agricultural success story in marathi, agrowon, neha ghavte, manjari, pune | Agrowon

कतृर्त्वाचे उजळले दीप
गणेश कोरे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

अरबी भाषेत केले लेबल
नेहा सांगतात, की आमच्या उत्पादनांना दुबईत विक्रीसाठी मंजुरी मिळाली. तेथील संबंधित कंपनीच्या संजीवनी पाटील यांनी आम्हाला उत्पादनांचे लेबल अरबी भाषेत करण्याविषयी सांगितले. आम्हीही पुण्यात सर्व प्रयासाने एका अरबी व्यक्तीचा शोध घेतला. त्याच्याकडून अत्यंत कमी वेेळेत त्या भाषेत लेबल करून घेतले. आम्ही उद्योगाप्रति दाखवलेल्या या चिकाटीबद्दल पाटील यांनाही अत्यंत समाधान झाले

घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रक्रिया उद्योगात लक्ष घातले. देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठ अभ्यासली. निर्जलीकरण (डिहायड्रेशन) तंत्राचा आधार घेत विविध उत्पादनांची निर्मिती मागणीनुसार सुरू केली. ध्येय, चिकाटी, इच्छाशक्ती, व्यावसायिक कौशल्य यांच्या आधारे परदेशातील बाजारपेठही हस्तगत केली. आज तीन वर्षांनंतर सात लाखांपर्यंत उलाढालीचा आलेख वाढवणाऱ्या पुणे येथील युवा उद्योजिका नेहा घावटे यांची ही यशकथा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी यशाच्या वाटा उजळवणारी अशीच आहे.

पुणे शहरातील मांजरीचा भाग ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ साठी प्रसिद्ध आहे. याच मांजरी परिसरात युवा उद्योजिका नेहा घावटे यांचा शेतमाल निर्जलीकरण प्रकल्पही पाहण्यास मिळतो. आज त्यांनी याच ठिकाणी विविध प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करीत बाजारपेठेत आपली अोळख तयार केली आहे. आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाविषयी त्या सांगतात की लहानपणापासून वडिलांना शेती करतानाच पाहात आले. अनेक वेळा शेतीत नुकसानच जास्त व्हायचे. वडील पालेभाज्या घ्यायचे. पण पावसाने भाजी भिजली की दर कमी मिळायचे. शेतातच भाजी भिजून खराब व्हायची. शेतीतल्या या समस्या मी लहानपणापासून जवळून अनुभवल्या होत्या. त्यामुळेच चांगले खात्रीचे उत्पन्न मिळवायचे तर प्रक्रिया उद्योग चांगला होऊ शकतो, असे वाटत होते.

नेहा यांच्या वाटचालीचे टप्पे
१) प्रशिक्षणातून ज्ञान आत्मसात खरे तर महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच वडिलांचे शेतीतील कष्ट, मिळणारे उत्पन्न यांची जाणीव नेहा यांना झाली होती. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. केमिस्ट्रीची पदवी घेतली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया उद्याेगाशी निगडीत विविध युनिटस पाहायला सुरवात केली. याच वेळी नातेवाइकांचे शिरूर परिसरात (जि. पुणे) गव्हांकुर निर्मितीचे युनिट पाहण्यात आले. मात्र प्रक्रिया उद्योगात काम करायचे तर प्रशिक्षण घेणे गरजेचे होते. मग फळे व भाजीपाला विषयातील प्रक्रिया उद्याेगाच्या शिक्षणासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अन्न व फळप्रक्रिया विषयातील दाेन महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. साधारण तीन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. याच दरम्यान एस. बी. शिंदे यांचे श्रीरामपूर येथील प्रक्रिया उद्योगाचे युनिट पाहण्याची संधी मिळाली. ते पाहून आपणही अशा प्रकारे उद्योग करू शकतो हा आत्मविश्वास जागृत झाला. त्यानंतर शेतमाल निर्जलीकरणाकडे उद्योगाचा पाया वळवला.

