agricultural success story in marathi, agrowon, nune, patan, satara | Agrowon

शेडनेट शेतीतून अल्पभूधारक महिला झाली आर्थिक सक्षम
विकास जाधव
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सातारा जिल्ह्यात संरक्षित शेतीच्या दृष्टीने पॉलिहाऊस व शेडनेट उभारणी करण्याकडे कल कायम आहे. जिल्ह्यात पंधराशेच्यावर पॉलिहाऊस तर तीनशेपेक्षा अधिक शेडनेटस आहेत. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह सक्षम करण्यासाठी संरक्षित शेती फायदेशीर ठरत आहे. नुने (ता. पाटण) येथील मंगल लक्ष्मण निकम या अल्पभूधारक शेतकरी महिला पाच गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊसमध्ये ढोबळी मिरची घेते. पाच वर्षांपासून त्यातून यशस्वी उत्पादन घेत चांगले अर्थार्जनही केले जात आहे.

सातारा जिल्ह्यात संरक्षित शेतीच्या दृष्टीने पॉलिहाऊस व शेडनेट उभारणी करण्याकडे कल कायम आहे. जिल्ह्यात पंधराशेच्यावर पॉलिहाऊस तर तीनशेपेक्षा अधिक शेडनेटस आहेत. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह सक्षम करण्यासाठी संरक्षित शेती फायदेशीर ठरत आहे. नुने (ता. पाटण) येथील मंगल लक्ष्मण निकम या अल्पभूधारक शेतकरी महिला पाच गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊसमध्ये ढोबळी मिरची घेते. पाच वर्षांपासून त्यातून यशस्वी उत्पादन घेत चांगले अर्थार्जनही केले जात आहे.

सातारा जिल्ह्यातील नुने (ता. पाटण) येथील मंगल लक्ष्मण निकम अंगणवाडी सेविका आहेत. मात्र ही जबाबदारी सांभाळताना त्या पती लक्ष्मण यांच्यासह शेतीही पाहतात. मुलगी जयश्री, मुलगा सोमनाथदेखील आई-वडिलांना शिक्षण सांभाळून शेतीत मदत करतात. या कुटुंबास अवघी ३० गुंठे जमीन असून एक विहीर आहे. त्यातील १५ गुंठे वहिवाटीखाली आहे. सन २०१२ पर्यंत कुटुंबाचा उदरनिर्वाह दुग्धव्यवसाय तसेच अंगणवाडीच्या मानधनावर सुरू होता. दरम्यान नागठाणेचे कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांची भेट झाली. त्यांनी पॉलिहाऊस शेतीबद्दल माहिती दिली. अधिक अभ्यासाअंती ही शेती करायचे ठरवले. बॅंकेचे चार लाख रुपयांचे कर्ज काढून पाच गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊसची उभारणी केली.

पॉलिहाऊस शेतीस प्रारंभ
पहिल्या प्रयोगात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. शेडनेट तंत्रज्ञान शिकत शिकत लागवडीचे व्यवस्थापन केले. पहिल्या वर्षी लागवड खर्च काढणीपर्यत ४० हजार रुपये आला. सर्व मिरची वाशी मार्केटला पाठवली. मात्र व्यापाऱ्यांनी दर कमी दिल्याने तोटा सहन करावा लागला. या परिस्थितीत खचून जाता पुन्हा हिरव्या ढोबळी मिरचीची लागवड केली. पहिल्या अनुभवातून बऱ्याच बाबी शिकण्यास मिळाल्या. या वेळी विक्री मुंबई मार्केटला न करता स्थानिक बाजार तसेच सातारा येथे केली. यामुळे चांगला दर मिळण्यास मदत झाली.

अनुभव तयार झाला
आत्तापर्यंत पाच ते सहा वेळा पॉलिहाऊसमध्ये ढोबळी मिरची घेतली आहे. आता चांगला अनुभव तयार झाला आहे. सरासरी उत्पादन खर्च ४० ते ५० हजार रुपये येतो. तर चार ते साडेचार टन उत्पादन (पाच गुंठ्यांत) मिळते.

निकम यांच्या शेतीतील ठळक बाबी

  • पीक फेरपालटासाठी झेंडूची लागवड. हिरवळीचे खत म्हणूनही त्याचा वापर
  • शेणखताचा वापर ठरतो महत्त्वाचा. सहा गांडूळ खताचे बेडस असून लागवडीवेळी २५ पोती खत दिले जाते.
  • रोपे तयार केली जातात. यामुळे त्यावरील खर्चात बचत. तसेच निरोगी रोपे मिळतात.
  • जिवामृत तयार करून प्रत्येक रोपास आळवणी पद्धतीने ते दिले जाते.
  • पाण्यासाठी ठिबक वापर केला जातो. त्याद्वारेच विद्राव्य खते दिली जातात.
  • डिसेंबर हा लागवडीचा हंगाम असतो.
  • लागवडीनंतर सुमारे २१ दिवसांनी शेंडा खुंडला जातो. एक महिन्याने फांद्या सुतळीच्या सहाय्याने बांधल्या जातात.
  • कीड नियंत्रणासाठी गरजेनुसार कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात. तसेच पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर होतो.
  • थेट विक्रीतून किलोला ३० ते ४० रुपये प्रति किलो दर मिळतो.

संपर्क- मंगल निकम - ९०६७३६५७०२. ८५५४०६७२७१
 
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...