तुवर पाटील कुटुंबाकडून आरोग्यवर्धक नैसर्गिक गूळ निर्मिती

पॅकिंग लेबलवर उपयुक्त माहिती तुवर यांनी आपल्या गुळाच्या पॅकींग पॅकिंग लेबलवर महत्त्वाच्या तपशिलासह एक उपयुक्त माहितीही छापली आहे. नैसर्गिक शेती पद्धतीने शेती केल्यास पिकात कोणकोणत्या अन्नघटकांची वाढ होते, अशी अमेरिकेतील अभ्यासाच्या संदर्भाने त्यांना माहिती मिळाली. नैसर्गिक गुळाचे महत्त्व वाढवण्यासाठी त्यांनी लेबलवर त्याचा योग्य वापर केला.
तुवर बंधू एकत्रितपणे शेती व गूळनिर्मिती करतात. वरद हा त्यांचा गुळाचा ब्रॅंड आहे
तुवर बंधू एकत्रितपणे शेती व गूळनिर्मिती करतात. वरद हा त्यांचा गुळाचा ब्रॅंड आहे

नगर जिल्ह्यातील पाचेगाव येथील तुवर पाटील कुटुंबाने १९९८ मध्ये नैसर्गिक शेतीला सुरवात केली. आज सुमारे १९ वर्षे त्यांनी या शेतीत सातत्य ठेवले. तर २००६ मध्ये नैसर्गिक ऊसशेतीमधून नैसर्गिक गूळनिर्मिती सुरू केली. वर्षाला गूळ व काकवीचा एकूण २० ते २५ टन विक्रीचा टप्पा त्यांनी आज पार केला आहे. वरद हा दर्जेदार गुळाचा ब्रॅंड त्यांनी लोकप्रिय केला आहे. नगर जिल्ह्यात नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर पाचेगाव हे सुमारे चार-पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. जवळून भंडारदरा धरणाचा कॅनाल असल्याने परिसर बागायती अाहे. कांदा, तसेच मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. अलीकडील वर्षांपासून येथील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागले आहेत. नैसर्गिक शेतीला दिली चालना अलीकडील काळात शेतकरी काळाची व ग्राहकांची मागणी अोळखून त्यानुसार शेतमाल उत्पादन घेऊ लागले आहेत. पाचेगावातील प्रगतशील शेतकरी गंगारामजी तुवर हे त्यातीलच एक शेतकरी आहेत. त्यांना मोहन, निरंजन, श्रीरंग, किशोर अशी चार मुले आहेत. पैकी त्यातील मोठे मोहनराव ऊसशेती व गूळनिर्मितीची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. विशेष म्हणजे पूर्ण ऊसशेती नैसर्गिक पद्धतीनेच केली जाते. मोहनरावांची शेती दृष्टिक्षेपात

  • एकूण क्षेत्र- बारा एकर
  • पूर्वी भाजीपाला, केळी, गुलाब, कलिंगड अशी पिके होती. यशस्वी शेतीतून गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून या कुटुंबाने ओळख मिळविली.
  • नैसर्गिक शेती

  • ऊस पाच एकर. नैसर्गिक शेतीला १९९८ पासून सुरवात. या शेतीत सातत्य सुमारे १९ वर्षांचे
  • गूळनिर्मिती

  • नैसर्गिक शेतीत ज्याप्रमाणे कोणतेही रासायनिक घटक वापरले जात नाही, त्याचप्रमाणे कोणतीही रसायने न वापरता रानभेंडीचा वापर करून गूळनिर्मितीला सुरवात
  • गुळव्या घरचाच असतो. त्यावरील खर्चही वाचवला.
  • स्वतःच्या शेतीव्यतिरिक्त गरज भासेल तसा अन्य शेतकऱ्यांकडील दोन ते तीन एकर क्षेत्रावरील सेंद्रिय ऊस घेतला जातो.
  • विक्रीव्यवस्था