२) प्रक्रिया उद्योगाची वाटचाल
आज नेहा यांनी आपल्या अडीच एकर जागेत शेती आणि त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या मालापैकी काही शेतमाल नेहादेखील आपल्या शेतात पिकवतात.
सुरवातीला निर्जलीकरण म्हणजे ‘डीहायड्रेशन’ करून तयार झालेल्या पावडरचा दर्जा राखता येत नव्हता. विविध तज्ञांशी बाेलल्यानंतर पाण्याची समस्या असल्याचे समाेर आले. भाजीपाला धुण्यासाठी लागणारे पाणी स्वच्छ असण्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे युनिट बसवले. यानंतर पावडरचा दर्जा सुधारण्यास मदत झाली.

३) विक्री, मार्केटिंग
तांत्रिक भाग सक्षम झाला. आता मुुख्य जबाबदारी होती ती विक्री, मार्केटिंगची. सुरवातीला नातेवाईक, परिसरातील दुकाने, प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावून उत्पादनांचे प्रमोशन सुरू केले. आकर्षक पॅकिंग करून उत्पादनांचे मार्केटिंग विविध प्रदर्शनांमधूम केले. विविध दुकाने, मॉल्सला भेटी देऊन त्यांना उत्पादने विक्रीसाठी ठेवण्याची विनंती केली. आज विविध प्रयत्नांमधून पुणे येथील एका प्रसिद्ध वितरण कंपनीला उत्पादने पुरवली जात आहेत.

असा आहे आजचा उद्योग

 •  मांजरी येथे नॅचरल ॲग्रो या नावाने कंपनी उभारली. याच नावाने उत्पादनांचे ब्रॅंडिंगदेखील केले जाते.
 •  उत्पादने- सुमारे २२ शेतमालांवर प्रक्रिया होते. यात जांभूळ, आवळा, त्यापासून सुपारी, कॅंडी तसेच चिकू, टाेमॅटाे, कांदा, मेथी, पालक, पुदीना, शेवगा, कढीपत्ता, तुळस, लसूण, दुधीभाेपळा आदी विविध उत्पादनांचा समावेश आहे.
 •  सुरवात केली तेव्हा उद्योगाची वार्षिक उलाढाल होती पन्नास हजार रुपयांपर्यंत. आज हाच उद्योग पोचला आहे सात लाखांच्या उलाढालीवर.
 •  व्यवसाय सुरू केला तेव्हा दरराेज दहा किलाे फळे वा भाजीपाल्यांवर प्रक्रिया केली जायची. दिवसेंदिवस व्यवसाय वाढत असून आता त्यात वाढ झाली आहे. विविध कंपन्या आणि उद्याेजकांसोबत चर्चा सुरू आहे.
 •  सध्या पुणे येथील एक व मुंबई येथील दोन कंपन्यांनाही मालाचा पुरवठा केला जातो. या कंपन्या त्यावर पुनर्प्रक्रिया करून त्यांची पुढे विक्री करतात.
 •  उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणारा माल शेतकऱ्यांकडून घेतला जातो. त्याचप्रकारे तो स्वतःच्या शेतातही पिकवला जातो. त्यासाठी विविध प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड
  केली आहे. यामध्ये गवती चहा, कढीपत्ता, तुळस, अंबाडी, पालक, काेथिंबीर आदींचा समावेश आहे.
 •  राेजगारनिर्मिती- प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने भाज्यांची कापणी, स्वच्छ धुणे, त्यावर पुढील प्रक्रिया, पॅकिंग आदी विविध कामांसाठी पाच महिला कार्यरत आहेत. त्यांना नियमित राेजगार मिळाला आहे.
 • मार्केटिंगची जबाबदारी स्वतः नेहा सांभाळतात. त्यांना त्यासाठी सहायकदेखील आहे.
 • - एका कंपनीने ‘रेडी टू इट’ शिरा उत्पादीत करून देण्याची विचारणा केली. हे उत्पादन अद्याप बनविले जात नाही. मात्र तसे प्रयत्न भविष्यकाळात केले जाणार आहेत.
 • -सध्या दररोज ३५ ते ४० किलाेपर्यंत कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याची क्षमता अाहे. ही क्षमता येत्या काळात १०० किलाेपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी नवीन बांधकाम आणि नवीन यंत्रांसाठी सुमारे ५० लाखांचा खर्च अपेक्षित अाहे. यासाठी कर्जाची व्यवस्थाही उभारली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
 • 'फूड सेफ्टी’ विषयातील राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे प्रमाणपत्र 

