहे. आम्हाला तुझा निर्णय पटलेला नाही. मंगेश - काळजी करू नका. नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न शेतीतून काढतो की नाही ते पाहा.माझ्यावर विश्वास ठेवा. . गावाकडे उद्योगाची उभारणी

  • एकट्याने काम करण्यापेक्षा परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेण्याचे ठरवले.
  • कृषी विभागाच्या ‘अात्मा’अंतर्गत ‘शेतकरी शेतमाल उत्पादक गटा’ची स्थापना.
  • सुमारे ११ जणांच्या गटाचे नेतृत्व
  •   कच्च्या मालाचे स्त्रोत -

  •  स्वतःची शेती
  • गटातील ११ शेतकरी
  • परिसरातील ५० हून अधिक शेतकऱ्यांसोबत काम
  •   तयार होणारी उत्पादने सुमारे ३०

  • चार प्रकारच्या डाळी
  • आठ प्रकारची धान्ये
  • दहा प्रकारची लोणची
  • ग्रामीण महिलांमध्ये ‘सुगरण’ लपलेली असते. त्या उत्कृष्ट प्रकारची लोणची बनवितात;
  • मात्र विक्रीकौशल्य, मार्केटिंगमध्ये कमी पडतात. त्यांच्याकडून लोणची घेत त्यांचे मार्केटिंग
  • अन्य उत्पादने उदा. हळद व मिरची पावडर
  • उत्पादनाचा ब्रॅंड - शेतकरी   विक्री व्यवस्था

  •  गावापासून नजिक कुरुम येथे  रिटेल विक्री केंद्र
  • अमरावतीत  ‘शेतकरी मार्ट’
  • होलसेल व रिटेल विक्री
  • पुणे, मुंबई, नागपूर, अकोला, अमरावती
  • डीलर, मॉल्स, विक्री केंद्रे
  • कृषी प्रदर्शनांमधूनही विक्री
  • व्यापाऱ्यांना विकण्यापेक्षा गावातील ५० हून अधिक शेतकऱ्यांकडील हळकुंड कंपन्यांना विकले. या पद्धतीने १८०० क्विंटलची विक्री झाली. या थेट विक्रीमुळे शेतकऱ्याला बाजारभावापेक्षा क्विंटलला ४५० ते ६०० रुपये अधिक मिळाले. त्यांचा विक्रीचा त्रास वाचला. कंपन्यांचा व मंगेश यांचाही फायदा झाला.
  • काळानुरूप वेगवेगळ्या बेवसाइटवर नोंदणी करीत अाॅनलाइन मार्केटिंगद्वारे उत्पादने सादर
  •    व्यावसायिक आराखडे

  •  काही डीलर केवळ हळद पावडरीसारखे एखादेच उत्पादन ठेवायला नाही म्हणतात, त्यांना पूर्ण ‘रेंज’ हवी असते. मग मिरची पावडर व अन्य उत्पादनांची निर्मिती.
  • अनेक कंपन्यांसोबत स्पर्धा करावी लागते. मात्र, दर्जा वा गुणवत्ता उत्तम ठेवली.
  • मध्यस्थ वा व्यापाऱ्यांना माल देण्यापेक्षा कच्च्या मालावर प्रक्रिया करून थेट विक्री.
  • हळद, मिरची प्रक्रिया गावातच. पॅकिंगही माटोडा येथेच.
  • कुटुंबातील सर्वांना व गटातील सदस्यांना रोजगारनिर्मिती.
  • पारंपरिक विक्री पद्धतीत बदल केला काही पारंपरिक स्थापित वितरक क्वालिटी पाहण्यापेक्षा स्वस्त दरात मालाची अपेक्षा करतात. तरच माल विक्रीला ठेवतो म्हणतात. त्यामुळे मंगेश यांनी नवे वितरक नेमले. त्यांना मार्केटिंगबाबत सर्व मार्गदर्शन, साह्य केले. त्यातून वितरकांनी गुणवत्तेला महत्त्व दिलेच, शिवाय उत्पादनांची सगळी रेंज देखील ठेवली. 

    मोफत मार्गदर्शन घ्या अाज अनेकजण अापला व्यवसाय सुरळीत चालायला लागला, की त्याबाबत माहिती देण्याचे टाळतात. मंगेश मात्र काहीही हातचे राखून ठेवत नाहीत. शेतकरी उद्योजक म्हणून घडावा यासाठी बॅंकेबल प्रोजेक्टपासून ते मार्केटिंगपर्यंतचे सर्व प्रशिक्षण मी मोफत देतो. राज्यभरातील कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याशी संपर्क साधावा. या व्यवसायात कितीही जण उतरले तरी पदार्थांना भरपूर मागणी असल्याने स्पर्धेची भीती नाही असे मंगेश सांगतात. संपर्क- मंगेश कुकडे - ९८८१४८७६४२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com