agricultural success story in marathi, agrowon, naygaon. muktainagar, jalgaon | Agrowon

महाजनांची उच्चशिक्षित नवी पिढी सांभाळतेय शेतीची सूत्रे
चंद्रकांत जाधव
शनिवार, 2 जून 2018

केळीची यशस्वी शेती

 • महाजन यांचे केळी हे मुख्य पीक. सुमारे ४० हजार झाडांचे संगोपन. २५ ते २७ एकरांवर बाग.
 • सुमारे वीसहजार झाडे खोडवा स्थितीत.
 • गादीवाफा, ठिबक सिंचन, उतीसंवर्धित रोपे हे तंत्रज्ञान आहेच.
 • एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन.
 • साधारण १८ ते १९ महिन्यांत केळीची दोन पिके.

नायगाव येथील महाजन कुटुंबातील ऋषीकेश व विशाल हे उच्चशिक्षीत चुलतबंधू नोकरीच्या मागे न लागता आपल्या ८५ एकरांत प्रभावी व्यवस्थापन करीत आपली शेती उत्तम प्रकारे विकसित करीत आहेत. सुमारे ४० हजार केळीझाडांचे काटेकोर संगोपन करताना मल्चिंगवर तूर, कापूस घेत कमी खर्चात चांगले उत्पादन घेतले. नाल्यातून झिरपणारे पाणी चारी व विहिरीत साठवून त्याचा वापरदेखील वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणता येईल.

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर या तालुका ठिकाणापासून २० किलोमीटरवर नायगाव आहे. तापी नदी येथून सुमारे दोन किलोमीटरवर आहे. या नदीवरून अनेक शेतकऱ्यांनी जलवाहिन्या टाकून सिंचनाची व्यवस्था केली आहे. येथील महाजन कुटुंबाची एकत्रित ८५ एकर जमीन सध्या नवी पिढी अत्यंत उत्साहाने व जबाबदारी सांभाळते आहे.

उच्चशिक्षित पिढीकडे शेतीची सूत्रे
ऋषीकेश यांचे वडील अशोक व विशाल यांचे वडील किशोर यांनी केळीची पारंपरिक शेती अनेक वर्षे केली. मध्यंतरीच्या काळात उत्पादन काहीसे कमी होत असल्याचे लक्षात आले. ऋषीकेश यांनी कृषी विषयातील बीएस्सी पदवी व पुण्याहून परदेश व्यापारसंबंधीचा पदविका अभ्यासकक्रम पूर्ण केला आहे. विशाल देखील बीएस्सी ॲग्री असून मुंबईहून कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयातील पदविका त्यांनी घेतली आहे. उच्चशिक्षित असूनही शहरातील नोकरीच्या मागे न लागता दोघांनीही आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग आपल्याच शेतीच्या विकासासाठी करायचे ठरवले. त्या दृष्टीने शेतीची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक ज्ञान, अभ्यास व तंत्रज्ञान वापर यातून त्यांनी सुधारणा सुरू केल्या.

जमिनीचा विकास
अशोक व किशोर यांनी कष्टपूर्वक आपली २० एकर शेती ८५ एकरांवर नेली. धाबे गावच्या शिवारात त्यांची जमीन आहे. त्यांच्या काळातच १९८६ मध्ये तापी नदीवरून जलवाहिनी उभारली होती. सध्या त्यांच्याकडे अशा चार जलवाहिन्या आहेत. नऊ कूपनलिका व विहिरींच्या रूपाने सिंचनक्षमता आहे. जमीन खडकाळ, मुरमाड आहे. ती सुपीक करण्यासाठी हजारो ट्रॉली माती शेतात टाकण्यात आली.