गुंतवणूक
नेहा म्हणाल्या, की प्रकल्पासाठी जागा आमची स्वतःचीच आहे. त्यामुळे तो खर्च वाचला. तथापि यंत्रसामग्री व अन्य पायाभूत सुविधा उभारण्याठी सुमारे २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. अर्थात त्यासाठी कर्ज काढण्याची गरज भासली नाही. वडिलांनीच त्यासाठी मोठी मदत केली. आज ड्रायर, कटर तसेच पॅकिंसाठी लागणारी यंत्रे दिमतीला आहेत. अशा उद्योगांसाठी खादी ग्रामोद्योग संस्था किंवा शासकीय योजनांमधून प्रक्रिया उद्योगासाठी सहकार्य केले जाऊ शकते. त्याचा मोठा दिलासा नवउद्योजकांना मिळू शकतो असे नेहा म्हणाल्या. अशा प्रकारचे उद्याेग उभे राहिल्यास स्थानिक पातळीवरच शेतमालाचे मूल्यवर्धन आणि राेजगार निर्मिती हाेऊ शकते हेच त्यांच्या प्रयत्नांतून अधाेरेखीत झाले आहे. आई-वडील, कृषी व प्रक्रिया विभागातील विविध तज्ज्ञांचे सहकार्य मिळाल्यानेच आजवरची वाटचाल सुकर झाल्याचे नेहा यांनी सांगितले.

उत्पादनांचे मार्केट
मार्केटिंगसाठी अधिक वेळ आणि संयम आपल्याकडे ताजा शेतमाल खाण्याची ग्राहकांना अधिक सवय आहे. यामुळे आपली निर्जलीकरण केलेली उत्पादने ग्राहक स्विकारतील का ही भीती हाेती. मात्र अशी उत्पादने घेणारा ग्राहक काेणत्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा जागा शाेधल्या. यात उच्चभ्रू वसाहती, आयटी कंपन्यात काम करणारा वर्ग, त्यांचे क्लब हाऊस या ठिकाणी जाऊन उत्पादनांचे महत्त्व समजावून सांगण्यास सुरवात केली. सुरवातीला चवीसाठी उत्पादने भेट दिली. यानंतर सातत्याने पाठपुरावा करत ग्राहक निर्माण केला. मात्र अद्याप घरगुती ग्राहकांची संख्या कमी अाहे. विविध हॉटेल्स, केटरींग व्यावसायीक यांना मागणीप्रमाणे उत्पादने पुरवली जातात. दाेराबजी आणि एका कंपनीच्या मॉलमध्ये उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत.

‘वेबसाइटद्वारे’ ही येतेय मागणी
‘नॅचरल ॲग्रो’ याच नावाने वेबसाइटही सुरू केली आहे. त्यामाध्यमातूनही काही आॅडर्सही येत आहेत. याच माध्यमातून बंगळूरमधून मागणी आले आहे. याचबरोबर होम डिलिव्हरी, कुरियर आदींचाही वापर केला जात असल्याचे नेहा यांनी सांगितले.