  • पॅकिंगमधूनच विक्री
  • गुळाचा ब्रॅंड- वरद
  • काकवीचा ब्रॅंड- अमृत संजीवनी
  • थेट ग्राहक विक्रीवर अधिक भर
  • उदा. शहरातून ग्राहक फोन करून गूळ मागवून घेतात. मग एसटी पार्सलमधून तो पाठविला जातो.
  • असे नियमित ग्राहक आहेत.
  • स्टॉल उभारणी

  • नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील लोखंडी फाॅल या नावाने अोळखल्या जाणाऱ्या एका पुलाच्या परिसरात
  • स्टाॅल- सुरवातीला स्टॉलला ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळायचा, परंतु गुळाची गुणवत्ता, चव, स्वच्छता, नैसर्गिक पद्धतीने निर्मिती या बाबी लक्षात आल्याने हळूहळू मागणीत वाढ होत गेली.
  • सध्या या ठिकाणी माल जातो- श्रीरामपूर, नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर
  • वर्षाला सुमारे २० टन विक्री (गूळ व काकवीसह). मागील वर्षी हीच विक्री २५ टनांपर्यंत पोचली.
  • यंदाचे टार्गेट पन्नास टनांचे आहे.
  • दर- पूर्वी या गुळाची प्रतिकिलो २५ रुपये दराने विक्री व्हायची. सध्या जागेवर हीच विक्री ८० रुपये, तर उर्वरित ठिकाणी १०० रुपये दराने होते.
  • नैसर्गिक पद्धतीने ऊस उत्पादन नैसर्गिक शेतीला सुरवात केली त्या काळात सुरवातीला उसाचे एकरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळायचे. त्यानंतर हळूहळू वाढ होत गेली. आज ४० ते ५० टन उत्पादनापर्यंत तुवर पोचले आहेत. गूळप्रकियेसाठी साधारणपणे प्रतिटनाला वीस हजार रुपयांपर्यंत निर्मिती खर्च येतो. खर्च वजा जाता दरवर्षी काही लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. देशी गायीचे संगोपन नैसर्गिक शेती करायची, तर शेणखताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्या दृष्टीने प्रत्येकी दोन गीर आणि खिलार गायींचे संगोपन केले जाते. मोहनराव म्हणाले, की गोमूत्र व शेण यांच्यापासून रामबाण या नावाने आम्ही द्रावण तयार केले आहे. त्यामध्ये प्रतिदोनशे लिटर पाणी, दहा ते वीस लिटर गोमूत्र, दहा ते वीस किलो शेण, प्रत्येकी पाच लिटर ताक आणि गूळ हे सर्व एकत्रित केले जाते. ते दोन ते तीन दिवस ठेवून त्याचा वापर ऊस व भाजीपाला पिकांसाठी केला जातो. त्याचा अनुभव पिकांसाठी चांगला मिळाला आहे. सेंद्रिय कर्ब पूर्वी मातीपरीक्षण विविध ठिकाणांहून करून घेतले. मात्र प्रत्येक अहवालात बराच फरक आढळायचा. मग गोंधळून जायला व्हायचे. मात्र आता परीक्षण करून घेणेच बंद केले आहे. मात्र अनेक वर्षांपासून केवळ नैसर्गिक शेती करीत असल्याने सेंद्रिय कर्ब ०.७ ते त्यापुढे असावा, असे मोहनराव म्हणाले.

    नैसर्गिक भाजीपाला उत्पादन नैसर्गिक पद्धतीच्या उसाबरोबर आता त्याच पद्धतीने काही भाजीपाला पिकांच्या उत्पादनास सुरवात केल्याचे मोहनराव म्हणाले. सध्या दहा गुंठ्यात दहा भाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. त्यांची विक्री पुणे, मुंबई येथे केली जाते.  

    ठळक बाबी

  • नैसर्गिक गूळनिर्मिती २००६ पासून. अर्थात गूळनिर्मितीमध्ये यापूर्वीचाही अनुभव आहे.
  • नैसर्गिक शेतीत जीवामृत, शेणखत, हिरवळीच्या खतांचा वापर
  • उसाचे वाण-को ८६०३२, एकरी उत्पादन- ५० टनांपर्यंत
  • संपर्क- मोहनराव तुवर- ९३२६९३२६१५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com