केळीचे संगोपन

 • महाजन यांचे केळी हे मुख्य पीक. सुमारे ४० हजार झाडांचे संगोपन. २५ ते २७ एकरांवर बाग.
 • सुमारे वीसहजार झाडे खोडवा स्थितीत.
 • गादीवाफा, ठिबक सिंचन, उतीसंवर्धित रोपे हे तंत्रज्ञान आहेच.
 • एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन.
 • साधारण १८ ते १९ महिन्यांत केळीची दोन पिके.
 • गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे केळी शीतकरण यंत्रणेच्या कंटेनरमधून पंजाब व दिल्लीपर्यंत पोचली आहेत. बऱ्हाणुपूर हे मुख्य मार्केट आहे.
 • मागील वर्षी सुमारे १३० टन केळीची खासगी कंपनीतर्फे आखाती देशात निर्यात. स्थानिक दर किलोला साडेनऊ रुपये सुरू होता त्या वेळी निर्यातीसाठी ११ रुपये दर मिळाला.

जमीन सुपीकतेसह व्यवस्थापन चोख

 • जमीन सुपीकतेवर अधिक भर. खतांचा कार्यक्षम व नियंत्रित वापर.
 • पाण्याचे व्यवस्थापन चोख. अधिक उष्णतेच्या काळात प्रतिदिन चार तास सिंचन एका क्षेत्राला.
 • पीक फेरपालट. केळीचे अवशेष जाळत नाहीत. कापणी बागेतील खांब, वाळलेली पाने ट्रॅक्‍टर चलित यंत्राने बारीक करून जमिनीला देतात.
 • अलीकडे तूर लागवडही ठिबकवर सुरू.
 • मार्चमध्ये खोल नांगरणी करून शेत जूनपर्यंत तापू दिले जाते. जूनच्या पहिल्या आठवड्यात केळी लागवड.
 • सहा ते सात एकर हळद. चार एकर तूर यासह कापूस व कडधान्ये.
 • शेतीचा व्याप अधिक. त्यामुळे दररोज किमान ३० मजुरांची गरज. दहा मजूर कायमस्वरूपी.

शून्य मशागत, मल्चिंगवर तूर, कापूस
मागील वर्षी आठ एकरांत पॉली मल्चिंगवर कलिंगड घेतले. क्षेत्र रिकामे झाल्यानंतर मशागत न करता त्याच मल्चिंग पेपरच्या आधारे प्रत्येकी चार एकरांवर तूर व कापूस लावला. हे प्रयोग दोन तीन वर्षांपासून सुरू आहेत. शून्य नांगरणी असल्याने झालेल्या कमी खर्चात कापसाचे एकरी १३ क्विंटल तर तुरीचे एकरी नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले.

चारी खोदून सिंचन व्यवस्था बळकट
चार फुटांवर मुरूम लागतो. इथल्या जमिनीत नैसर्गिक नाल्याचा पाझर आहे. भर मे महिन्यात किंवा उन्हाळ्यातही हे पाझर येतात. नाला झुळूझुळू वाहत असतो. हे पाणी वाया जाऊ नये यासाठी ब्लास्टींग
करून सुमारे २० फूट चारी तयार केली. लांबी साधारण ४०० मीटर केली. विहिरीत ‘इनलेट’ करून पाण्याचा संचय वाढवला. हे पाणी पंपाने शेतीला वापरले जाते. यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. संपूर्ण ८५ एकरांसााठी ‘ ड्रीप ऑटोमेशन’ यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न आहे.

समाधानी संयुक्त कुटूंब
ऋषीकेश व विशाल या दोन्ही चुलतबंधूंचे सारे कुटूंब म्हणजे दहा सदस्य एकत्र नांदतात. ऋषीकेश यांचे थोरले बंधू योगेश अस्थिरोगतज्ज्ञ असून रावेर येथे त्यांचे हॉस्पिटल आहे. शेतीची जबाबदारी सांभाळून
ऋषीकेश यांनी नायगावात कृषी सेवा केंद्रही सुरू केले आहे.
संपर्क- ऋषीकेश महाजन - ९५७९५३४५३४

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...