सर्वाधिक मागणी
सध्या सर्वाधिक मागणी गवती चहा, आले, कांदा, लसूण, कढीपत्ता, शेवगा पान, बीट, आवळा या पदार्थांना आहे. भेंडी, गवार, कारले या निर्जलीकरण झालेल्या उत्पादनांना हळद मीठ लावण्याची प्रक्रिया करून देण्याची आॅर्डरदेखील नेहा यांना मिळाली. त्यानुसार संबंधित कंपनीला तशा प्रकारचे उत्पादन बनवूनही दिले. भविष्यात गाजर, रताळी, बीटचे वेफर्स करण्याचे नियाेजन आहे. प्रवासामध्ये असताना आराेग्यदायी पदार्थ खाता यावे असा त्यामागील उद्देश आहे. यासाठी नवी यंत्रे खरेदी करण्याचे नियाेजन आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

असा मिळताे दर
पालेभाज्यांच्या प्रकारानुसार त्यांच्या पावडरीचे दर असतात. उदाहरणादाखल सांगायचे तर रिटेलचे प्रति २५ ग्रॅमसाठी ते २० रुपयांपासून ४०, ५० व काही प्रसंगी ८० रुपये दर आहेत. घाऊक आॅर्डर असेल हेच दर किलोवर असतात. प्रति किलाे उत्पादननिहाय एक हजार, बाराशे, कांद्यासाठी २५० ते २५० रुपये तर मेथी, पालकाच्या उत्पादनांसाठी ७५० ते ८०० रुपयांपर्यंत दर राहतात.

दुबईमधील अनुभव
नेहा सांगतात की मध्यंंतरी ‘आम्ही उद्याेगीनी’ या पुण्यातील संस्थेबराेबर दुबईला जाण्याचा याेग आला हाेता. या वेळी उत्पादनांचे काही नमुने साेबत घेतले होते. दुबईत संजीवनी पाटील यांचे विक्री केंद्र आहे. त्यांच्यापुढे उत्पादने सादर केली. त्यांनी ही उत्पादने जोखून घेण्याचे ठरवले. पुढे काही दिवसांनी त्या मुंबईत आल्या. त्यांनी नेहा यांना बोलावून घेतले. तुमची उत्पादने आमच्या पसंतीस उतरली आहेत. तुम्ही आम्हाला पुरवायला सुरवात करा असे त्यांनी सांगितले. आपली उत्पादने आता दुबईच्या काउंटवर उपलब्ध होणार हे एैकताच नेहा यांना देखील अत्यंत आनंद झाला. पाटील यांनी
त्यांना उत्पादने तुमची, मार्केटिंग आमचे असा प्रस्ताव दिला. तो मान्य झाला. आज ‘मार्केटिंग बाय
‘आेएमपीके’ या अोळीवर या उत्पादनांची विक्री सुरू झाली आहे.

मराठा चेंबर आॅफ कॉमर्स कडून गाैरव
नेहा यांंच्या उद्यमशिलतेची दखल मराठा चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर यांच्या वतीनेही घेण्यात आली आहे. त्यांना यावर्षीचा कृषी प्रक्रियेतील नवउद्याेजकतेच्या पुरस्काराने नुकतेच गाैरविण्यात आले आहे.

नेहा देतात महत्त्वाच्या टीप्स

 • निर्जलीकरणाचे महत्त्व वेगळे आहे. आपण पालक घरी आणला की जास्त काळ तो टिकत नाही.
 • मात्र निर्जलीकरणाद्वारे त्याची पावडर तयार केली तर ती किमान दोन महिने टिकू शकते.
 • अशा पावडरींची ‘क्वांटीटी’देखील कमी लागते.
 • शिवाय उत्पादनाचे ‘वेस्टेज’ कमी होते.
 • या उद्योगात सतत ‘अपडेट’ राहावे लागते. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्केट काय आहे याचा अभ्यास करावा लागतो.
 • उद्योग सुरू केला तेव्हा अनेकवेळा तो चालेल की नाही अशा शंका मनात यायच्या. मात्र जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती व मुख्य म्हणजे आत्मविश्वास टिकवून ठेवणे गरजेचे असते.

संपर्क - नेहा घावटे - ८३०८४२१०८०
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...